Thursday, October 28, 2010

1st - 4th November 2010 Baramati Agri Expo-Haritkranti 2010

Baramati Agri Expo-Haritkranti 2010 is being organized for showcase the latest trends, products, services, research and development, opportunities and innovations in the agricultural world. This exhibition it will add the knowledge to the end user. The aim of the exhibition is to provide a common platform where ideas will be exchanged and business opportunities will be in abundance.

Hon. Sharadchandraji Pawar, The Baramati Agri Expo-Haritkranti 2010 will be inaugurated at the auspicious hands of Hon.   Shri.  Sharadchandraji Pawar, Union Minister of Agriculture and Consumer Affairs, Food and Public Distribution.Govt.of India.Venue

Start Date   : 1st November -2010               End Date   : 4th November -2010

Venue         : Agricultural Produce Market Committee Grounds, Jalochi, Baramati

City             : Baramati     Dist     : Pune     State     : Maharashtra

विदर्भातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न, तसेच यंदा कापसाचे चांगले आलेले पीक यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा झाल्याचा दावा कृषिमंत्री शरद पवार यांनी आज केला.अर्थविषयक संपादकांच्या परिषदेमध्ये पवार यांचे भाषण झाले. तसेच त्यानंतर झालेल्या प्रश्नोत्तरामध्ये पवार यांनी कृषिविषयक माहिती दिली. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाय योजले आहेत. पंतप्रधान, तसेच राज्य सरकारने स्वतंत्र पॅकेज त्यांच्यासाठी लागू केले. त्याचप्रमाणे व्याजमाफी, कर्जमाफी असे उपायही योजण्यात आले. विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न हा केवळ यवतमाळ जिल्ह्य़ापुरता मर्यादित होता. या वर्षी येथे कापसाचे चांगले पीक आले आहे. तसेच त्याला किंमतही चांगली म्हणजे प्रतिक्विंटल चार हजार रुपये मिळाली आहे. त्यामुळे येथील शेतक ऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली आहे.

Saturday, October 23, 2010

Union Agriculture Minister asks states to take steps for maximum rabi production

National  Conference of Agriculture, Animal Husbandry and Food-Civil Supplies Ministers  of various states at Jaipur


Shri Sharad Pawar, Union Minister of Agriculture, Consumer Affairs, Food and Public Distribution today asked States to make efforts for achieving maximum production of rabi crops such as wheat, pulses and oilseeds.
While inaugurating National Conference of Agriculture, Animal Husbandry and Food-Civil Supplies Ministers of various states at Jaipur, Shri Pawar said, "Monsoon this year has been good in the entire country, barring Eastern Uttar Pradesh and Jharkhand, and it will surely benefit the upcoming rabi crop. We will have to work with good planning to get maximum production.
He said that a proper and effective planning should be made to achieve targets of agricultural production.
It is also aiming substantial increase in pulses output to reduce import dependence. On the back of good monsoon, the country’s foodgrains production is estimated to rise to 114.63 million tonnes in the 2010-11 kharif season from 103.84 million tonnes in the same season of the last crop year.
While emphasising to encourage farmers to go for pulses crop, Agriculture Minister said, “to increase production level of pulses crop is a big challenge due to some certain reasons which included low price also, but it can be done if sowing area in middle and Eastern parts of the country is broaden. The Minister also said that the Centre has made some amendment in crop insurance scheme with an aim to benefit small and marginal farmers.
Minister of State for Agriculture Prof K. V. Thomas said the circumstances are in favour now to boost agricultural production following good rains this season. Agricultural Ministers of Rajasthan, Madhya Pradesh, Maharashtra, West Bengal and officials from Punjab, Uttar Pradesh, Bihar and Gujarat took part in the two-day conference which began today to discuss rabi crop prospects and its preparedness.
Secretary, Department of Agricultural Research and Education, and DG, ICAR Dr. S Ayyappan made a presentation and explained the strategies for achieving target production of rabi crops such as wheat, pulses and oilseeds. He also highlighted the other issues like use of fertilizers, awareness among farmers about seed replacement, to minimize the loss due to terminal heat at the time of harvest, etc.
During this two day agriculture ministers' conference, the minister will discuss about fertilizers, rabi crop, electricity, improving the quality and quantity of agriculture and seeds.The availability of fertilizers, seeds, etc would also be reviewed at the two-day conference.
From ICAR.

Thursday, October 7, 2010

कृष्णा-वारणा संगमाचा रंग हळदीला..

३०० वर्षांपूर्वी थोरले चिंतामणराव अप्पासाहेब पटवर्धन यांनी सांगलीची उभारणी केली. एखाद्या नवयुवतीला शोभेल अशा शृंगाराप्रमाणे अखंड नटलेली व सजलेली नगरी म्हणून ‘सांगली’ ओळखली जाते. चहूबाजूंनी कृष्णा खोऱ्यातील खळखळणाऱ्या नद्यांचा साज व ऊसशेतीचा हिरवागार शालू परिधान केलेला हा परिसर उद्योग-व्यवसायाबाबतीत पिछाडीवर असला तरी शेतीमालाची एक मोठी बाजारपेठ म्हणून आपली ओळख टिकवून आहे. नाटय़पंढरीबरोबरच कला, क्रीडा, शिक्षण व सहकार क्षेत्रात सांगलीने मोठी भरारी घेतली आहे. परंतु सांगलीची खरी ओळख म्हणजे पिवळयाजर्द हळदीचे गाव...

