Thursday, September 23, 2010

कीटकनाशकांचे व बुरशीनाशकांचे त्यांच्या क्रीयेनुसार पडणारे प्रकार.

१) स्पर्शजन्य (Contact Action) : ओषध फवारल्यानंतर किडीला स्पर्श होताच स्पर्शाने कीड मारते.
२) अंतरप्रवाही (Systemic) : ओषध फवारल्यानंतर झाडाच्या रसामध्ये मिसळून संपूर्ण वनस्पतीत पसरते. अन्नावते किडीच्या पोटामध्ये गेल्यानंतर कीड पोटविषाने  मरते.
३)  धुरी (Fumigent) : ओषद फवारल्यानंतर त्याच्या वाफा (Fumes) येतात. त्या किडीच्या श्वासावाटे आत जावून श्वासनलिकेत अडकून राहतात व कीड गुदमरून मरते.

Saturday, September 18, 2010

टोमॅटो सिटी मंगरुळ

उत्पन्न कमी आणि खर्च अधिक, असे समीकरण झाल्याने शेती करणे सध्या परवडणारे नाही असा समज शेतकर्‍यांमध्ये निर्माण होताना दिसतो. अशातच विदर्भात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याने या मत प्रवाहात भर पडली आहे. अशाही परिस्थितीत बुलडाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील मंगरुळ (इसरुळ) येथील शेतकर्‍यांनी पारंपरिक पिकांना फाटा देत टोमॅटोचे विक्रमी उत्पादन घेऊन सबंध जिल्ह्यात आपल्या गावाची ओळख टोमॅटो सिटी अशी निर्माण करुन नवा आदर्श घालून दिला आहे.

मंगरुळ येथील एक नव्हे तर शेकडोच्या संख्येत शेतकर्‍यांनी शेतीला नवा आयाम देत टोमॅटो उत्पादनाची कास धरली आहे. सबंध विदर्भात ज्या समस्यांना शेतकर्‍यांना सामोरे जावे लागते, त्या समस्या येथील शेतकर्‍यांपुढे सुध्दा आ वासून उभ्या असतात. अत्यल्प पावसाने पाण्याची कमतरता, त्यातच ग्रामीण भागातील १४ तासाचे भारनियमन, कधी निसर्गाची अवकृपा अशा सर्वव्यापक समस्यांना खंबीरपणे सामोरे जात येथील शेतकरी न खचता शेतीत राबतो. कधी काळी या गावाची ओळख पारंपरिक पिक घेणारे तर नंतर मिरचीचे उत्पादन घेणारे म्हणून होती. बाजारपेठ, उत्पन्नासाठी लागलेल्या खर्चाच्या तुलनेत कमी मिळणारा भाव यामुळे मिरचीचा तिखटपणा त्यांना सोसणारा राहिला नाही. अशा परिस्थितीत त्याच पिक उत्पादनाला चिटकून बसणे येथील शेतकर्‍यांनी सोडून दिले आणि वेगळा प्रयोग म्हणून टोमॅटो उत्पादनाचा मार्ग स्विकारला. पाहता पाहता या गावाने टोमॅटो सिटी म्हणून जिल्हाभरात नावलौकिक मिळविला.

गेल्या २० वर्षांपासून येथील शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेत आहेत. सध्याच्या परिस्थितीत १५० पेक्षा अधिक शेतकरी सुमारे ४०० एकरावर टोमॅटोचे उत्पादन घेतात. या उत्पादनाच्या बळावर येथील शेतकर्‍यांनी विदर्भाच्या सर्वच बाजारपेठा काबिज केल्या आहेत हे विशेष. माल कुठे न्यायचा, कोणाला द्यायचा याचा निर्णय शेतकरीच घेतात. मंगरुळ येथील शेतकरी प्रामुख्याने जून महिन्यात पिकाची लागवड करतात. लागवड करायची आणि सोडून द्यायचे हा येथील शेतकर्‍यांचा स्वभाव नाही. रोपाच्या निर्मितीपासून ते पिक पूर्ण होईपर्यंत डोळ्यात अंजन घालून त्याची निगा राखण्याचे काम ते करतात. टोमॅटो उत्पादन घेताना उत्पादन कसे वाढेल याकडे त्यांचा कटाक्ष असतो. सोबतच माती परीक्षण, कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घ्यायला ते विसरत नाहीत.

आज सर्वत्र महागाई वाढल्याने सामूहिक शेतीचे वारे वाहू लागले आहे. अशी सहकारयुक्त शेती येथील उत्पादक अनेक वर्षांपासून करीत आले आहेत. या शेतकर्‍यांनी चिखली तालुका गजानन टोमॅटो व भाजीपाला उत्पादक संघाची स्थापना केली आहे. त्या संघाच्या माध्यमातून माल कोठे न्यायचा, कधी भरायचा याचे नियोजन केले जाते. शिवाय माल विक्रीसाठी सर्व शेतकरी जात नाहीत. मॅटेडोअर भरले की, एक किंवा दोन शेतकरी त्याबरोबर जातात आणि सर्वांचा माल विकून येतात.

शेती करताना येणार्‍या अडचणींचा पाढा वाचण्याऐवजी त्यावर तोडगा शोधण्याचे काम येथील शेतकरी करतो. या भागातील शेतकर्‍यांवरील विश्वास वाढल्याने राष्ट्रीयकृत बँका कर्ज देत आहेत. येथील टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना २५ ते ३० हजारापर्यंत कर्ज पुरवठा केला जातो. शेतकर्‍यांच्या या प्रयत्नामुळे मंगरुळ या गावाला टोमॅटो सिटी म्हणून मिळालेले नाव समर्थ झाले आहे.

'महान्यूज'मधील मजकूर

Monday, September 13, 2010

आधुनिक पोल्ट्री व्यवसायाने दिली उभारी / Modern poultry business.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेडी विकासासाठी खेडय़ांकडे चला हा संदेश दिला होता. या संदेशाचा आधार घेऊन राज्य तसेच केंद्र सरकारच्या ग्रामीण विकासाच्या विविध योजना सुरु आहेत. शिक्षण घेऊन युवकांनी शहराकडे धाव न घेता खेडेगावातच रोजगार निर्माण व्हावा यासाठी शासनाने रोजगार निर्मितीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील विश्वनाथ आत्माराम सूर्यवंशी या आदिवासी युवकाने बीज भांडवल योजनेच्या पैशातून व्यवसाय सुरु केला आहे. या व्यवसायामुळे विश्वनाथ समाधानी असून इतर युवकांना तो प्रेरणादायक ठरत आहे.


स्पर्धेच्या युगात शिक्षण घेऊन नोकरीसाठी वणवण भटकण्यापेक्षा गावातच रोजगार शोधावा यासाठी विश्वनाथने प्रयत्न केला. १२ वी पर्यंत शिक्षण घेऊन तो स्वयंरोजगाराच्या शोधात असताना मोठय़ा भावाच्या मित्राचा डांग सैंदाणे (नाशिक) येथील पोल्ट्री व्यवसायाने त्याला प्रभावित केले. तेथे काही दिवस राहून त्याने पोल्ट्री व्यवसायाचा अनुभव घेतला. जिल्हा उद्योग केंद्र नंदुरबारचे महाव्यवस्थापक एस.पी. वसावे यांनी बीज भांडवल योजनेची माहिती दिली. त्यातून विश्वनाथला १ लाख २१ हजार रुपये कर्ज मंजूर झाले. तसेच सेंट्रल बँक आष्टे येथून ४ लाख ९५ हजार रुपयांचे कर्ज घेऊन दोन वर्षापासून त्याने स्वत:च्या शेतातच पोल्ट्री व्यवसाय सुरु केला आहे.

