Pages

Thursday, December 9, 2010

‘अंगूर और अंगूर की बेटी’ दोन्ही महागणार!

नेहमीच्या ऋतुचक्रात अचानक बिघाड झाल्यागत पावसाळा सहा महिन्यांपर्यंत लांबल्यामुळे यंदाच्या हंगामामध्ये या बदलाचा सर्वाधिक फटका ‘अंगूर और अंगूर की बेटी’ अर्थात ‘द्राक्ष आणि वाईन’ यांना बसण्याची चिन्हे आहेत. खाण्यायोग्य अन् वाइन उपयोगी अशा दोन्ही प्रकारातील द्राक्षांच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची साधार भीती उत्पादकांमध्ये व्यक्त होऊ लागल्याने आगामी काळात खाणाऱ्यांना द्राक्ष ‘आंबट’ तर संभाव्य किंमतवाढीमुळे द्राक्षासव अर्थात वाइन घेणाऱ्यांनाही तिची चव ‘कडू’ लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

No comments:

Post a Comment