Pages

Friday, July 22, 2011

गादीवाफा पद्धतीचा कांदा पिकाला फायदा


या वर्षी कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने शेतकऱ्यांची नजर आता कांदा पिकाकडे वळतेय. मात्र हे पिक घेताना पारंपारिक पद्धती ऐवजी संशोधन केंद्रान शिफारस केलेल्या गादीवाफा पद्धतीने उत्पन्न घेतल्यास चांगल्या प्रतीच भरगोस कांदा उत्पादन घेता येत. याच शिफारशींचा वापर पुणे जिल्ह्यातील ओतूर भागातले अनेक शेतकरी करताना दिसत आहेत.
पिंपळवंडीच्या मंगेश वामन यांनी रब्बी कांद्याची लागवड गादी वाफा पद्धतीन सुरु केलीय. यात ठिबक सिंचनाचा वापरही त्यांनी प्रामुख्यान केलाय. यामुळं शेतमजुरी तर वाचणारच आहे. त्यासोबतच वीज भारनियमन असतानाही कांद्याला पाणी देता येणार आहे. कांद्याचं पिक या वर्षी फायदेशीर ठरताना दिसतंय. त्यामुळं मंगेश वामन यांच्या प्रमाणेच इतर शेतकरीही याच पद्धतीचा वापर करताहेत.
कांदा पिक गादी वाफ्यावर घेतल्यान रोगांचा आणि किडीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पन्न चांगल्या प्रतीच मिळतं. जुन्नर तालुक्यातल्या ओतूर परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा पिक घेतलं जातं. राजगुरुनगर मधल्या कांदा, लसून अनुसंशाधन केंद्रानं शेतकऱ्यांना कांदा पिकाच्या लागवडीविषयी अद्ययावत असं तंत्रज्ञान उपलब्ध केलेलं आहे. याची माहिती शेतकऱ्यांनी देणं आवश्यक आहे. या केंद्रानेही गादी वाफ्यावरच्या लागवडीलाच शेतकऱ्यांनी प्राधान्य द्यावं असं म्हटलंय.
 गादी वाफ्यामुळं जमीन जास्त काळ भुसभुशीत राहते. जमीन तुडवली जात नाही. ही लागवड पद्धतही अगदी सोपी आहे. गादी वाफ्याची उंची ४५ सेंटीमीटर असावी आणि चर ३० सेंटीमीटर असावा. दोन गादीवाफ्या मधल अंतर १ मीटर असायला हवं. त्यावर ठिबक सिंचनाच्या दोन नळ्या अंथराव्या. ठिबक सिंचनाचा वापर केल्यानं पाण्याचा अपव्यय तर टळतोच सोबतच यातून खताची मात्राही देतायेते. यामुळं प्रत्येक रोपाला योग्य रितीन पाणी आणि खत देता येतं.


कांदा उत्पादन घेतल्यावर ते साठवण्याची पद्धतही महत्वाची ठरते. याकरीता कांदा चाळ योग्य रितीन उभारलेली असनही गरजेच आहे. या वर्षी अवकाळी पावसान कांदा पिकाच मोठ्या प्रमाणावर नुकसान केल आहे. या पार्श्वभूमीवर ही गरज अधिकच प्रकर्षान जाणवते. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीन कांदा पिक घेतलं अशाच शेतकऱ्यांना कांद्यातून पैसे मिळू शकले हेही तितकच खरं...

No comments:

Post a Comment