शेतात २५ X २९ फुट आकाराची दोन पत्र्याची शेड उभी केली आहेत. शेडच्या भोवती लोखंडी जाळ्या बसविल्या आहेत. मालेगाव येथील सगुणा कंपनीकडून एक दिवसाची ९ हजार २०० बॉयलर सगुणा जातीच्या कोंबडीची पिले आणली. कोंबडीची पिले मोठी झाल्यावर त्याच्या विक्रीसाठी कंपनीशी करार केला आहे. त्यामुळे बाजारपेठेची सोय झाली आहे. बॉयलर सगुणी कोंबडीची जात ही मांसाहारी खवय्यांसाठी चवदार असल्याचे विश्वनाथने सांगितले. या कोंबडय़ा अंडी देत नाहीत. सद्या ९ हजार २०० बॉयलरची पिले या शेडमध्ये आहेत. पोल्ट्री फॉर्मला भेट दिली तेव्हा ही पिले १७ दिवसांची होती आणि प्रत्येकाचे वजन अर्ध्या किलोचे होते.

या बॉयलर कोंबडय़ांच्या पिलांचे केवळ ४५ दिवस पालन पोषण करावे लागते. या कालावधीत प्रत्येक कोंबडीचे वजन सरासरी २ किलो २०० ग्रॅमचे होते. सगुणा कंपनी ४५ दिवसाच्या कोंबडय़ा विक्रीसाठी मोठय़ा विक्रेत्यांकडे संपर्क साधते. यासाठी करारानुसार प्रत्येक किलोमागे ३ रुपये २५ पैसे विश्वनाथला कमिशन मिळते. मागच्या खेपेला त्यांनी सर्व मिळून १८ टन वजनाच्या ९ हजार ८०० कोंबडय़ा विक्रीस पाठविल्या. त्यातून ६० हजाराचे उत्पन्न मिळाले. कोंबडीचे खाद्य आधुनिक पध्दतीने पुरविले जाते. पिण्याच्या पाण्यासाठी ड्रिकर यंत्राची सोय केली आहे. शेडमध्ये विष्ठेपासून खत बनविले जाते. यासाठी गव्हाळे, भाताचा तूस, शेंगाचे टरफले यांचे जमिनीवर आच्छादन केले जाते. ४५ दिवसानंतर कोंबडय़ांची विक्री झाल्यावर विष्ठेपासून मिळालेले खत गोळा करुन जमिनीवर पाण्याचा फवारा मारुन ते स्वच्छ केले जाते.

वर्षातून ४५ दिवसाचे असे पाच वेळा उत्पन्न मिळविता येते. प्रत्येक वेळी ८० किलो खाद्याच्या ४२५ गोण्या लागतात. विहिरीचे पाणी एका टाकीमध्ये भरुन ते ड्रींकरमार्फत कोंबडय़ांना पिण्यासाठी पुरविले जाते. कोंबडय़ांच्या देखभालीसाठी २ मजूर मासिक वेतनावर ठेवण्यात आले आहेत. वीजनियमित मिळावी म्हणून भारनियमनाच्या कालावधीत जनरेटरची सोय करण्यात आली आहे. दोन वर्षाच्या कालावधीत सध्या ९ हजार २०० कोंबडय़ांची ९ वी बॅच सुरु आहे. स्वत:च्या दीड एकर शेत जमिनीत इतर पिकेही घेतली जातात.

पोल्ट्री आणि शेतीमुळे विश्वनाथ आणि परिवाराला शेतीतून वर्षभर रोजगार मिळत आहे. बँकेचा दरमहा ११ हजार रुपयांचा कर्जाचा हप्ता नियमित भरला जात आहे. विश्वनाथची मित्र मंडळी पोल्ट्री फॉर्मला भेट देऊन प्रसंशा करतात. गाव परिसरात विश्वनाथकडून युवकांना रोजगाराची प्रेरणा मिळत आहे हे मात्र नक्की.

'महान्यूज'मधील मजकूर.

दुग्धव्यवसायाने दिली समृध्दी / Dairy helps farmer.



बचतगट हा शब्द कोल्हापूर जिल्ह्यात परवलीचा शब्द झाला असून ही चळवळ आज जिल्ह्यातील खेडोपाडी रुजली आहे. ही चळवळ ग्रामीण जनतेचा श्वास बनली आहे. लोणची, पापडाच्या पारंपरिक जोखडातून मुक्त होवून चळवळीने आता खेडोपाडी चालणार्‍या सर्व व्यवसायात आपले स्थान पक्के केले आहे. महिलांच्या मनात तर या चळवळीने आपुलकीचे स्थान मिळवले आहे.

राधानगरी तालुक्यातील कुडुत्री गावच्या बचतगटाने म्हैस पालनाचा उपक्रम राबवून आज जिल्ह्यात एक आदर्शगट म्हणून नावलौकिक मिळवला आहे. या उपक्रमामुळे आज हा गट महिलांची उन्नती साधणारा, त्यांना स्वावलंबी बनवणारा उपक्रमशील बचतगट म्हणून जिल्ह्यात ओळखला जात आहे.

गावातील एक धडाडीचे कार्यकर्ते रामचंद्र चौगुले यांनी पुढाकार घेवून महिलांच्या बैठका घेवून, त्यांना प्रोत्साहन देवून ७ डिसेंबर २००६ रोजी या बचतगटाची स्थापना केली. सुरवातीला महिलांचा प्रतिसाद अत्यंत कमी होता. परंतु त्यांचे मन वळविण्यात त्यांना यश आले. मालुबाई डवर या एका उत्साही गावच्या महिलेस त्यांनी अध्यक्षपद स्वीकारावयास लावून बचतगटाच्या कामकाजासंबंधी माहिती दिली. या गृहिणीने मग आपल्या गावातील भगिनींचे मन वळविण्याचे काम केले. यातूनच छाया मोहिते, अनुराधा कांबळे, छाया चौगुले, सुजाता डवर, सुलोचना डवर, अनुसया चौगुले, आनंदी जाधव अशा काही महिला एकत्र आल्या. सुरवातीस प्रथम मासिक ३० रुपये वर्गणी भरुन बचत गटाच्या कार्याचा शुभारंभ त्यांनी केला. अवघ्या पाच महिन्यातच गटाच्या अंतर्गत कर्ज देत छोटे मोठे व्यवसाय करत नियमीतपणे कर्जफेड करुन गटास त्यांनी उर्जितावस्था आणली.

गटाची ही चांगली कामगिरी पाहून राधानगरी पंचायत समितीनेही मग ग्रामीण विकास यंत्रणेकडून बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ५० हजार रुपयांचे कर्ज गटास दिले. हे ही कर्ज या गटाने अवघ्या सहा महिन्यात फेडून बँकेचा आणि ग्रामीण विकास यंत्रणेचा विश्वास संपादन केला. बँकेने गटाच्या अध्यक्षा मालुबाई डवर यांना बोलवून अधिक कर्ज देण्याची आपली तयारी दर्शवली. डवर बाईंनी आपल्या गटातील महिलांशी सल्लामसलत केली. गटविकास अधिकारी जी. एम. जाधव, ग्रामसेवक निलकंठ चव्हाण आणि सरपंच श्रीमती भारती रानमाळे यांचे मार्गदर्शन घेवून दुग्धव्यवसाय करण्याचा मानस व्यक्त केला. म्हैसपालन व्यवसायही या जिल्ह्यात चांगलाच चालतो. त्यामुळे गटाने हा उपक्रम करण्याचे निश्चित केले. गटातील सर्व महिलांना विश्वासात घेवून प्रत्येकी एक म्हैस घेण्यासाठी अडीच लाख रुपयांचे कर्ज दिले. दहाही सदस्यांनी प्रत्येकी एक म्हैस घेवून हा व्यवसाय सुरु केला. हा गट गावातील डेअरीस दररोज सरासरी १५० ते २०० लिटर दुध देत असतो. हे अडीच लाखाचे कर्ज या गटाने मुदतीआधीच फेडले. त्यामुळे या गटाने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

सामाजिक कार्यातही हा गट मागे नाही. केवळ आपली प्रगती साधून हा गट गप्प बसला नाही तर सामाजिक बांधिलकी ओळखून गरीब, गरजू, बेरोजेगार महिलांच्या उन्नतीसाठीही हा गट कार्य करत आहे. शिवण क्लासचे वर्ग हा गट चालवित आहे. निर्मलग्राम, तंटामुक्त ग्राम योजना, दारुबंदी, गुटखा, मटकाबंदी आदी कार्यातही हा गट सहभागी होवून कार्य करीत आहे. विविध शासकीय योजनांची माहिती ग्रामस्थांना देवून त्यांना या योजनांमध्ये सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न हा गट करत आहे. या गटाच्या महिलांना वेळोवेळी दिलेल्या प्रशिक्षणामुळे हा गट म्हणजे महिला बळकटीकरणाचे एक सक्षम उदाहरण ठरले आहे.

