Pages

Tuesday, February 1, 2011

गुणवत्ता असेल तर बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ अमर्याद आहे.

वस्तूची गुणवत्ता चांगली असेल तर त्याला कुठेही बाजारपेठ मिळू शकते.याची प्रचिती नचिकेत बचतगटाला आली आहे.कोपरगांव,नगर,नाशिक,पुणे,मुंबई असे करता या गटाने तयार केलेली आवळा कॅन्डी आता थेट अमेरिकेत झेप घेऊ पहात आहे.

गटाच्या अध्यक्षा प्रीती कुलकणी व हरहुन्नरी आहेत त्या त्यांच्या मैत्रिणी मंदाकिनी टेंभर (उपाध्यक्षा) उज्वला नाईकवाडे,ज्योती अरगडे,सुमन आढावा,विद्या औताडे,संगीता देवकर,मंगल गवळी,अश्विनी धोंडे, सुनिता निकुंभ,वंदना नाईकवाडे,संध्या दहे,कल्पना दंडवते,विनीता कदम,मीना भंडारी (सचिव) संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेल्या होत्या.तिथेच त्यांना आवळयापासून तयार केलेले विविध पदार्थ पहावयास मिळाले.ते कसे करायचे याची पुस्तिकाही बघायला मिळाली. इतके त्यांच्यासाठी पुरेसे होते.कोपरगांवमधीलच संजीवनी बचत गट मार्गदर्शन केंद्राच्या संपर्कात त्या सर्वजणी होत्याच.फावल्या वेळात घरबसल्या लघुउद्योग सुरु करुन तुम्हीही प्रपंचाला हातभार लावू शकता हा श्रीमती स्नेहा कोल्हे यांचा सल्ला त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला.

फक्त पंधराशे रुपये एवढेच त्यांचे सुरुवाताचे भांडवल होते.त्यातूनच त्यांनी आवळे आणले अन्य साहित्य जमा केले व आवळा सरबत,आवळा मुरांबा आणि आवळा कॅन्डी तयार केली.तयार झालेला माल त्यांनीच घरोघरी जाऊन विकला. मग एकातून दुसरी,दुस-यातून तिसरी अशा ऑर्डर मिळत गेल्या.

मागणी वाढली तसे भांडवल अपुरे पडू लागले.फक्त बचतीच्या रकमेवर गरज भागेना. त्यांना मग श्रीमती अनिता मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गटाने कर्ज प्रस्ताव दिला.तो मंजूर झाला.दहा हजार रुपये कर्ज मिळाले.त्याचा वापर करुन गटाने उत्पादन वाढविले.आज गटाच्या आवळा उत्पादनांची उलाढाल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.

अलीकडेच कोपरगाव येथे जेष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शन झाले.त्यात या गटाची उत्पादने होती.स्वत: श्री कोल्हे यांनी त्यांच्या स्टॉलला भेट दिली.उत्पादनांची,उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली व सर्व सदस्यांचे कौतूकही केले.श्रीमती कुलकर्णी यांच्या भगिनी अमेरिकेत असतात.त्यांच्या माध्यमातून तिथे काही प्रतिसाद मिळतो का ? यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.फक्त आवळा कॅन्डीवरच अवलंबून न ाहता या महिलांनी आता गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रतीच्या साडया,लहान मुलांचे कपडे मोठया प्रमाणावर आणून त्यांचीही विक्री सुरु केली आहे.त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.



'महान्यूज'

No comments:

Post a Comment