Pages

Tuesday, November 1, 2011

शेतकऱ्याची मुलगी ठरली ७ अब्जावं बाळ

लखनौ : एका गरीब शेतकऱ्याच्या घरी जन्माला आलेलं कन्यारत्न म्हणजेच नरगिस ही मुलगी जगातील ७ अब्जावं बाळं म्हणून निवडली गेली आहे. भारतात मुलींच्या भ्रूण हत्येवर लक्ष केंद्रित करण्याचा हा उद्देश आहे. बाल हक्कांसाठी काम करणाऱ्या प्लान इंटरनॅशनलच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मळगाव येथे नरगिस ही मुलगी सकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी जन्माला आली.

नरगिस ही मुलगी जगात जन्माला येणारं ७ अब्जावं बाळ आहे.प्लान इंटरनॅशनलच्या मते नरगिसला प्रतिकात्मक म्हणून निवडण्यात आलंय, कारण जगात ७ अब्जावं कोणतं बाळ जन्माला आलं, हे सांगण कठीण आहे.

फिलिपाईन्समध्येही मनिलात जन्माला आलेल्या एका मुलीला प्रतिकात्मक म्हणून ७ अब्जावं बाळ म्हणून घोषित करण्यात आलंय. भारतात प्रत्येक मिनिटाला ५१ मुलांचा जन्म होतो. त्यातील ११ मुलंही सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशात जन्म घेतात.