'महान्यूज'मधील मजकूर.

Sunday, September 12, 2010

अन्नसुरक्षा अभियानाने केला शेतकर्‍यांचा फायदा

कृषी विभागाच्या अन्नसुरक्षा अभियाना अंतर्गत हरभरा पिकातील कामगंध सापळ्याचा फायदा अनेक गावातील शेतकर्‍यांनी घेतला. रानबोडी तसेच हरदोली (नाईक) या गावातील अनेक शेतकर्‍यांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव होता. मात्र कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांना विविध योजना तसेच किड सर्वेक्षणाची माहिती दिली.

पांरपरिक पद्धतीने शेती केल्यामुळे शेतकर्‍यांना म्हणावे तसे उत्पादन मिळत नव्हते. तेव्हा कृषी विभागाच्या वतीने अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत गावागावात सभा घेऊन शेतकर्‍यांना विविध योजनांची तसेच किड सर्वेक्षणाबद्दल माहिती देण्यात आली.

नागपूर जिल्ह्याच्या कुही तालुक्यातील रानबोडी गावातील विनोद हिरामन ठाकरे तर हरदोली (नाईक) गावातील महादेव उरकुडा थोटे या शेतकर्‍यांचा हा अनुभव त्यांच्याच शब्दांत...

माझ्या शेतात घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढतच होता. अनेक शेतकरी त्यासाठी निंबोळी अर्काची फवारणी, पक्षी, थंड पेय याचा वापर करत होते. पण कामगंध सापळ्याबाबत त्यांना माहिती नव्हती. कृषी विभागाकडून त्यांना ही माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनंतर शेतात एकरी कामगंध सापळे लावण्याचे ठरवले. ते लावल्यानंतर एका सापळ्यात किमान आठ ते दहा घाटेअळीचे पतंग शेतकर्‍यांना सापडले. त्यामुळे सर्व शेतकर्‍यांमध्ये कुतुहल निर्माण झाले. एक पतंग एका दिवसाला ३५० ते ४५० अंडी घालतात. एका सापळ्यात सात ते आठ पतंग सापडले म्हणजे एकूण ३५०० अळ्यांचे नियंत्रण करण्यात आले. यामुळे फवारणीचा खर्चही कमी झाला आहे.

पाहता पाहता गावात याचा प्रसार झाला आणि प्रत्येक शेतकर्‍याने ही पद्धत अवलंबली. आता प्रत्येकाच्या शेतात कामगंध सापळे दिसू लागले आहेत. कमी खर्चाच्या पद्धतीत घाटेअळीवर नियंत्रण मिळवता येत असल्यामुळे सर्व शेतकरी आनंदी झाले आहेत.

'महान्यूज'मधील मजकूर .

Wednesday, September 8, 2010

बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival.

बैल पोळा हा असा सन आहे, की या दिवशी शेतकरी आपल्या साठी काम करणारे जे बैल आहेत त्याच्याविषयी कृत्द्न्यता व्यक्त करतो. त्यांचे पूजन करतो त्याच बरोबर इतर जनावाराचे पूजन करतो.बैल पोळयाच्या दिवशी त्यान्हा  कुठलेही काम लावले जाट नहीं.
बैल म्हणजेच नंदी हा साक्षात् महादेवाचे वहांन आहे. त्यामुळेच शेतकरी बैलाला सोमवार या दिवशी पण काम लावत नाहीत. हीच ती भारतीय शेतकर्यांची पारंपरिक संस्कृति आहे.


Monday, September 6, 2010

Most accurate weather forecasting for agriculture.

Weather is one of the key factors affecting prospects for crop production and commodity prices.
Because of the importance of weather to farmer and to all mahakrushi provides the most accurate weather forcasting for agriculture.You can able to check the updated weather reports for every 3 huors. To get the weather forcasting for your area please visit. http://mahakrushi.blogspot.com/p/weather-forecast.html

Sunday, September 5, 2010

INTERNATIONAL CROP AND WEATHER HIGHLIGHTS USDA/WAOB Joint Agricultural Weather Facility August 31, 2010

SOUTH ASIA – Highlight: Heavy Rain In India And Pakistan Continues
 Monsoon showers continue to exacerbate flooding for rice and cotton in Pakistan, while maintaining
excessive wetness in northern India.

U.S. Department of Agriculture Home Page . Home Page

U.S. Department of Agriculture Home Page . Home Page

Blue green algae/निळे-हिरवे शेवाळ (जिवाणु खत)

भात पिकाच्या अधिक उत्पादनासाठी निळे - हिरवे शेवाळ (जिवाणू खत)

प्रस्तावना
पिकांना नत्र खत दिल्यामुळे उत्पादनात बरीच वाढ होते. रासायनिक नत्र खतांच्या किंमती दरवर्षी वाढतच आहेततसेच शेतक�यांच्या आर्थिक अडचणीमुळे अनेकदा रासायनिक व सेंद्रीय खते देणे आवाक्याबाहेरचे झाले आहे.
भात पिकास नत्र खताची अत्यंत आवश्यकता असतेपरंतु भात पिकास दिलेल्या नत्राच्या मात्रेपैकी फक्त ३५ टक्के नत्रच भात पिकाला मिळते आणि उरलेला नत्र पाण्यावाटे खाली झिरपूनपाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून किंवा हवेत उडून जातो. अशावेळी भात पिकास खत देण्याचे असे तंत्रज्ञान हवे की,ज्यामुळे जास्तीत जास्त नत्र पिकाला मिळू शकेल. हवेतील मुक्त नत्र स्थिर करणा�या निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे वरील दोन्हीही उद्दिष्टये साध्य होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकेल.
या अपरिहार्य परिस्थितीवर तोडगा म्हणून गेल्या दशकात जिवाणू खतांचा वापर सुरु झाला. जिवाणू खतातील सजीव सूक्ष्म जंतू हवेतील नत्राचे पिकांना उपलब्ध होणा�या नत्राच्या स्वरुपात रुपांतर करतात. या कारणामुळे खत दुर्मीळतेच्या काळात या जिवाणू खतांचा वापर प्रचलित होऊ लागलेला आहे.
महाराष्ट्र राज्यात एकूण १.४२ दशलक्ष हेक्टर क्षेत्र भात लागवडीखाली आहे. बहुतांश शेतकरी अल्प भूधारक असल्यामुळे त्यांना महाग रासायनिक किंवा अन्य खते वापरणे आर्थिकदृष्टया परवडत नाही.
निळे-हिरवे शेवाळ
फांद्याविरहित लांबच लांब तंतूमय असणारी ही एकपेशीय पाणवनस्पती आहे. त्यांच्या पेशींमध्ये हरितद्रव्य असल्यामुळे सूर्यप्रकाशात या पेशी कर्बोदके तयार करतात व प्राणवायू पाण्यात सोडतात. या शेवाळाच्या शरीर रचनेत एक विशिष्ट कठीण व पोकळ अशी पेशी असते. त्यास हेटरोसिस्ट पेशी असे म्हणतात. या पेशीमध्ये मुक्त नत्र कार्यक्षमरित्या स्थिर केला जातो व तो नत्र नंतर भात पिकाला पुरविला जातो. त्यामुळे भात पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. नदीच्या पाण्यात किंवा साठलेल्या पाण्याच्या डबक्यात आपण अनेक प्रकारची शेवाळे वाढताना पाहतोपरंतु या सर्वच शेवाळात हेटरोसिस्ट पेशी नसतात. त्यामुळे नत्र स्थिरीकरणाचे कार्य ते शेवाळ करु शकत नाहीत. भात शेतीमध्ये ब�याच वेळा निळया-हिरव्या शेवाळांच्या जातींबरोबर इतरही काही हिरव्या शेवाळांची वाढ झालेली दिसून येते. अशा प्रकारची शेवाळे भात पिकास हानिकारक ठरतात. त्यांच्या तंतुची लांबीही खूप मोठी असते.

