आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी व तत्सम उद्योगावर आधारलेली आहे. विकसनशील भारताला विकसिततेकडे नेण्यात शेतीचा महत्वाचा वाटा आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलत आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायात मोठय़ा प्रमाणात रोजगार देण्याची क्षमता आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन बहुपीक पध्दत, फळझाडांची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे काम काही शेतकरी करीत आहेत. अनुभवाने आिण शेतीत विविध प्रयोग राबवून इतरांना मार्गदर्शन करुन त्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे वळवित आहेत.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये जांब नावाचे गाव आहे. गावातील दिवाकर पांडुरंग पवार या शेतकर्याने शेती व्यवसायात नवा आदर्श निर्माण केला आहे. पवार यांनी परंपरागत शेती पध्दतीला फाटा देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरली आहे. शेतीपूरक व्यवसाय सुरु करुन सधनकडे वाटचाल केली आहे. श्री. पवार हे सोरणा, लोहारा, लंजेरा, देऊळगाव, खैरलांजी, धोप व पिटेसूर या परिसरातील शेतकर्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या शेतीत सुध्दा आमुलाग्र बदल घडविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
श्री. दिवाकर पवार हे वयाच्या २२ व्या वर्षापासून शेती व्यवसाय करतात. त्यांच्या संयुक्त कुटुंबात पूर्वी ११.२ हेक्टर शेती होती. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच सेंद्रीय शेती करुन उत्पादनामध्ये वाढ केली आहे. कमी खर्चाची शेती करुन जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांनी २५.२ हेक्टर जमीन विकसित केली आहे. केवळ धान या एकाच पिकावर अवलंबून न राहता आवळा, आंबा, विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. रोग व किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधीचा कमीत कमी वापर करुन जास्तीत जास्त सेंद्रिय, जैविक व वनस्पती औषधांचा वापराकडे त्यांचा कल आहे.
बागायती पिके घेताना पाण्याचे योग्य नियोजन करुन ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे जमिनीची धुप थांबविली गेली आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी निम, करज, महुआ, कुसूम व ऐरंडी पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. सन २००६-०७ पासून श्री. पवार हे महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रम राबवून उत्तम प्रकारचे बियाणे उत्पादित करुन पुरवठा करतात. एकात्मिक किड व्यवस्थापना अंतर्गत प्रकाश सापळे, चिकट सापळे, फेरोमन सापळे, पक्षी थांबे यांचा वापर करुन किडीचे व्यवस्थापन करतात.
पिक उत्पादन वाढीसाठी शेतात ड्रममध्ये गांडुळाव्दारे व्हर्मीवॉश तयार करुन त्याचा वापर संजीवके, बुरशीनाशके म्हणून करतात. श्री. पवार यांनी एक एकर निकृष्ट जमिनीमध्ये आवळा व सागवान झाडाची लागवड केली आहे. फलोत्पादन योजनेअंतर्गत ५ हेक्टरवर राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत उती संवर्धनाचा वापर करुन चांगले उत्पादन घेतले आहे. तसेच एक हेक्टर क्षेत्रावर केळीची बाग ठिबक सिंचनाचा वापर करुन फुलविली आहे. अर्धा एकरवर आंबा, चिकू, लिंबू, पेरु व डाळिंबाच्या झाडाची लागवड केली आहे. शेतीपूरक व्यवसायाची जोड म्हणून गावरान गाईपासून घरीच जरशी गाई तयार करुन दुग्ध उत्पादन सुरु केले आहे.
श्री. पवार हे शेतीसोबतच ग्रामोत्थानासाठी प्रयत्नशील आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे उपाध्यक्ष असून गावकर्यांच्या सहकार्याने जांब गावाला तंटामुक्तीचा ४ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच शासनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व योजनांची अंमलबजावणीत ते नेहमीच तत्पर असतात. कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल राज्य शासनाने त्यांना १९९८ या वर्षी शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानित केले आहे. तसेच त्यांना २००८ च्या कृषी भूषण शेतकरी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.
'महान्यूज'मधील मजकूर.
टिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625
ReplyDeleteटिशयूकलचर बर्मा सागवान रोपे, प्रत्यक्ष लॅब पहाण्यासाठी, टिश्यू कल्चर डाळिंब, केळी इत्यादी रोपे. ,बर्मा सागवान 1 वर्षात 15 ते 18 फूट वाढणारे ,सरळ वाढ ,आंतरपिके घेता येतात, ऊस ,मका ,केळी ,चारा पिके अशी कोणतीही, कमी पाणी लागते, बारा महीने लागवड़ करीता येते ,9 ते 10 वर्षात तोड़णीस ,लाखात उत्पादन, सल्ला व मार्गदर्शन, संपर्क - सिमा बायोटेक कोल्हापूर मो न - 9822050489 / 8830336625

ReplyDelete