Mahakrushi
"Knowledge Farming Platform"
Pages
(Move to ...)
Home
Weather Forecast
Agri Market
Get 7 / 12
Agriculture
Cultivation
Dairy
Poultry
Agri News
Ask Question
▼
Tuesday, December 14, 2010
कांद्याला सोन्याचा भाव! / Farmer get good returns from selling of Onion.
शेतकऱ्यांच्या डोळ्यात नेहमी पाणी आणणाऱ्या कांद्याने आता मात्र सर्वसामान्य ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. नगर तालुका बाजार समितीत कांद्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला. बाजार समितीत ६ हजार रूपये प्रतिक्विंटलप्रमाणे कांद्याची विक्री झाली. सततच्या पावसामुळे कांद्याचे अध्रेअधिक पीक सडले. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली. साठवलेला गावरान कांदा विकल्यानंतर लाल कांद्याची मोठी आवक होण्याची अपेक्षा होती. मात्र, आवक कमी होत असल्याने चांगला बाजारभाव मिळत आहे. बाजार समितीत आज एक नंबरच्या कांद्याला क्विंटलला तब्बल ६ हजार रुपये भाव मिळाला. आजपर्यंतच्या भावातील हा उच्चांक आहे. मध्यम प्रतीचा कांदा ५ हजार रुपये, तर लहान कांदा साडेतीन ते चार हजार रुपये क्विंटल दराने विकला गेला. बाजार समितीत आज १८ हजार कांदा गोण्यांची आवक झाली. नगरच नव्हे, तर बीड ,सोलापूर, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्य़ांतील शेतकरीही येथे कांदा विक्रीस आणत असल्याची माहिती सभापती भानुदास कोतकर यांनी दिली. शेतकऱ्यांनी आपला कांदा नगर बाजार समितीत विक्रीसाठी आणण्याचे आवाहन उपसभापती भाऊसाहेब काळे यांनी केले. परजिल्ह्य़ातील कांदाउत्पादक शेतकरी येथे कांदा आणत असल्याचे आडतदार बाबासाहेब कराळे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment