Pages

Friday, December 10, 2010

तरीही ‘ठिबक’ अत्यावश्यक! / Drip Irrigation System is the need of Indian Agriculture.

अकरा ऑक्टोबर २०१० च्या शेतीवाडीमध्ये ठिबक सिंचनाबद्दल डॉ. भीमराज भुजबळ यांचा लेख वाचला. लेखातील ठिबक सिंचनाबद्दल जी मर्यादा स्पष्ट केल्या आहेत त्या अत्यंत मार्मिक आहेत. पण ठिबक सिंचनाचा वापर आज वाढतच गेला पाहिजे असे मला वाटते. त्याबद्दल आपण आज ठिबक सिंचनाबद्दल पूर्ण माहिती घेऊ. यास इंग्रजीमध्ये Drip Irrigtion म्हणतात. जमिनीचा मगदूर, पिकांच्या वाढीची अवस्था, वातावरणातील पाण्याचे बाष्पीभवन त्याचा गुणांक इ. बाबींचा विचार करून पिकाच्या मुळांच्या कार्यक्षेत्रात त्याच्या गरजेइतके पाणी पॉलिथीनच्या नळय़ांचे जाळे पसरून, तोटीद्वारे किंवा सूक्ष्म नळीद्वारे थेंबाथेंबाने अथवा बारीक धारेने देण्याच्या आधुनिक पद्धतीला ठिबक सिंचन म्हटले जाते. या पद्धतीत जमीन नेहमी वापशाच्या स्थितीत ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे जमिनीतील हवा, पाणी याचे प्रमाण ५०:५० राखले जाते. अशा अवस्थेत पिके अन्नद्रव्याचे शोषण कार्यक्षमतेने करू शकतात. त्याचप्रमाणे जमिनीत असणारे जिवांणूचे उपकारक कार्य वेगाने होत राहते.

No comments:

Post a Comment