Pages

Friday, June 1, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 01/06/2018

*आज दिनांक 1 जून 2018* *सकाळी*

 *ईशान्येकडील राज्यांत मॉन्सूनचे आगमन शक्‍य*

*पुणे* - अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) कर्नाटकपर्यंत मजल मारली.
मॉन्सूनची उत्तर सीमा गुरुवारपर्यंत कायम होती.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्यास बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली.

कर्नाटकमधील शिराळी, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. 3) प्रगती करण्याची, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

बंगालच्या उपसागरातून मॉन्सून ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होणार असून, शुक्रवारी या भागात हजेरी लावणार आहे.

महाराष्ट्र आणि गोव्यात 6 जूननंतर पाऊस जोर धरणार असून, 6 ते 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात मॉन्सून पोचणे शक्‍य आहे.

आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

मध्य प्रदेशपासून पूर्व विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे जाणवते.

*संदर्भ: भारतीय हवामान विभाग.*

No comments:

Post a Comment