Pages

Tuesday, April 26, 2011

बदलत्या तापमानात करावयाचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन.


बदलत्या तापमानात करावयाचे द्राक्ष बागेचे व्यवस्थापन
सध्याच्या परिस्थितीचा विचार करता उन्हाळा जास्त जोरात जाणवत आहे. दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असून, आर्द्रता कमी होत आहे. वारेसुद्धा तेवढ्याच तीव्रतेने वाहत असल्याचे जाणवते. अशा परिस्थितीमध्ये द्राक्ष बागेत काय उपाययोजना कराव्या आणि जुन्या बागेत अशा वेळी काय व्यवस्थापन करावे, याची माहिती घेऊ. डॉ. आर. जी. सोमकुंवर न्या बागेत काही ठिकाणी अजूनपर्यंत खरड छाटणी झालेली नाही.
Monday, April 25, 2011 AT 12:00 AM (IST)

नियंत्रण उसामधील गवताळ वाढीचे...


नियंत्रण उसामधील गवताळ वाढीचे...
गवताळ वाढ हा रोग फायटोप्लाझ्मा या अतिसूक्ष्म विषाणूंमुळे होतो. हा रोग उसामध्ये बेण्याद्वारे व किडींद्वारे पसरतो. या रोगामुळे 35 टक्केपर्यंत उसाची उंची कमी होते, 15 टक्के कांडीची जाडी कमी होते. या रोगास कमी - अधिक प्रमाणात सर्वच जाती बळी पडतात. आपल्याकडे या रोगाचे प्रमाण दहा टक्केपर्यंत आढळते. रोगाची लक्षणे ओळखून वेळीच नियंत्रणात्मक उपाययोजना करावी. डॉ.
Monday, April 25, 2011 AT 12:00 AM (IST)

संत्र्यावरील फायटोप्थोरा नियंत्रणाचे उपाय.


संत्र्यावरील फायटोप्थोरा नियंत्रणाचे उपाय
मागील दहा वर्षांत संत्रा फळपिकावर फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. त्यामुळे स ंत्र्याची अनेक झाडे बळी पडली. बदलत्या हवामानामुळे (पावसाचे प्रमाण, ढगाळ हवामान व हवेतील सापेक्ष आर्द्रता जास्त काळ राहिल्यास) फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. शिफारशीत उपायांचा अवलंब केल्यास हा रोग नियंत्रणात राहील. डॉ. एन. डी. जोगदंडे, डॉ.

Tuesday, April 26, 2011 AT 12:00 AM (IST)

Friday, April 22, 2011

कारल्यामुळे झाला लखपती.





निसर्गाच्या लहरीपणामुळे भाताचे उत्पन्न घटू लागले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकर्‍यांनी जमिनी विकण्याचा सपाटा लावला असतानाच दुसरीकडे अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेघरच्या पंकज पाटील या तरुण शेतकर्‍याने भातशेतीबरोबरच साडेतीन एकरामध्ये कारल्याचे पीक घेऊन नवीन पायंडा पाडला आहे.

एकेकाळी भाताचे कोठार म्हणून रायगड जिल्ह्याची ओळख होती. मात्र, काही वर्षांपासून जिल्ह्यात औद्योगिकीकरण वेगाने वाढू लागले आणि पडिक जमिनीसह शेतजमिनींवर प्रकल्प उभे राहू लागले. त्यातच खडीकरणाच्या जमिनी संरक्षक बंधारे फुटल्याने नापीक होऊ लागल्या. पावसाच्या लहरीपणामुळे भाज्या, मसाल्याची पिके घेण्याबरोबरच दुग्धव्यवसाय करण्याच्या सूचनाही कृषी विभागाकडून वारंवार करण्यात आल्या. 

अलिबाग तालुक्यातील पळी-आंबेपूर येथील पंकज पांडुरंग पाटील या तरुणाने असाच एक नवा पायंडा पाडला आहे. त्याने साडेतीन एकर शेतात नऊ वर्षापासून कारल्याचे पीक घेतले आहे. दहावीच्या परीक्षेत अयशस्वी झालेल्या पंकजला पुढे शिकण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिकता आले नाही. त्याने कृषी व्यवसायातून पुढे येण्याचा प्रयत्न केला. त्याला कुटुंबानेही सहकार्य केले. त्याचप्रमाणे कृषी विभागाचेही वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. 

