Pages

Thursday, October 6, 2011

समाजात मांगल्य निर्माण करू या - मुख्यमंत्री


अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद यासारख्या कुप्रवृत्ती नष्ट करून समाजात मांगल्य निर्माण करू या, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि विजयोत्सवाचा सण आहे. दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तींच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण हा सण उत्साहाने साजरा करतो. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद याबरोबरच जातीभेद, वर्णभेद, धर्मांधता, अंधश्रद्धा याविरुद्ध लढण्यासाठी विजयादशमीचे पर्व प्रेरणादायक आहे. या पवित्र सणाशी अनेक पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ जोडले असले तरी याचे केवळ प्रतिकात्मक महत्व नाही, तर आपण सर्वांनी यानिमित्ताने एकत्र येऊन समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करून मांगल्याचे स्वागत करूया असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment