Pages

Wednesday, March 7, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 07/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ७ मार्च २०१८.*

सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे काही ढग अचानकपणे महाराष्ट्रावर निर्माण झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा काही अंशी नंदुरबार व धुळे संपूर्ण जिल्हा जळगाव जिल्हा हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण निर्माण होईल..
मध्य महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाड्यातील उत्तर जालना,बुलढाणा संपूर्ण जिल्हा,वाशिम जिल्हा काही अंशी हिंगोली परभणी जिल्हा, यवतमाळ चा दक्षिणेकडील भाग नांदेड संपूर्ण जिल्हा हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहील....

तसेच रायगड,ठाणे, पुणे अहमदनगर,औरंगाबाद काही अंशी ढगाळ वातावरण राहील...

चिंता करण्याचे काही कारण नाही आहे.
कारण यातून हलक्या सरी वगळता काही जास्त मोठ्या पावसाची शक्यता वाटत नाही.

महाराष्ट्रावरील हे सर्व ढग गुजरात कडे आगेकूच करत असल्यामुळे याचा महाराष्ट्रात धोका कमी आहे पण याचा वेग मंदावला तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे नाशिक,जळगाव या भागात दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे.

ज्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मध्ये घबराहट पसरविण्यात आलेली आहे त्या प्रमाणात काही अवकाळी पाऊस व गारपिटीचीे शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप चिंता करू नये....


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:

Post a Comment