Showing posts with label Knowledge Farming. Show all posts
Showing posts with label Knowledge Farming. Show all posts

Tuesday, March 6, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 06/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ६ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज क्रमांक एक मध्ये दिसत असल्याप्रमाणे मादागास्कर देशाजवळ गेले काही दिवस एक भयंकर वादळ आपले भयानक स्वरूप धारण करुन आहे.. त्याच्याजवळच एक ढगांचा मोठा समूह आपले अस्तित्व बळकट करत आहे....

उत्तर हिंदी महासागरात व बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार या द्वीप समूहामध्ये काही बरेच भरकटलेले ढग आले आहेत...

महाराष्ट्र शासनाने म्हणजेच हवामान खात्याने जो गारपिटीचा व अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे..
त्यासाठी आवश्यक असे ढग सध्यातरी कुठूनही महाराष्ट्रावर येतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण खूप घाबरून जाण्याची गरज नाही.....

वर सांगितल्याप्रमाणे ढग हे वरील भागातच आहेत ते खूप मोठे अंतर पार करून महाराष्ट्रावर येतील अशी परिस्थिती पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण होईल अशी शक्यता कमी आहे... त्यामुळे गारपीट व अवकाळी पाऊस होईल असे वाटत नाही..

सॅटेलाइट इमेज क्रमांक 2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे कोकणामध्ये ठाणे,रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामधील डोंगरातील काही भाग ढगाळ वातावरण निर्माण होईल...

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे..
सातारा जिल्हा,
उत्तर व पूर्व कोल्हापूर जिल्हा, पूर्व सांगली जिल्हा,
उत्तर सोलापूर जिल्हा वातावरण ढगाळ राहिल...

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही अंशी..
नंदुरबार जिल्हा काही अंशी..
जळगाव जिल्हा उत्तर सीमेवरील काही भाग ढगाळ राहील..

औरंगाबाद बहुतांश जिल्हा ढगाळ राहील..
दक्षिण अहमदनगर,बीड-लातूर,उस्मानाबाद, बुलढाणा,नांदेड जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याकडील भाग काही अंशी ढगाळ वातावरण राहील....
वाशिम,हिंगोली, परभणी अकोला काही अंशी ढगाळ वातावरण राहील....

विदर्भातील अमरावती,नागपूर जिल्हा काही अंशी हा ढगाळ राहील..
तसेच वर्धा जिल्हा किंचित, चंद्रपूर उत्तरभाग,गडचिरोली उत्तर भाग हा भाग काही अंशी ढगाळ वातावरण राहील....

वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण राहील पण घाबरून जाण्याचे काही कारण नाही....
कारण हे ढग  अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकत नाहीत....

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये बऱ्याच प्रमाणात वातावरण ढगाळ आहे पण किंचित ठिकाणी हलक्‍या सरी सोडून कुठेही पावसाची शक्‍यता नाही...


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Monday, March 5, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 05/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ५ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज मध्ये( झुम करुन पहावे) दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील खास करून पश्चिम महाराष्ट्रामधील व सह्याद्री पर्वत रांगाना लागून असलेल्या पर्वत रांगा ज्या तालुक्यात आहेत तेथील भागात वातावरण ढगाळ झाले आहे....


घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही आहे कारण हे ढग पाऊस पडू शकत नाहीत....

गेले दोन-चार दिवस आम्ही पाहत आहोत की शासकीय परीपत्रकानुसार ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार 7 8 मार्च रोजी गारपिट सांगितली आहे पण सध्या तरी तशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही आहे..
त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाण्याचे काही कारण नाही...

परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत गरज लागेल तसे सखोल मार्गदर्शन केले जाईल.....!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Saturday, March 3, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 03/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ३ मार्च २०१८.*

सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बहुतांशपणे कोरडे आहे.

कमी-जास्त प्रमाणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश/गुजरात  सीमेवरील बऱ्याच भागात बाष्प जास्त  असल्याने वातावरण किंचित ढगाळ होण्याची शक्यता आहे.

आजुन सुद्धा पहाटे व मध्यरात्री किंचित थंडी जाणवू शकते कारण थोड्याफार  प्रमाणात उत्तरेकडून थंड वारे अजून महाराष्ट्रावर वाहत आहेत.

