Pages

Sunday, May 22, 2011

ठिबक सिंचनाद्वारे वृक्ष लावा - वृक्ष जगवा.



ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत क्षेत्रात विविध प्रजातीच्या झाडांना पाणी देऊन त्या द्वारे झाडे वाढविण्याचा उपक्रम अकोला जिल्हयातील धाबा ग्रामपंचायतीने हाती घेतला आहे.वृक्ष लावा -वृक्ष जगवा हे शासनाचे ब्रीदवाक्य खरे केले आहे.

विविध प्रजातीच्या असंख्य झाडांना ठिबंक सिंचनाद्वारे पाणी दिले जात असल्याने ती झाडे हिरवी दिसून येत आहेत. अवघ्या सहाशे लोकसंख्या असलेल्या धाबा ग्रामपंचायतीने गेल्या वर्षभरापूर्वी लोखंडी कठडयाच्या संरक्षणात नारळ,निलगिरी,कडूलिंब,अशोका या वृक्षासह काही शोभिवंत झाडे लावली आहेत. बाग,बगीचे ,नर्सरी व वनराईलाही हेवा वाटावा अशा ऐटीत सदर झाडे ग्रामपंचायत परिसरासह बस स्टॅड ,मुख्य रस्ते,व चौक ा-चौकात हिरवीगार उभी असल्याचे बोलके चित्र पाहावयास मिळते.

नवनवीन उपक्रमा सोबत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाच्या माध्यमातून भिंतीवर लिहिलेले विविध सुविचार,घराच्या प्रवेशद्वाराजवळ पतीपत्नीचे नाव असलेलेले फलक,चौका-चौकात कचरा कुंडी व भारनियमनाच्यावेळी प्रकाशाकरिता लावण्यात आलेले सौर उर्जा दिवे आदी उपक्रमांसोबत ठिंबक सिंचनाद्वारे झाडांना पाणी देऊन झाडे वाढविण्याचा उपक्रमही ग्रामपंचयतीने हाती घेतला आहे.गावाचे सरपंच निताताई सुनिल धाबेकर यांच्यासह गावातील लोकप्रतीनिधी यांच्या सहकार्याने व देखरेखीमुळे गावातच वनराईचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

No comments:

Post a Comment