Pages

Wednesday, February 21, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 21/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ सकाळी......*

काल जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती ती बर्‍यापैकी निवळली असून आज दिवसभरात महाराष्ट्रावर वातावरण स्वच्छ व निरभ्र राहील.

खालील सॅॅटेलाइट फोटो क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील उत्तर भाग ज्यामध्ये सर्व जिल्हे येतात....

ठाणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अशा सर्व जिल्ह्यात....

दक्षिणेकडील सिंधुदुर्ग-गोवा कोल्हापूर सांगली साताराचा काही भाग रत्नागिरी सोलापूर या भागात वातावरणात बाष्प काही प्रमाणात टिकून आहे.. त्यामुळे साधारण उकाडा जास्त जाणवेल......!

तसेच,

खलील सॅटेलाइट फोटो क्रमांक दोनमध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर......म्हणजेच खालील फोटो मध्ये शून्य अंशांची जी रेषा आहे.. तिथपासून दहा अंशांच्या रेषेपर्यंत उत्तर व दक्षिण या दोन्ही भागात म्हणजेच "विषुववृत्तीय" प्रदेशात ढगांची एकदमच दाटी कालपासून वाढली असून येणाऱ्या काळात ही चिंतेची बाब असू शकते......

कारण सध्या वाऱ्याचा वेग व दिशा नैऋत्येकडून हिमालयाकडे असल्याने यातील काही दाट ढग हे पुढील काळात म्हणजेच पुढील महिन्यात भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या भूपृष्ठावर येऊन अवकाळी पाऊस घेऊन येण्याची शक्यता आहे.....

भारत सरकारने सूचना दिल्याप्रमाणे येत्या एक-दोन  दिवसानंतर पाऊस व गारपिटीची शक्यता आहे....
*पण* परिस्थिती एवढी भयानक नाही.
कारण सद्यस्थितीला तरी उत्तरेकडून व दक्षिणेकडून ढगांची आगेकूच महाराष्ट्रावर दिसत नाही.
कदाचित आज-उद्या परिस्थिती बदलू शकेल पण परिस्थिती खूपच भयानक असेल असे वाटत नाही.
सर्व समाज माध्यमांमधून व tv चॅनल्समधून जे भासविण्यात येत आहे तेवढी परिस्थिती भयानक असेल असे वाटत नाही तरीही शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली बरी......

खालील व्हिडिओ मध्ये आम्ही आपणास गेल्या 24 तासातील ढगांची व वातावरणातील बाष्प यांची परिस्थिती दाखवीत आहोत...

यातून असा निष्कर्ष निघतो की सध्या तरी वातावरण हे पूर्णपणे शांत असून एक दोन दिवस असेच शांत राहण्याची शक्यता आहे........!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

No comments:

Post a Comment