परंतु दुपारी बारानंतर उन्हाचा कडाका जाणवू शकतो... थोडाफार वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने उकाडा सुसह्य होईल पण बऱ्याच भागामध्ये ऊन जाणवेल.

विशेषतः कोकणात उष्णतेची लाट असा प्रकार पहावयास मिळेल... कारण तिथे वातावरणात बाष्प जास्त असल्याने दमटपणा वाढला आहे.

पुढील आठवड्यात एक-दोन दिवस महाराष्ट्रातील थोड्याफार भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे ढगाळ वातावरण होण्याची चिन्हे आहेत.


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Wednesday, February 28, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 28/02/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८.*

वरील सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिम दिशेकडून म्हणजेच कर्कवृत्तावरील रेषेवर ढगांचा  खूप मोठा समूह पश्चिमेतील ओमान/मस्कत भागाकडून पाकिस्तानातील कराची/ गुजरातचा कच्छ, पक्ष्चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे आगेकूच करत   आहे.

आज संध्याकाळपर्यंत हा ढगांचा समूह संपूर्ण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश,उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आपली व्याप्ती वाढवेल व येथील संपूर्ण वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ होईल.

संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नंदुरबार, धुळे,जळगाव या जिल्ह्यांतील काही तालुक्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे.

ही शक्यता असली तरी ती खूपच कमी असलेने घाबरून जाण्याचे कारण नाही.

पण  ढगांची आगेकूच अशीच राहिली तर उत्तर महाराष्ट्रात व विदर्भापर्यंत मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यात वातावरण उद्यापर्यंत ढगाळ व हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
क्वचित काही ठिकाणी ढगांची उंची जास्त राहिली तर मग गारपीठीची ही शक्यता नाकारता येत नाही.
पण ही शक्यता खुप कमी आहेत.

सुधारित हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन आज संध्याकाळी सहा वाजता दिले जाईल.
आज याची खूप गरज वाटतेय.


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Monday, February 26, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 26/02/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाईट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे अफगाणिस्तान/पाकिस्तान या भागातील भयानक वादळ आपले आणखीच भयानक रूप धारण करीत असून त्याने लंब गोलाकार नागाच्या फण्यासारखा आकार धारण केला आहे.

या भयानक वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये खूप दाट असे अवकाळी पाऊस व गारपिटीहीे करण्याजोगे ढग आहेत त्यामुळे हे वादळ सरकत राजस्थान/गुजरात या भागावर आले  तर मग उत्तर महाराष्ट्राची दयनीय अवस्था होऊ शकते.

त्या दिशेने या वादळाची थोडीफार पावले पडत असून आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत...!

आज मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर काहीसे जास्त प्रमाणात बाष्प आले आहे त्यामुळे पहाटे बऱ्याच ठिकाणी हलकेसे धुके पडले असेल....
त्यात हे बाष्प वायव्य/ उत्तरेकडून आले असल्याने यात गारवा आहे त्यामुळेच सकाळी किंचित थंडी जास्त जाणवली असेल.

आम्हाला चिंता याच गोष्टींची असून पुढील परिस्थितीचा अंदाज घेणे अवघड जात आहे.
कारण वाऱ्याची दिशा व हवेचा दबाव वायव्य/ उत्तरेकडून महाराष्ट्राकडे दिसत असल्यामुळे हे भयानक वादळ महाराष्ट्रावर येऊन नुकसान करते की काय ही चिंता सतावत आहे.

असो,

पुढील परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेऊन आहोत.. गरज असल्यास रात्री परत एकदा माहिती व सखोल मार्गदर्शन केले जाईल....!

आज उकाडा जास्त जाणवेल पण त्याबरोबरच वाऱ्याचा वेग महाराष्ट्रातील बऱ्याच भागात थोडाफार जास्त असल्याने तो सहन करता येईल...
आज वातावरण कोरडे नसून थोडेफार बाष्प महाराष्ट्रावर आहे त्यामुळे काही भागात दमटपणा जाणवेल.

काही भागात वातावरण किंचित म्हणजे किंचित ढगाळ होण्याची शक्‍यता आहे याचे कारण वातावरणातील बाष्प हे आहे......!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Popular Keywords

अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आंबा आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कांदा कात कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद “पिवळी क्रांती