Pages

Thursday, February 22, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 22/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट फोटो क्रमांक -१ मध्ये दिसत असल्याप्रमाणे उत्तरेकडून हवेचा दाब हा वाढला असून किंचित प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रावर साधारण थंडी आज जाणवत असेल.

कोल्हापूर सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प उत्तरेकडून सरकत आले असून आज बहुतेक महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पहाटे थोडेफार धुकेे दिसून आले असेल.

ही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा असून पुढील काळात काबुल,मुलतान, श्रीनगर या भागातील म्हणजेच पाकिस्तान भागात असलेले थंडगार ढग खाली सरकत पंजाब,राजस्थान, गुजरात/मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रावर येऊ शकतात.

दुसरी एक शक्यताही असू शकते जी म्हणजे येणाऱ्या काळात म्हणजेच एक-दोन दिवसात बहरीन,कतार व मस्कत या भागावरील जे दाट ढग आहेत तेसुद्धा कराची, भुज या  मार्गे महाराष्ट्रात येऊ शकतात.

सरकार व प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या सूचनेनुसार वरील दोन शक्यता असून या शक्यतेमुळेच अवकाळी पाऊस व गारपीट होऊ शकते.

तिसरी ही एक शक्यता आहे ती म्हणजे सोमालिया देशाजवळ व लक्षद्वीप मालदीवच्या खाली जे वादळ सदृश्य ढग आहेत ते जर नैर्ऋत्य दिशेकडून येणार्‍या वाऱ्याबरोबर महाराष्ट्रावर आले तर मग अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकतात.
पण ही शक्यता कमी वाटते कारण हवेचा दाब उत्तरेकडून दक्षिणेकडे सध्यातरी दिसत आहे.

सॅटेलाइट फोटो क्रमांक-२ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागावर किरकोळ ढगाळ वातावरण दिवसभर बनून राहील....


कोकण विभागातील रत्नागिरीचा सह्याद्री पर्वताकडील भाग किरकोळ ढगाळ राहील.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा बहुतांशी भाग, सातारा जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग,
सांगली जिल्ह्याचा शिराळा वाळवा पलूस कडेगाव हा भाग....
कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
सोलापुरातील कर्नाटक सीमेवरील काही तालुके हे दिवसभर ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा बहुतांश भाग,
नंदुरबार जवळजवळ सर्व भाग,
धुळे जिल्हाचा उत्तरेकडील सीमेवरील भाग,
जळगाव जिल्हा बऱ्यापैकी संपूर्ण भाग किंचित ढगाळ राहील.

मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्याचा पुणे जिल्ह्या लगतचा जो भाग आहे तो सोडून उर्वरित सर्व भाग,
बीड जिल्ह्याचा पूर्वेकडील सर्व भाग,
औरंगाबादचा काही भाग, लातूरचा पश्चिमेकडील भाग, उस्मानाबादचा निम्मा दक्षिणेकडील भाग,
परभणी,बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.

विदर्भात यवतमाळ जिल्ह्याचा  पश्चिम भाग जास्त ढगाळ वातावरण राहू शकते,
अकोला चा बहुतांशी भागही ढगाळ वातावरण असेल, तसेच हिंगोली जिल्हा बऱ्यापैकी ढगांनी व्यापलेला असेल.

घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत व वेळच्या वेळी किंबहुना वेळेच्या आधीच आम्ही तुम्हाला सर्व माहिती व सखोल मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हांला येणाऱ्या परिस्थितीवर थोडीफार तरी मात करता येईल.......!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

No comments:

Post a Comment