निळे - हिरवे शेवाळ सूर्यप्रकाशात स्वतःचे अन्न तयार करतेतसेच हवेतील नत्र स्थिर करुन मुक्त नत्र पिकांना उपलब्क्ध करुन देऊ शकते. निळया-हिरव्या शेवाळाच्या वाढीसाठी व नत्र स्थिर करण्यासाठी योग्य परिस्थिती उपलब्ध असेलतर सर्वसाधारणतः (निळे-हिरवे शेवाळ ) ३० किलो नत्र एका हंगामात दर हेक्टरी स्थिर करु शकते. त्याचप्रमाणे जमिनीत सेंद्रीय द्रव्यांची भर पडते व जमिनीचा पोत सुधारतो. जमिनीची धूप कमी होतेन विरघळणारा स्फुरद जास्तीत जास्त प्रमाणात विरघळविला जातो व पिकाच्या वाढीस उपयुक्त अशा वृध्दीसंप्रेरकांचा पुरवठाही केला जातो. रासायनिकनत्र खत एकदा पिकाला वापरल्यानंतर पीक वाढीसाठी नत्राचा उपयोग करुन घेते. त्यामुळे नत्राचे जमिनीतील प्रमाण कमी कमी होऊन नष्ट होतेपरंतु निळया-हिरव्या शेवाळाच्या बाबतीत वेगळेच आहे. पीक फक्त निळया-हिरव्या शेवाळाने जमिनीत स्थिर केलेला नत्रवृध्दीसंप्रेरके व पाण्यात सोडलेला प्राणवायू यांचाच वाढीसाठी व उत्पादनासाठी उपयोग करुन घेते. परंतु शेवाळ नष्ट किंवा कमी न होता वाढतच राहते. ज्या ठिकाणी भात हे सलग पीक घेतले जातेत्या ठिकाणी अशा उपयुक्त शेवाळाचा सतत वापर केल्यास उपयुक्त नसणा�या शेवाळांची वाढ कमी होऊन वापरलेल्या शेवाळाची वाढ भरपूर होते व नत्र स्थिरीकरणाचे कार्य कार्यक्षमरित्या होऊ शेकते.

निळे-हिरवे शेवाळ पिकाला अन्नद्रव्यांचा नियमित पुरवठा करते. त्याचप्रमाणे जी घटकद्रव्ये पिकांना उपलब्ध होत नाहीतती सुध्दा थोडया प्रमाणात उवलब्ध करुन देऊन पिकांची अन्नद्रव्यांची (मूळ व सूक्ष्म ) भूक भागविली जाते. त्यामुळे पिकांची सर्वांगीण वाढ होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते. वरील सर्व फायदे विचारात घ्ेाताभात पिकास निळया-हिरव्या शेवाळाच्या वापरामुळे दर हेक्टरी ३०० ते ४०० रुपयांचा निव्वळ नफा होतो.

विविध निळे-हिरवे शेवाळ

१) ऍनाबिना
६) ऑसिलॅटोरिया
२) नोस्टॉक
७) रेव्हूलारिया
३) ऍलोसिरा
८) वेस्टीलॉपसिस
४) टॉलीपोथ्रिक्स
९) सिलेंड्रोपरमम
५) प्लेक्टोनिमा
१०) कॅलोथ्रिक्स

निळे-हिरवे शेवाळ वापरण्याची द्ध          
शेताची चिखलणी करुन नत्र खताचा पहिला हप्ता देऊन झाल्यावर सदृढ व जोमदार रोपांची पुनर्लागण करावी. भाताच्या पुनर्लागणीच्यावेळी खाचरातील पाणी माती मिश्रित गढूळ झालेले असते. ते पाणी स्वच्छ झाल्यावर व मातीचे कण खाली बसल्यावर म्हणजे पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो निळे-हिरवे शेवाळ प्रती हेक्टर संपूर्ण शेतावर सारखे पडेल या पध्दतीने फोकून टाकावे. नंतर पाणी ढवळू नये. म्हणजे टाकलेल्या निळया हिरव्या शेवाळावर मातीचे कण बसणार नाहीत. शेवाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारा सूर्यप्रकाश पाण्यामधून जमिनीच्या पृष्ठभागापर्यंत पहोचेल व शेवाळाची वाढ स्वच्छ पाण्यात सूर्यप्रकाशात भरपूर होईल. साधारणतः तीन आठवडयात शेवाळाची वाढ जमिनीच्या पृष्ठभागावर झालेली दिसेलतसेच ही वाढ पाण्यावरसुध्दा तरंगताना दिसून येईल. अशा पध्दतीने तयार झालेले शेवाळ पेशीमध्ये स्थिर केलेला नत्र रोपाला पुरविला जातो त्यामुळे भात रोपांची वाढ जोमदार होऊन उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्याचप्रमाणे जवळ जवळ २५ टक्के नत्र खताची बचत होते.

निळे-हिरवे शेवाळ व नत्र खत या दोहोंच्या वापरामुळे उत्पादनात निव्वळ नत्र खतांच्या वापराने येणा�या उत्पादनापेक्षा लक्षणीय वाढ होते. ही वाढ सरासरी २०० किलोपासून २५० किलोपर्यंत प्रती हेक्टर असते. निव्वळ नत्र खत वापरण्याऐवजी नत्र खत व निळे-हिरवे शेवाळ वापरणे हे उत्पादन वाढीचे दृष्टिने अत्यंत फायदेशीर ठरले आहे. भात शेतीपासून जास्तीत जास्त उत्पादन हवे असल्यास नत्र खताच्या प्रमाणित मात्रेबरोबरच २० किलो शेवाळ प्रती हेक्टर वापरणे आवश्यक आहे. २० किलो शेवाळाची किंमत फक्त ४०/- रुपये असल्याने उत्पादन खर्चातही फारशी वाढ होत नाहीपरंतु भात उत्पादनात २ ते ३ क्विंटलची वाढ होते. शेवाळामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब ०.२ ते ०.३ टक्के वाढतो. तसेच एकूण नत्र ०.०१ ते ०.०२ टक्के वाढतो. त्यामुळे जमिनीचा पेात सुधारतो. त्याचा फायदा पुढील पिकाला चांगला मिळून उत्पादनात वाढ होते.

भाताच्या भरघोस उत्पादनासाठी नत्र खताची प्रमाणित मात्रा द्यावी. पुनर्लागण केल्यानंतर ८ ते १० दिवसांनी २० किलो शेवाळ प्रती हेक्टर फोकून द्यावे,म्हणजे हे शेवाळ पाण्यात जमिनीच्या पृष्ठभागावर सूर्यप्रकाशात चांगले वाढून कार्यक्षमपणे नत्र स्थिरीकरणाचे कार्य करेलत्यायोगे उत्पादनात निव्वळ नत्र खतापेक्षा लक्षणीय वाढ दिसून येईल.

