Pages

Sunday, September 12, 2010

अन्नसुरक्षा अभियानाने केला शेतकर्‍यांचा फायदा

कृषी विभागाच्या अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत हरभरा पिकातील कामगंध सापळ्याचा फायदा अनेक गावातील शेतकर्‍यांनी घेतला. रानबोडी तसेच हरदोली (नाईक) या गावातील अनेक शेतकर्‍यांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव होता. मात्र कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना विविध योजना तसेच किड सर्वेक्षणाची माहिती दिली.

पांरपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकर्‍यांना म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. तेव्हा कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावागावात सभा घेऊन शेतकर्‍यांना विविध योजनांची तसेच किड सर्वेक्षणाबद्दल माहिती देण्यात आली.

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील रानबोडी गावातील विनोद हिरामन ठाकरे तर हरदोली (नाईक) गावातील महादेव उरकुडा थोटे या शेतकर्‍यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांत...

माझ्या शेतात घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढतच होता. अनेक शेतकरी त्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी, पक्षी, थंड पेय याचा वापर करत होते. पण कामगंध सापळ्याबाबत त्यांना माहिती नव्हती. कृषी विभागाकडून त्यांना ही माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनंतर शेतात एकरी कामगंध सापळे लावण्याचे ठरवले. ते लावल्यानंतर एका सापळ्यात किमान आठ ते दहा घाटेअळीचे पतंग शेतकर्‍यांना सापडले. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांमध्ये कुतुहल निर्माण झाले. एक पतंग एका दिवसाला ३५० ते ४५० अंडी घालतात. एका सापळ्यात सात ते आठ पतंग सापडले म्हणजे एकूण ३५०० अळ्यांचे नियंत्रण करण्यात आले. यामुळे फवारणीचा खर्चही कमी झाला आहे.

पाहता पाहता गावात याचा प्रसार झाला आणि प्रत्येक शेतकर्‍याने ही पद्धत अवलंबली. आता प्रत्येकाच्या शेतात कामगंध सापळे दिसू लागले आहेत. कमी खर्चाच्या पद्धतीत घाटेअळीवर नियंत्रण मिळवता येत असल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले आहेत.

'महान्यूज'मधील मजकूर .

No comments:

Post a Comment