Tuesday, October 5, 2010

शेती व्यवसायातून धरली प्रगतीची कास

आपल्या देशाची अर्थव्यवस्था कृषी व तत्सम उद्योगावर आधारलेली आहे. विकसनशील भारताला विकसिततेकडे नेण्यात शेतीचा महत्वाचा वाटा आहे. शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन आज बदलत आहे. शेती व शेतीपूरक व्यवसायात मोठय़ा प्रमा‌णात रोजगार देण्याची क्षमता आहे. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुन बहुपीक पध्दत, फळझाडांची लागवड करुन जास्तीत जास्त उत्पादन घेण्याचे काम काही शेतकरी करीत आहेत. अनुभवाने आि‌ण शेतीत विविध प्रयोग राबवून इतरांना मार्गदर्शन करुन त्यांना जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे वळवित आहेत.

भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यामध्ये जांब नावाचे गाव आहे. गावातील दिवाकर पांडुरंग पवार या शेतकर्‍याने शेती व्यवसायात नवा आदर्श निर्माण केला आहे. पवार यांनी परंपरागत शेती पध्दतीला फाटा देत आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची कास धरली आहे. शेतीपूरक व्यवसाय सुरु करुन सधनकडे वाटचाल केली आहे. श्री. पवार हे सोरणा, लोहारा, लंजेरा, देऊळगाव, खैरलांजी, धोप व पिटेसूर या परिसरातील शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्या शेतीत सुध्दा आमुलाग्र बदल घडविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

श्री. दिवाकर पवार हे वयाच्या २२ व्या वर्षापासून शेती व्यवसाय करतात. त्यांच्या संयुक्त कुटुंबात पूर्वी ११.२ हेक्टर शेती होती. नवनवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर तसेच सेंद्रीय शेती करुन उत्पादनामध्ये वाढ केली आहे. कमी खर्चाची शेती करुन जास्तीत जास्त उत्पादन घेऊन त्यांनी २५.२ हेक्टर जमीन विकसित केली आहे. केवळ धान या एकाच पिकावर अवलंबून न राहता आवळा, आंबा, विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. रोग व किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक औषधीचा कमीत कमी वापर करुन जास्तीत जास्त सेंद्रिय, जैविक व वनस्पती औषधांचा वापराकडे त्यांचा कल आहे.

बागायती पिके घेताना पाण्याचे योग्य नियोजन करुन ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केला आहे. त्यामुळे जमिनीची धुप थांबविली गेली आहे. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी निम, करज, महुआ, कुसूम व ऐरंडी पिकांचे उत्पादन घेण्यात आले आहे. सन २००६-०७ पासून श्री. पवार हे महाबीजचा बिजोत्पादन कार्यक्रम राबवून उत्तम प्रकारचे बियाणे उत्पादित करुन पुरवठा करतात. एकात्मिक किड व्यवस्थापना अंतर्गत प्रकाश सापळे, चिकट सापळे, फेरोमन सापळे, पक्षी थांबे यांचा वापर करुन किडीचे व्यवस्थापन करतात.

पिक उत्पादन वाढीसाठी शेतात ड्रममध्ये गांडुळाव्दारे व्हर्मीवॉश तयार करुन त्याचा वापर संजीवके, बुरशीनाशके म्हणून करतात. श्री. पवार यांनी एक एकर निकृष्ट जमिनीमध्ये आवळा व सागवान झाडाची लागवड केली आहे. फलोत्पादन योजनेअंतर्गत ५ हेक्टरवर राष्ट्रीय फलोत्पादन योजने अंतर्गत उती संवर्धनाचा वापर करुन चांगले उत्पादन घेतले आहे. तसेच एक हेक्टर क्षेत्रावर केळीची बाग ठिबक सिंचनाचा वापर करुन फुलविली आहे. अर्धा एकरवर आंबा, चिकू, लिंबू, पेरु व डाळिंबाच्या झाडाची लागवड केली आहे. शेतीपूरक व्यवसायाची जोड म्हणून गावरान गाईपासून घरीच जरशी गाई तयार करुन दुग्ध उत्पादन सुरु केले आहे.

श्री. पवार हे शेतीसोबतच ग्रामोत्थानासाठी प्रयत्नशील आहेत. महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम समितीचे उपाध्यक्ष असून गावकर्‍यांच्या सहकार्याने जांब गावाला तंटामुक्तीचा ४ लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, वृक्षारोपण तसेच शासनाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची व योजनांची अंमलबजावणीत ते नेहमीच तत्पर असतात. कृषी क्षेत्रातील बहुमोल योगदानाबद्दल राज्य शासनाने त्यांना १९९८ या वर्षी शेतीनिष्ठ शेतकरी म्हणून सन्मानित केले आहे. तसेच त्यांना २००८ च्या कृषी भूषण शेतकरी पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

जीवनदायी शेततळे शेतकऱ्याला फायदेशीर.

परभणी जिल्ह्यात गेल्या २ वर्षात १५७ सामुहिक तर १८०० वैयक्तिक स्वरुपातील शेततळे घेण्यात आली आहेत. अनियमित पर्जन्यमानावर मात करण्यासाठी शेततळे फायद्याचे ठरले आहे. पिकांना योग्य वेळी पाणी देण्याबरोबरच मत्स्य व्यवसायासारखा जोड व्यवसायही करुन आपल्या उत्पन्नात भर घालता आली आहे.

कृषि विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना वरदान ठरणारे शेततळे करण्यासाठी योजना कार्यान्वित असून याचा संपूर्ण खर्च शासन करते. परभणी जिल्हयात अनियमित पर्जन्यमान असल्यामुळे पाण्याअभावी अनेक भागातील पिके वाळून जातात. यावर मात करण्यासाठी ज्या शेतकर्‍यांनी शेततळे घेतले त्यांच्या शेतीतून मोठय़ा प्रमाणावर उत्पन्न निघाले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी डॉ. व्ही.सी. कुडमुलवार म्हणाले, शेततळ्याचे दोन प्रकार असून राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकर्‍यांना संयुक्तरित्या तसेच राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत वैयक्तिक स्वरुपावर शेततळे घेता येतात. परभणी जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात १५७ सामुहिक तर १८०० वैयक्तिक स्वरुपातील शेततळे घेण्यात आली आहेत. या दोन योजनेसोबत महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत प्रत्येक तालुक्यात २०० याप्रमाणे जिल्ह्यात १८०० शेततळे घेण्यासंदर्भात उद्दिष्ट आहे.

सर्वसाधारणपणे ३० मीटर रुंद, ३० मीटर लांब व ३ मीटर खोलीचे शेततळे घेण्यात येते. यासाठी शासनाच्या वतीने ८२ हजार २६० रुपयांचे अनुदान देण्यात येते. प्रारंभी शेतकर्‍यांनी स्वत:च्या खर्चातून हे शेततळे पूर्ण करावयाचे आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर कृषि विभागाच्या वतीने पाहणी करुन अनुदान धनादेशाद्वारे देण्यात येते. लहान शेतकर्‍यांनी संयुक्तरित्या या शेततळ्याचा लाभ घेतल्यास त्यांच्या जीवनात खर्‍या अर्थाने क्रांती घडेल. सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील विष्णू सोळंके या शेतकर्‍याने स्वत:च्या शेतात शेततळे घेतले आणि या माध्यमातून मच्छीमारीही केली. अन्य शेतकर्‍यांसाठी हे एक चांगले उदाहरण म्हणावे लागेल.

परभणी जिल्ह्यात महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १८०० शेततळ्याचे उद्दिष्ट असले तरीही लाभक्षेत्रामुळे पूर्णा, सोनपेठ, पाथरी, परभणी, गंगाखेड या तालुक्यात शेततळे घेण्यास मर्यादा पडत आहेत. लाभक्षेत्रामध्ये (कमांड एरियामध्ये) शेततळे घेऊ नयेत असे शासनाचे स्पष्ट आदेश आहेत. त्यामुळे नवीन शेततळे घेण्यास बर्‍याच मर्यादा पडत आहेत.

जिल्ह्यात गेल्या काही वर्षात पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणावर असमतोल झाल्यामुळे पर्जन्यमान अनियमित होत आहे. परिणामी अवर्षण परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे शेततळे त्यावर चांगला पर्याय ठरत आहे. शेततळे घेतलेल्या शेतकर्‍यांनी खरीप व रब्बीच्या पिकांना योग्यवेळी संरक्षित पाणी दिल्यास त्याचा त्यांना लाभ झाल्याचे दिसून आले.

संयुक्त शेततळे घेण्यासाठी ८ ते १० शेतकरी एकत्र आल्यास जमिनीची वरची बाजू लक्षात घेऊन त्या ठिकाणी ४४ मीटर रुंद, ४४ मीटर लांब आणि ५.२ मीटर उंची असलेले शेततळे सामुहिकरित्या घेण्यात येते. या संयुक्त शेततळ्याचा शेतकर्‍यांना चांगला लाभ झाला. राष्ट्रीय कृषि विकास योजने अंतर्गत सध्या ४६३ शेततळे प्रस्तावित असून त्यापैकी १९७ शेततळी पूर्ण झालेली आहेत. तसेच महाराष्ट्र रोजगार हमी योजने अंतर्गत १२०० पैकी ८९ शेततळे पूर्ण झाली आहेत. जीवनदायिनी शेततळ्याचा लाभ घेऊन शेतकर्‍यांनी आर्थिकदृष्टय़ा सक्षम होण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद