Pages

Wednesday, February 23, 2011

गव्हाच्या शेतीची यशोगाथा.





राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत कृषी क्षेत्रातील विरखंडी या लहानशा गावाने खरीप व रब्बी पिकाच्या उत्पादनात भरारी घेतल्यामुळे हे गाव कुही पंचायत समितीमध्ये अग्रेसर झालेले आहे.विरखंडी हे गाव अवर्षण प्रवण क्षेत्र पाणलोट अंतर्गत येत असून या गावाची शेत जमीन मध्यम स्वरुपाची आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाअंतर्गत तालुका कृषी अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनात अनेक शेतात शेततळे पाणी अडविण्यासाठी बांध आदी व्यवस्था झाल्यामुळे व त्याचप्रमाणे प्रात्याक्षिके, शेतीशाळाचे आयोजन करण्यात आल्यामुळे शेतीच्या उत्पादनात भर पडली. आधुनिक शेती 
तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यामुळे शेतकर्‍यांत उत्पादकता वाढली. 

रब्बी हंगामास बियाण्याचा वापर करणे, खत व पाण्याचे नियोजन करणे, गव्हाचे प्रात्याक्षिके करणे, त्याच प्रमाणे कीटक नाशकाचा फवारा मारणे आदी कार्य राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियांनाअंतर्गत करण्यात आले. त्यामुळे रब्बीच्या उत्पादनात चांगली वाढ झाली आहे.

गव्हाचा सिंचनाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले.इतकेच नव्हे तर गव्हाच्या बियाणाला जिवाणू संवर्धन करुन पट्टा पध्दतीने गव्हाची पेरणी करण्यास शेतकर्‍यास प्रवृत्त केले. गव्हाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याच्या पाळयांचे नियोजन केले. त्यामुळे एकरी ४ ते ५ क्विंटल गव्हाचे उत्पादन जास्त झाले.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत तालुका कृषी अधिकार्‍यांचा मार्गदर्शनांखाली शेतीची मशागत केल्यामुळे गव्हाच्या उत्पादनात ४ ते ५ क्विंटलची वाढ झालेली आहे. यापूर्वी गव्हाचे उत्पादन केवल ६ ते ७ क्विंटल होती. 

'महान्यूज'

No comments:

Post a Comment