Pages

Sunday, February 18, 2018

अवकाळी पाऊस व गारपीट हवामान अंदाज.

आज दिनांक १८ फेब्रुवारी २०१८.*
उत्तर भारतात उपलब्ध असलेले वातावरणातील पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे महाराष्ट्र व गुजरात/मध्यप्रदेश सीमेवरती मर्यादित राहून तिथपर्यंतच धुके व थोडीफार थंडी तयार करीत आहे.
तसेच दक्षिण भारतात केरळ तमिळनाडू या राज्यांच्या आसपास वातावरणातील बाष्प व विषुववृत्तावरील पाऊस पाडण्याजोगे ढग मर्यादित राहून उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल देत आहेत.
विषुववृत्तावरील ढगांची दाटी ही येणाऱ्या काळामध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस व किंचित प्रमाणात गारपीट घेऊन येण्याची शक्यता आहे.
कारण आता वाऱ्याची दिशा बदलली असून ते नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे वारे विषुववृत्तावरील ढग  महाराष्ट्रावर किंबहुना भारतीय जमिनीवर येऊन अवकाळी पाऊस व गारपीट अशी परिस्थिती निर्माण करू शकतात.
आत्ता घाबरून जाण्याचं कारण नाहीये कारण ही परिस्थिती येणाऱ्या काही महिन्यात उद्भवू शकते अशी कोणतीही परिस्थिती आत्ता लगेच उद्भवू शकत नाही. कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अजून म्हणावा तितका बळकट झाला नाहीये.
त्यामुळे सध्यातरी फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिट यांची शक्यता कमी आहे.
सध्या महाराष्ट्रावर कोरडे वातावरण असून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे तसेच पहाटे व संध्याकाळी तापमान किंचित कमी जाणवत आहे त्यामुळे थंडी बोचरी जाणवत असेल कारण वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वारे वेगवेगळ्या दिशेतून मार्गक्रमण करत आहेत.
सरतेशेवटी वाढणाऱ्या उन्हाच्या कडाक्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी.
तसेच शेती क्षेत्रासाठी विशेष सल्ला असा की उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जमिनीतील उपलब्ध पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढत चालला असून त्यासाठी शेतीमध्ये जमिनीवर आवश्यक तेवढे नैसर्गिक आच्छादन निर्माण करून आपण नैसर्गिक गांडूळ व सूक्ष्म जीवजंतूंचे संरक्षण करावे कारण येणार्‍या उन्हाळ्यात हेच गांडूळ व सूक्ष्म जीवजंतू आपल्याला चांगल्या दर्जाचे पिक देणार आहेत.
निसर्ग आपल्याला एवढे भरभरून देत असताना आपणही त्या निसर्गाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

No comments:

Post a Comment