पावसाळी भातकापणीनंतर अभिषेक जातीच्या कारल्याचे पीक घेण्यात येते. एक दिवसाआड ८०० ते ९०० किलो कारले मिळते, असे पंकज सांगतो. नवी मुंबईतील वाशी येथील बाजारात कारले विक्रीसाठी नेण्यात येते. या पिकातून वर्षाला सुमारे तीन लाखांचा नफा मिळतो, असे तो आत्मविश्वासपूर्वक सांगतो.

कारल्याचे पीक घेताना त्याला सर्व प्रकारची आवश्यक द्रव्ये मिळतील असा त्याने प्रयत्न केला. त्यासाठी ७५ टक्के शेणखत आणि २५ टक्के रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. रासायनिक खतामुळे पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्यानेच शेणखतावर अधिक भर दिल्याचे पंकज सांगतो. उत्पादन वाढीसाठी आणि पिकाचा दर्जा राखण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे प्रयोग करत असल्यामुळे त्याचा त्याला फायदाच होत आहे. त्याने अतिरिक्त उत्पन्नातून आणखी जमीन खरेदी केली आहे. 

पाऊस लहरी आहे आणि दराचा भरवसा नाही यामुळे हताश न होता बाजारभावाचा अंदाज घेऊन शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे हिताचे आहे, असा संदेशही तो यानिमित्ताने देतो. 

आदिवासींनी फुलवले भाजीचे मळे.






केंद्र सरकारने वन हक्क दाव्यांचा कायदा केला. त्यातून रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार आदिवासींना त्यांच्या हक्कांच्या जमिनी मिळाल्या आहेत. यापूर्वी थोडेसे दचकत शेती करणारे आदिवासी आता बिनधास्तपणे या व्यवसायात उतरले आहेत. रायगड जिल्ह्याच्या पेण तालुक्यातील वरप परिसरात आदिवासी आता आपल्या मालकी हक्कांच्या जमिनींवर भाजीचे मळे फुलवू लागले आहेत.

जिल्हाधिकारी सुभाष सोनवणे यांनी नुकताच या भागाचा दौरा केला. येथील आदिवासींनी वनराई बंधारे बांधून त्यात पाणी अडवून ठेवले आहे. साकव संस्थेने त्यांना पंप पुरविले आहेत. या पंपाने पाणी खेचून आदिवासी बांधव शेती-बागायती करीत आहेत. शिक्षणाचा फारसा प्रसार या भागात झाला नसला तरी शेतीच्या माध्यमातून त्यांची चांगल्या प्रकारे उपजीविका सुरु आहे. वांगी, टोमॅटो, मिरची, दुधी, कारली यासारख्या फळभाज्या पिकवून त्या नागोठणे बाजारात नेऊन विकायचा नित्यक्रम ठरुन गेला आहे. सरकारने जमिनी नावावर करुन दिल्याने या आदिवासींचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे

पिकविलेला भाजीपाला आम्ही डोक्यावर उचलून मुख्य रस्त्यापर्यंत घेऊन जातो. गावात यायला पूर्वी साधी पाऊलवाट होती. आता ग्रामस्थांनी श्रमदानाने बर्‍यापैकी रस्ता तयार केला आहे. जिल्हाधिकार्‍यांनी गावातील प्राथमिक शाळा, तसेच अंगणवाडीला भेट देऊन तेथील शैक्षणिक स्थितीची माहिती घेतली. अंगणवाडीतील सर्व मुलांना पूरक पोषण आहार द्या, अशी सूचना त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचार्‍यांना केली. त्यावेळी साकव सामाजिक संस्थेचे प्रमुख अरुण शिवकर यांनीही आदिवासींच्या समस्या जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिल्या.

गावातील एकही नागरिक यापुढे रोजगारापासून वंचित राहणार नाही, ज्याच्याकडे शेती आहे त्याला आणि शेती नाही त्यालाही पुरेसा रोजगार मिळेल, अशी आश्वासक स्थिती निर्माण करण्यात आली आहे. शेतीच्या माध्यमातून सुरु झालेला आर्थिक संपन्नतेचा मार्ग त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक प्रगतीपर्यंत पोहोचेल यात आता शंका वाटत नाही.