*नमस्कार मंडळी,*
*आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८.*
वरील सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिम दिशेकडून म्हणजेच कर्कवृत्तावरील रेषेवर ढगांचा खूप मोठा समूह पश्चिमेतील ओमान/मस्कत भागाकडून पाकिस्तानातील कराची/ गुजरातचा कच्छ, पक्ष्चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे आगेकूच करत आहे.
आज संध्याकाळपर्यंत हा ढगांचा समूह संपूर्ण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश,उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आपली व्याप्ती वाढवेल व येथील संपूर्ण वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ होईल.
संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नंदुरबार, धुळे,जळगाव या जिल्ह्यांतील काही तालुक्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे.
ही शक्यता असली तरी ती खूपच कमी असलेने घाबरून जाण्याचे कारण नाही.
पण ढगांची आगेकूच अशीच राहिली तर उत्तर महाराष्ट्रात व विदर्भापर्यंत मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यात वातावरण उद्यापर्यंत ढगाळ व हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
क्वचित काही ठिकाणी ढगांची उंची जास्त राहिली तर मग गारपीठीची ही शक्यता नाकारता येत नाही.
पण ही शक्यता खुप कमी आहेत.
सुधारित हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन आज संध्याकाळी सहा वाजता दिले जाईल.
आज याची खूप गरज वाटतेय.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*