निळे हिरवे शेवाळ वाढविण्याची पध्दत
सर्वसाधाराणपणे २ x १ x ०.२ मी. आकाराचे वाफे तयार करुन त्यावर २०० मायक्रन जाडीचा पॉलीथिन पेपर टाकावा. पॉलिथिन पेपरवर साधारणतः ८ ते १० किलो बारीक माती पसरावी. त्यामध्ये २५ ग्रॅम कार्बोफ्युरॉन मिसळावे. तसेच ७ ते १० सें.मी. पाण्याची पातळी ठेवून त्यामध्ये २०० ग्रॅम सुपर फॉस्फेट२ ग्रॅम सोडियम मॉलीबडेट४० ग्रॅम फेरस सल्फेट५० ग्रॅम पोटॅशियम क्लोराईड यांचे मिश्रण टाकून आतील माती ढवळावी. माती तळाशी बसल्यावर शांत पाण्यात निळे हिरवे शेवाळाचे परीक्षा नळीतील किंवा प्रयोगशाळा/मध्यवर्ती केंद्र यांनी पुरविलेले मूलभूत बियाणे छिडकावे. साधारणपणे ८ ते १० दिवसात शेवाळाची भरपूर वाढ होते व त्याचा पाण्यावर चांगला थर जमते. भरपूर वाढ झाल्यावर पाणी आटू द्यावे. सुकलेली माती गोळा करुन ती सावलीत वाळवावी. सुकलेली शेवाळ पापडी/शेवाळ मिश्रित माती प्लॅस्टिक पिशवी किंवा कापडी पिशव्यामंध्ये गोळा करावी. या शेवाळ पापडीचा / शेवाळ मिश्रित मातीचा पुढील पिकासाठी शेवाळाचे बियाणे म्हणून उपयोग करता येतो. हे बियाणे भात लावणीनंतर ८ ते १० दिवसांनी भात खाचरामध्ये २० किलो या प्रमाणात दर हेक्टरी वापरावे.

वरील पध्दती व्यतिरिक्त शेतक�यांच्या सोयीनुसार पत्र्याच्या ट्रेमध्ये (चौकोनी आकाराच्याकिंवा सिमेंटच्या स्लॅबवर वरील पध्दत वापरुन शेवाळाचे बियाणे तयार करता येते. शेवाळ वाढविताना डासांचा किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास बंदोबस्तासाठी कीटकनाशकांचा वापर करावा.

महत्वाचे

  1. निळे-हिरवे शेवाळ वापरल्याने रासायनिक खतांची उणीव संपूर्णपणे भरुन काढता येत नाहीम्हणून शेवाळ हे रासायनिक खतांना पूरक खत म्हणून वापरावे.

  2. भाताच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी रासायनिक नत्र खतांची प्रमाणित मात्रा व २० किलो शेवाळाचे बियाणे प्रती हेक्टर वापरावे.

  3. रासायनिक खतेऔषधे व शेवाळ एकत्र मिसळून वापरु नयेत्यांचा स्वतंत्रपणे उपयोग करावा.

  4. रासायनिक खतांच्या संपर्कात किंवा रिकाम्या झालेल्या रासायनिक खतांच्या पिशव्यांमध्ये शेवाळाचे बियाणे साठवू नये.

  5. शेवाळाची मात्रा भाताच्या पुनर्लागणीनंतर ८ ते १० दिवसांनी पाणी स्वच्छ झाल्यानंतर शेतात फोकून/पसरवून द्यावी व त्यानंतर पाणी ढवळू नये.

  6. शेवाळाच्या वाढीसाठी भात शेतात पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.

  7. भात शेतात कीटकनाशकेबुरशीनाशके किंवा तणनाशकांच्या प्रमाणित वापराचा शेवाळावर अनिष्ट परिणाम होत नाही.

उपलब्धता

निळे-हिरवे शेवाळाच्या मूलभूत बियाण्यासाठी व अधिक माहितीसाठी खालील पत्त्यावर संपर्क साधावा.

  1. कृषि अणुजीव शास्त्रज्ञकृषि महाविद्यालय,  शिवाजीनगरपुणे-५

  2. विभागीय कृषि सहसंचालक (विस्तारकोकण विभागठाणे-४

  3. विभागीय कृषि सहसंचालक (विस्तारनागपूर विभागनागपूर

From www.mahaagri.gov.in 


कृषि माल स्वच्छता व सुरक्षितता HACCP (हॅसेप) प्रमाणीकरणाची आवश्यकता

जागतिक बाजारपेठेत कृषि मालावर प्रक्रिया करण्याकरीता चांगल्या उत्पादन पध्दतीचा वापर करुन कृषि प्रक्रिया करीता हॅसेप प्रमाणीकरण करुन घेतलेल्या कृषि व कृषि प्रक्रिया मालाच्या वापरास ग्राहकाची मागणी वाढत आहे.
ग्राहकामध्ये आरोग्याच्या दृष्टिने जागरुकता निर्माण होत आहे. येथून पुढे ग्राहकांच्या आरोग्याच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातुन स्वच्छ व सुरक्षित कृषि प्रक्रिया माल उत्पादन व विक्री करीता हॅसेप प्रमाणीकरणाची मागणी वाढत आहे.

हॅसेप म्हणजे काय?
HACCPHazard Analysis Criticle Control Point.

हॅसेप प्रमाणीकरणाची आवश्यकता का निर्माण झाली?
 अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक वेळा निषकाळजीपणा केल्यामुळे दरवर्षी अन्नाव्दारे विषबांधाची प्रकरणे आढळून येत आहेत. तसेच उत्पादनाच्या अनेक पातळीवर सुक्ष्म जंतुचा सर्जन्य झाल्यामुळे खाद्यपदार्थ सुरक्षित राहात नाहीत. त्यामुळे रोगजंतुचा सर्जन्य होतो. रोगजंतुचा प्रादुर्भाव प्रामुख्याने खालील नमुद केलेल्या बॅक्टेरीया,जिवाणू विषाणूयांच्याव्दारे होतो त्या तपशिल खाली दिलेला आहे. त्याची प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत.
बॅक्टेरीया :           Clotridium botulinum
                     Bacillus cereus
                     E.coli
                     Salmonella spp.
                     Shigella spp.

जिवाणू             Hepatitis A & E
                     Norwalk virus group

प्रोटोझा आणि पॅरासाईट cryptosporidium Parvum

Rntamoeba histolytica
                          Giardia Lamblia
                     Toxoplasma gondii
                     Ascaris Lumbricoides

बुरशी आणि मोल्ड :   As pergillus flavus
                     As pergillus Parasiticus
                     As pergillus   ochraceus
                     Pencillum islandicum
                     Fusarium solani
                     Fusarium sporotrichoides

वरील सर्व बुरशीजिवाणूविषाणू इत्यादी रोगाचा प्रादुर्भाव पाणीमातीवनस्पतीहाताळणी करणारे कामगार व साठवणुकवाहतुकी या माध्यमातुन कृषि मालाव्दारे माणसाना व प्राण्याना होता. तो होवू नये म्हणून कृषि मालाचे उत्पादनकाढणीहाताळणीप्रक्रिया करण्याकरीता स्वच्छता व सुरक्षितेला अन्यन्य साधारण महत्व प्राप्त झालेले आहे. त्याची ग्राहकांना हमी देण्यासाठी हॅसेप प्रमाणीकरणास महत्व प्राप्त झाले आहे.

हॅसेप प्रमाणीकरणाचे मुख्य तत्वे.
१. विश्लेषण : अन्नपदार्थ निर्माण प्रक्रियेतील सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातुन योग्य ती उपाययोजना साधने  त्याचे प्राथमिक आवस्थेत योग्य ती दक्षता घेण्याकरीता नियोजन करणे.
२.सुरक्षित नियंत्रण : नुकसान टाळण्यासाठी नेमके निर्णायक क्षण ठरविणे

३. विशेष मर्यादा : नेमक्या निर्णायक क्षणाच्या ठिकाणी योग्य ती सुविधा  काळजी घेण्यासाठी सुविधा निर्माण करणे.
४. नियंत्रण : गुणवत्ता पुर्ततेसाठी देखरेख करणे  त्याची प्रक्रिया निश्च्िात करणे.

५. सुधारणा : सुचित केलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करणे.

६. तपासणी : शिफारस केलेल्या उपाय योजना लागू पडतात किंवा नाही यासाठी तपासणी तथा चाचणी घेणे  त्यानुसार त्याची अमलबजावणी करुनघेणे.
 ७. रेकॉर्ड : प्रक्रियाशी निगडीत इत्यंभुत गोष्टीची कागदोपत्री माहिती  नोंद ठेवणे.

