Pages

Wednesday, July 13, 2011

अतिरिक्त साखरेची निर्यात अशक्य

केंद्रीय अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी अतिरिक्त साखरेची निर्यात शक्य नसल्याचं म्हटलं आहे. येणाऱ्या सणांच्या दिवसांत देशात साखरेचे भाव वाढू नयेत यासाठी अन्नमंत्रालयाचा साखर निर्यातीला विरोध असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आजवर सरकारने दोन टप्प्यात केवळ १० लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे.
साखरेच्या निर्यातीसाठी देशातल्या साखर उद्योगाचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मागील महिन्यात थॉमस यांना भेटले होते. दोन टप्प्यातल्या १० लाख टन साखरेच्या निर्यातीनंतरही देशात ५० लाख टन अतिरिक्त साखर शिल्लक आहे.
सणाच्या कालावधीत देशात साखरेच्या मागणीत वाढ होते, त्यावेळी ही अतिरिक्त साखर बाजारात उपलब्ध होणे गरजेचे असल्याचे थॉमस म्हणाले.

No comments:

Post a Comment