Pages

Thursday, March 15, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 15/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक १५ मार्च २०१८.*

काल सकाळी सांगितल्याप्रमाणे दुपारनंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून म्हणजे गोवा,सिंधुदुर्ग-कोल्हापूर या भागातून ढग आपले मार्गक्रमण चालू करून ते सर्वदूर म्हणजे भंडारा-गोंदिया/नंदुरबार पर्यंत सर्वत्र तसेच पुढे मध्य प्रदेश, बिहार सीमेपर्यंत पोहोचले आहेत.


त्यामुळे काल दुपारनंतर- संध्याकाळी-रात्री व आज पहाटे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे..

काल व आज पहाटे बऱ्याच ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असेल.....

महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाचा दिवस असून आज परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे....

महाराष्ट्रातील बहुतांशी तालुके हे दाट ढगांनी व्यापलेले असून बऱ्याच तालुक्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल...

खास करून
*कोंकण विभागातील* गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर हे जिल्हे जास्त दाट ढगांनी व्यापलेले आहेत...

*उत्तर महाराष्ट्र*
तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हे जिल्हे सुद्धा जास्त ढगांनी व्यापलेले आहेत...

*पश्चिम-मध्य महाराष्ट्र*
पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर  औरंगाबाद सोलापूर सांगली बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड जालना बुलढाणा.. हे जिल्हे सुद्धा कमी-जास्त प्रमाणात ढगांनी व्यापलेले आहेत..

*विदर्भ*

विदर्भातील सर्वच जिल्हे कमी-जास्त प्रमाणात ढगाळलेले राहतील...

पावसाची शक्यता ही कोकणातील सर्व जिल्ह्यात तसेच सह्याद्री पर्वतरांगावरील पुर्वेकडील व पश्‍चिमेकडील भाग.....
उत्तर महाराष्ट्रातील गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील अमरावती नागपुर पर्यंतचा भाग व पुणे अहमदनगर हा मध्य महाराष्ट्राचा भाग जास्त ढगाळ वातावरण असल्याने येथे हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे...

एक आनंदाची बातमी आहे...

केरळ-मालदीव जवळील वादळ हे काल संध्याकाळपासून थोडे कमकुवत झाले आहे ते उत्तर/उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून ते हळूहळू कमकुवत होऊन अरबी समुद्रातच विरून जाईल अशी शक्यता आहे.

*पण*
त्याबरोबरीनेच ढगांचा खूप मोठा समूह मालदीव पासून गोवा मुंबईच्या समुद्रात एकत्रित झाल्याने ही पुढील काळात चिंतेची बाब होऊ शकते....

आम्ही या ढगांच्या समुहावरती बारीक नजर ठेवून आहोत गरज लागेल तसे दुपारनंतर परत एकदा हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल.......!

©

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:

Post a Comment