हॅसेप प्रमाणीकरणाचे काम खालील प्रमाणे करण्यात येते.
१.      हॅसेप टिम तयार करणे
२.     प्रोडक्टसची निवड करणे
३.     अंतिम प्रोडक्टस कोण वापरणार याबाबतची खात्री करुन घेणे
४.     उत्पादनाचा आराखडा तयार करणे
५.    प्रत्यक्ष उत्पादनाच्या ठिकाणी भेट देवून आराखडयाप्रमाणे खात्री करुन घेणे
६.      उत्पादन प्रकियेतील घातक बाबीवर योग्य ते व्यवस्थापन करण्याकरीता नियोजन करणे
७.    क्षण नियंत्रीत करण्यासाठी सीमा ठरविणे
८.     प्रत्येक क्षण नियमीत ठिकाणाकरीता योग्य त्या सुविधा निर्माण करणे.
९.      सुचित केलेल्या पध्दतीचा संनियंत्रण करणे.
१०.  योग्य त्या सुधारणा करण्याकरीता नियोजन करणे.
११.   सर्व पध्दतीचा तपासणी सुविधा निर्माण करणे
१२.  कागदपत्रे व नोंदणी संदर्भात मार्गदर्शन करणे.

हॅसेप प्रमाणीकरण कोणास करता येते.
१.      उत्पादक
२.     पॅक हाउस व्यवस्थापन
३.     प्रक्रिया उद्योजक
४.     किचन

हॅसेप प्रमाणीकरण करण्याकरीता अपेडा मार्फत खालील एजन्सीना प्राधिकृत केलेले आहे.
1.       Quality Management Services A-42,Swasthya Vihar, New Delhi

2.     Food Sefety Solutions Internation  M/10/32, Changam purna Nagar, Cochin, Kerala

3.     The Quality Contalist Flat No.26,Sector-12, Dwarka,New Delhi

4.     Puradigm Services Pvt.Ltd. 1st floor,Anurag, 27, Jawahar Nagar, University Road, Pune

5.     Quali Tech India Solutions, Madhura Nagar colony, Padmarao Nagar, Secunderabad.

6.      TUV South Asia Pvt. Ltd. 321,Solitaire corporate Parle Chakale,Andheri (E),Mumbai

7.     Det Norske Veritas As India (DNV) certification Services,Worli, Mumbai

8.      International Certification Services (Asia) Pvt.Ltd. Santacruz, Mumbai

9.      Food Cert India Pvt.Ltd. Himayatnagar, Hydrabad.

युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणीकरणाची आवश्यकता
एका देशातुन दुस-या देशास कृषि मालाची निर्यात करण्याकरिता जागतिक पिकसंरक्षण करार १९५१ (Internation Plant Protection Convertion, 1951नुसार फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहेजागतिक पिकसंरक्षण कराराचे १६५ देश सदस्य असून भारत एक सदस्य देश आहेकेंद्र शासनाने अधिसुचना क्रमांक पीपीआय/९८/ दिनांक २९/१०/१९९३ अन्वये राज्यातील ११ अधिका-यांना फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देणारे अधिकारी म्हणून अधिसुचित केलेले आहेत्यामध्ये पुणे,सांगली,नाशिकसोलापूरअमरावतीरत्नागिरी  व सिंधुदूर्ग  या जिल्हयातील जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयातील अधिका-यांचा समावेश व सदर अधिका-यामार्फत  कृषि मालाच्या निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही केली जाते.

            राज्यातून द्राक्ष पिकांचे मोठया प्रमाणात युरोपियन देशांन निर्यात केली जाते य़ुरोपियन देशांने द्राक्षाचे निर्यातीकरीता किडनाशकांचा उर्वरीत अंश तपासणीचे कडक निकष तयार केलेले आहेतत्यामध्ये ९० किटकनाशक औषधाची तपासणी करणे बंधनकारक करण्यात आलेले आहेया सर्व बाबीचा विचार करुन  युरोपियान देशांना जास्तीतजास्त द्राक्ष निर्यात होण्याकरीता सन २००६-०७ या वर्षात अपेडा यांच्या मार्गदर्शनाखाली युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात करण्याकरीता अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत ट्रेड नोटीस क्रमांक क्युएमसी/०४९/२००५ दिनांक २६ ऑक्टोबर २००६ अन्वये सविस्तर मार्गदर्शन सुचना तयार करण्यात आलेले आहेतत्याची अंमलबजावणी संचालक,कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेतीसाखर संकुलपुणे-५ यांच्या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे.

युरोपियन युनियन मध्ये खालील प्रमुख देशांचा समावेश आहे.

.  क़्र.
युरोपियन युनियनमधील प्रमुख आयातदार देशांची नांवे
युनायटेड किंगडम (युके)
नैदरलँड
बेल्जियम
जर्मनी
फ्रान्स
इटली
पोलंड
स्पेन
स्विडन
१०
ग्रीस

सन २००६-०७ या वर्षामध्ये युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील उर्वरित अंश नियंत्रणाबाबत अपेडामार्फत तयार करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचनांमध्ये मागील वर्षी आढळून आलेल्या अडचणी व त्रुटींचा विचार करुन तसेच युरोपियन युनियनने  केलेल्या सुचना व इतर सर्व बाबींचा विचार करुन चालू वर्षाकरिता युरोपियन देशांना निर्यात होणा-या द्राक्षामधील किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत खालीलप्रमाणे अंमलबजावणी करण्यात येत आहेत.

निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याची पध्दत -
युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांनी त्यांच्या द्राक्ष बागेची नोंदणी संबंधित जिल्हयाचे नोंदणी अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांच्याकडे दि. २५ डिसेंबर २००६ पुर्वी करणे आवश्यक आहे. तसेच निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरीता जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अहमदनगरपुणेसोलापूरनाशिकसांगलीसाताराउस्मानाबादलातूरबीडबुलढाणाजळगांव व नांदेड यांना निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी करण्याकरिता नोंदणी अधिकारी म्हणून प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागाची नोंदणी करण्याकरीता प्रती प्लॉट (१ हैक्टर क्षेत्र) करिता रु. ५०/- फी विहित करण्यात आलेली आहे. निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी व नुतणीकरण चालू वर्षी अपेडाच्या वेबसाईटवर ऑन लाईनव्दारे करण्यात आलेली आहे (www.apeda.com)

निर्यातक्षम द्राक्ष बागायतदारांना युरोपियन देशांना निर्यात करु इच्छिणा-या द्राक्ष बागायतदारांना त्यांचे बागेची नोंदणी / नुतनीकरण संबधित जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत अपेडाच्या ऑन लाईन साईटवरुन  प्रपत्र २-अ मध्ये संबधित द्राक्ष बागायतदारांना नोंदणी प्रमाणपत्र देण्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी केलेल्या द्राक्ष बागायतदारांना द्राक्ष बागेवरील किडी व रोगांचे नियंत्रण करण्याकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्रमांजरी यांनी प्रपत्र ७ मध्ये  शिफारस केल्यानुसार वापरण्याबाबत व त्याचा रकॉर्ड प्रपत्र-४ मध्ये ठेवण्याबाबत बंधनकारक करण्यात आलेले आहे.

नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी व मार्गदर्शन करण्याकरिता अनुसरावयाची कार्यपध्दती-
युरोपियन देशांना निर्यात करण्याकरिता नोंदणी करण्यात आलेल्या द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता संबंधित मंडल कृषि अधिकारी / कृषि पर्यवेक्षक यांना तपासणी अधिकारी म्हणून ३०० अधिका-यांना  प्राधिकृत करण्यात आले आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता शेतक-यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोन तपासण्या विहित करण्यात आलेल्या आहेत. पहिली तपासणी द्राक्ष बागेचे नुतनीकरण / नवीन नोंदणी प्रमाणपत्र देण्यापुर्वी करावयाची आहे. दुसरी तपासणी अनुक्रमे ४० ते ६० दिवसांच्या फरकाने करावयाची आहे.

निर्यातक्षम द्राक्ष बागांची तपासणी करण्याकरिता प्रपत्र ६-अ व ब विहित करण्यात आलेले आहे.  त्या विहित केलेल्या प्रपत्रामध्ये संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागांची तपासणी अधिका-याने तपासणी करुन तपासणीचा अहवाल संबंधित नोंदणीकृत द्राक्ष बागायतदार व नोंदणी अधिकारी यांना द्यावयाचा आहे.

तपासणी अधिका-याने त्याच्या कार्यक्षेत्रातील नोंदणीकृत सर्व द्राक्ष बागायतदारांना वेळोवेळी निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित किडनाशक उर्वरित अंश नियंत्रणाकरिता अपेडा यांनी तयार केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधित शेतक-यांना मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. तपासणी अधिका-याने तपासणी अहवालामध्ये त्याचे पुर्ण नावहुद्दाकार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक    नमुद करणे आवश्यक आहे तसेच जेवढया क्षेत्राची नोंदणी करण्यात आलेली आहे तेवढया क्षेत्राकरिता तपासणी अहवाल देणे आवश्यक आहे.

तपासणीचे वेळी नोंदणी करण्यात आलेल्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र आढळून आले तर वाढीव क्षेत्राची नोंद नोंदणी प्रमाणपत्रात करुन घेण्याकरिता संबंधित शेतक-यांनी संबधित शेतक-यांकडे नोंदणी करणेकरीता कळविणे आवश्यक आहेनोदणींकृत द्राक्ष बागायतदारंने तपासणी अधिका-यांच्या मार्गदर्शना नुसार तपासणी ठेवणे आवश्यक आहे.
तपासणी अहवालाच्या प्रती संबंधित शेतक-यांनी तपासणी अधिका-याकडून वेळोवेळी उपलब्ध करुन घेणे आवश्यक आहे.

निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश नियंत्रणाकरिता नमुने घेण्याची विहित पध्दत
निर्यातक्षम नोंदणीकृत द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता चालू वर्षी एकूण ७ प्रयोगशाळांना अपेडा यांनी अधिसुचित केलेले आहेत त्याची नांवे खालीलप्रमाणे आहेत.

क़्र.
प्रयोग शाळेचे नांव
किडनाशक उर्वरीत अंश प्रयोगशाळा ,पुणे-५
विमटा लॅबस लि.हैद्राबाद
रिलायबल ऍनालिटीकल लॅबोरेटरीठाणे
जिओक लॅब लिमिटेड,मुंबई
श्रीराम इन्स्टीटयुट लॅब बगलोर
एसजीएस इंडीया लि.चैन्नई
एनएचआरडीएफ नाशिक

निर्यातक्षम द्राक्ष बागेमधील उर्वरित अंश तपासणीकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी अपेडा यानी प्रपत्र-८ मध्ये अधिसुचित केलेल्या उर्वरित अंश प्रयोगशाळेच्या प्रतिनिधीव्दारेच द्राक्षाचे नमुने  घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता द्राक्षाचे नमुने घेण्यासाठी लागणारे पॅकिंग मटेरियल व इतर साहित्त्य व नमुना स्लीप विहित करण्यात आली आहे त्यानुसार व प्रपत्र ९ मध्ये विहित केलेल्या पध्दतीचा वापर करुन नमुने घेणे बंधनकारक आहे.

उर्वरित अंश तपासणीकरिता घेण्यात आलेल्या द्राक्षांचे नमुने दोन पॅकिंगमध्ये २ किलो व ३ किलोमध्ये दोन नमुने घेवुन २४ तासांचे आत संबंधित किडनाशक उर्वरित अंश प्रयोगशाळेस पाठविणे आवश्यक आहे. नमुन्यासोबत प्रपत्र ४प्रपत्र ५ व प्रपत्र ६-ब जोडणे आवश्यक आहे.

द्राक्ष बागायतदारांनी  निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन  विक्रीकरिता प्रामुख्याने खालील बाबीची पुर्तता/नियोजन करणे आवश्यक आहे.
१.      निर्यातक्षम द्राक्ष बागेची नोंदणी विहित मुदतीत संबधीत जिअकृअ यांचेकडे अर्ज करुन घेणे तसेच नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध करुन घेणे व नोंदणी प्रमाणपत्रातील मजकूर बरोबर असल्याचे खात्री करुन घेण.
२.     द्राक्षावरील किडी व रोगांचे नियंत्रणाकरिता राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र मांजरी यांनी प्रपत्र-७ मध्ये शिफारस केलेल्याच औषधाची फवारणी करणे.एकाच औषधाची सलग फवारणी न करणे.
३.     किडी व रोगाचे नियंत्रणाकरिता वापरण्यात आलेल्या औषधाची नोंद प्रपत्र ४ मध्ये सविस्तर ठेवून ते तपासणी अधिका-याकडून स्वाक्षरीत करुन घेणे.
४.     निर्यातक्षम द्राक्ष बागाची २ वेळा तपासणी अधिका-याकडून तपासणी करुन घेणे तसेच तपासणी अहवालाचा प्रती प्राप्त करुन घेवून स्वतंत्र नस्तीस ठेवणे.
५.    द्राक्ष काढणीच्या अगोदर एक महिना फवारणी बंद करणेऔषधाची फवारणी करण्याची गरज पडल्यास तशी नोंद प्रपत्र-४ मध्ये करणे.
६.      उर्वरीत अंश तपासणी करण्याकरिता अपेडा यांनी अधिसुचित केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेचा प्रतिनिधी व्दारे द्राक्षाचे नमुना घेवून नमुण्यासोबत ,नमुना स्लीपप्रपत्र-४ द्यावे.
७.    युरोपियन देशांना द्राक्ष निर्यातीकरिता द्राक्षाचे घडबेरीचा एकसारखा आकार १६ ते १८ (एमएक) गडद हिरवा रंग व १६ दिवस असणे आवश्यक आहे . तसेच रोगांचा व किडीचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

१.      द्राक्षाची निर्यात निर्यातदारामार्फत करावयाची झाल्यास द्राक्ष निर्यातदारांची  सविस्तर माहिती करुन घेणे.
२.     निवड केलेल्या द्राक्ष निर्यातदारांला प्रपत्र-५ मध्ये उर्वरीत अंश चाचणी प्रयोगशाळेत नमुना प्रमाणीत असल्याचे अहवालाची प्रत तसेच तोच माल पुरवठा केल्याबाबत हमीपत्र देणे.
३.     द्राक्ष बागायतदारानी द्राक्षाचा  निर्यातदाराना पुरवठा करण्यापूर्वी भाव ठरवून घेणे व मालाचा  
       पुरवठा व किमतीबाबत करार करुन घेणे बागायतदाराच्या दृष्टिने आवश्यक आहे.

उर्वरीत अंश तपासणी करण्याकरीता  प्राधिकृत केलेल्या प्रयोगशाळांची जबाबदारी :-
१.      प्राधिकृत प्रयोगशाळेने निर्यातक्षम द्राक्षामधील औषधाचे उर्वरित अंश मर्यादा प्रपत्र ११ मध्ये दिल्या- प्रमाणे सर्व औषधांकरिता ए ओ ए सी किंवा कोडेक्स पध्दतीचा अवलंब करुन तपासणी करणे आवश्यक आहे.
२.     प्राधिकृत प्रयोगशाळेने निर्यातक्षम द्राक्षामधील उर्वरित अंश तपासणी करण्याकरिता प्रपत्र ९ मध्ये विहित केलेल्या पध्दतीचा अवलंब करुन नमुने घेण्यासाठी प्रयोगशाळेच्या वतीने योग्य त्या       
३.     प्रतिनिधीची नियुक्ती करणे आवश्यक आहे व नियुक्त केलेल्या प्रतिनिधींची नावे , पुर्ण पत्ता व दुरध्वनी क्रमांक अपेडा , एनआरसी व संचालक कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती यांना कळविणे आवश्यक आहे.
४.     निर्यातक्षम द्राक्षामधील उर्वरित अंश तपासणीचा अहवाल प्रपत्र-१२ मध्ये विहित केलेल्या नमुन्यात द्यावयाचा आहे.
५.    प्रयोगशाळेने उर्वरित अंश तपासणीचा अहवाल चार प्रतीत तयार करावयाचा असून पहिल्या दोन प्रती संबंधित द्राक्ष उत्पादक / निर्यातदार यांना द्यावयाची आहेतिसरी प्रत संबंधित तपासणी अधिकारी तथा मंडळ कृषि अधिकारी यांना द्यावयाची आहे व चौथी प्रत प्रयोगशाळेत कार्यालयीन प्रत म्हणून ठेवावयाची आहे. प्राधिकृत प्रयोगशाळेने उर्वरित अंश तपासणी गोषवारा प्रपत्र १३ मध्ये राष्ट्रीय रेफरल प्रयोगशाळा व अपेडा यांना आउनलाईन सुविधाव्दारे  पाठवावयाचा आहे.

फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरीता द्राक्ष निर्यातदारांने खालील कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे
द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यात सुरु करण्यापूर्वी खालील बाबीबाबत माहिती करुन घेणे आवश्यक आहे.
१.      नोंदणीकृत द्राक्ष बागाची निवड करुन संबधित शेतक-याकडून द्राक्ष बागाची संपूर्ण माहिती घेणे (नोंदणी प्रमाणपत्र,प्रपत्र-४ व प्रपत्र-५)
२.     ज्या देशांना द्राक्षाची निर्यात करावयाची आहेत्या देशातील आयातदाराकडून द्राक्षाची गुणवत्ता , प्रतवारीपॅकींग इत्यादीबाबत सविस्तर माहिती घेणे
३.     उर्वरीत अंश तपासणी करण्यासाठी अपेडा यांनी प्रमाणीत केलेल्या उर्वरीत अंश प्रयोगशाळेकडून ९० औषधाची तपासणी करुन घेणे.
४.     द्राक्षाची पॅकींग,ग्रेडींग,प्रिकुलींग व  स्टफोग अपेडा यांनी मान्यता दिलेल्या कोल्डस्टोरेजमध्ये करावेत
५.    युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यातीकरीता निर्यातदारांनी डायरेक्टोरेट ऑफ मार्केटींग अँड इन्स्पेक्शन मुंबई यांचेकडून एगमार्कसाठी नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे . तसेच द्राक्षाचे ग्रेडींगकरीता एगमार्क पुणेनाशिक व सांगली येथील कार्यालयातुन देण्यात येते. चालू वर्षी ऍगमार्क तपासणीचे काम किडनाशक उर्वरीत अंश तपासणी प्रयोगशाळेच्या प्राधिकृत व्यक्तिकडून तपासणी केल्यानंतर ऍगमार्क ऍथोरिटीकडून ऑनलाईन ऍगमार्क ग्रेडींग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.
६. निर्यातक्षम द्राक्षाची पॅलेट बनविण्याकरीता लाकडाचे पॅलेटचा वापर केला जातो. लाकडाच्या पॅलेटकरिता इटरनॅशनल स्टडर्ड फॉर फायटोसॅनिटरी मेजर्स (ISPM-15) -१५ अन्वये केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या पेस्ट कंट्रोल प्युमिगेंटर्स कडून लाकडी पॅलेटचे धुरीकरण करुन घेउुन त्यावर स्टॅम्प मारुन घेणे आवश्यक आहे . घुरीकरणाकरिता केंद्र शासनाने राज्यातील २१ पेस्ट कट्रोल ऑपरेटर्ससना मान्यता दिलेली आहेत्याची नांवे(plant quarantine india.org) या वेबसाईटवर उपलब्ध आहे युरोपियन देंशांना द्राक्षाचे निर्यातीकरीता फायटोचे प्रमाणपत्र देण्यासाठी संचालक कृषि प्रक्रिया व व्यापारक्षमक शेतीयांच्या कार्यालयातील कृषि उपसंचालक तसेच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नाशिक सांगली व सोलापूर व सांगली यांच्या कार्यालयातील कृषि उपसंचालक व कृषि अधिकारी यांना फायटोसॅनिटरी इंश्युइंग ऍथोरिटी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.

द्राक्ष निर्यातदारांनी युरोपियन देशांना द्राक्षाची निर्यातीकरीता फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र मिळण्याकरीता खालील कागदपत्राची पुर्तता करणे आवश्यक आहे .
१.      प्रपत्र अ मध्ये २ प्रतीत अर्ज
२.     प्रोफार्मा  इन्वाईसची प्रत
३.     आयातदार व निर्यातदार यांच्यामध्ये करण्यात आलेल्या करारनामाची प्रत
४.     आयात व निर्यात कोड नंबरची प्रत
५.    उर्वरीत अंश तपासणी अहवालाची पांढरी व हिरव्या रंगाची मुळ प्रत.    
६.      कंटेनर लोडींग / पँकीग लिस्ट
७.    निर्यातक्षम द्राक्ष बांगेच्या नोंदणी प्रमाणपत्रांची प्रत
८.     नोंदणीकृत द्राक्ष बागांयतदारांचे प्रपत्र ५ मध्ये हमी पत्र
९.      नोंदणीकृत द्राक्ष बागेचे प्रपत्र ६-ब मध्ये तपासणी अधिका-यामार्फत केलेल्या तपासणी अहवालाची प्रत
१०.  प्रपत्र १५ मध्ये नोंदणीकृत द्राक्ष बांायतदाराकडूनच माल खरेदी केलेबाबत निर्यातदारांचे हमी पत्र
११.   ज्या ठिकाणी द्राक्षाची स्टपिंग करण्यात येणार आहेतत्या शित गृहास अपेडाच्या मान्यतेची प्रत
१२.  निर्यातक्षम द्राक्षाचे एगमार्क प्रमाणीकरण करण्याकरीता डायरेक्टर ऑफ माकेाटींग ऍन्ड इन्स्पेक्शन यांच्याकडे नोंदणी केलेल्या प्रमाणपत्र तसेच सर्टिफिकेट ऑफ एगमार्क  ग्रीडीची प्रत
१३.  द्राक्षाचे पॅलेटापरण्यात येणा-या लाकडी पॅलेटचे केंद्र शासन मान्यता पेस्ट कंट्रोल ऑपरेटरकडून फयुमिगेशन केल्याचे प्रमाणपत्र
१४. विहित केलेली फी चलनाव्दारे कोषागारात भरल्याची चलनांची मुळ प्रत

            वरील सर्व मुद्याबाबतची माहिती सादर केल्यानंतर फायटोसॅनिटरी सर्टीफिकेट ऍथोरिटीव्दारे निर्यातीकरिता तयार करण्यात आलेल्या द्राक्षाची तपासणी करुन त्यातून नमुना घेवून सदरची द्राक्षे किड व रोगमुक्त तसेच उर्वरीत अंश मध्ये प्रमाणीत असल्याचे तसेच आयातदार देशाच्या मागणीप्रमाणे असल्याची खात्री करुन सदर द्राक्षाच्या निर्यातीकरिता संबधीत देशाच्या प्लॅन्ट प्रोटेक्शन ऍथोरिटीच्या नावाने फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र अपेडाच्या साईटवर आउन लाईनव्दारे तयार करुन दिले जाणार आहे.चालू वर्षी युरेपियान देशांना द्राक्ष निर्यातीकरीता द्राक्ष बागाची नोंदणी,नोदणी केलेल्या द्राक्ष बागायाची तपासणीउर्वरीत अंश तपासणी अहवाल, ऍगमार्क प्रमाणीकरण तसेच फाटोसॅनिटरी प्रमाणीकरणाचे काम अपेडाच्या वेबसाईटवरुन ऑनलाईनव्दारे करण्यात येणार आहे. द्राक्ष बागायतदार/निर्यातदारांनी वरील बाबीची पुर्तता करण्याकरिता योग्य ते नियोजन करण्याची आवश्यकता आहे.

अधिक माहिती  मार्गदर्शनासाठी कृषि प्रक्रिया  व्यापारक्षम शेती, साखर संकुलपुणे४११००५ कार्यालयाशी संपर्क साधून माहिती घ्यावी. (फोन नं. २०-२५५३४३४९९४२३५७५९५६)
Special Thanks,
गोविंद ग. हांडे (एमएससीकृषि किटक शास्त्र)कृषि अधिकारी.
www.mahakrushi.blogspot.com

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद