*नमस्कार मंडळी,**आज दिनांक 7 जून 2018*
*मान्सूनचे मध्य महाराष्ट्रामध्ये आगमन*
*मुंबई शहर व उपनगर तसेच कोकणाला मुसळधार पावसाचा धोका*
काल रात्रभर मध्य महाराष्ट्रातील म्हणजेच मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे...
यामध्ये उस्मानाबाद,लातूर, नांदेड,बीड,परभणी,हिंगोली, जालना,औरंगाबादचा काही भाग,बुलढाणा,वाशिम तसेच अहमदनगरचा काही भाग, सोलापूरचा काही भाग समाविष्ट आहे..
या भागात जोरदार पद्धतीने रात्रभर पाऊस पडत आलेला आहे...!
हे मान्सून आगमनाचे संकेत असून आजपासूनच या भागात मान्सून सक्रिय होण्यास चालू होईल.
खरंतर ढगांचा मोठा समूह आंध्रप्रदेशवरून रात्री मध्य महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे.
काल तांत्रिक अडचण असल्यामुळे मी आपणास *मराठवाड्यात मान्सूनचे आगमन व आगमनाबरोबर धुमाकूळ* या बाबतीत चेतावणी देऊ शकलो नाही त्यामुळे मला कृपया माफ करावे.
याबरोबरच कोकण किनारपट्टीला किंबहुना कोकण व सह्याद्री पर्वतरांगा जवळील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना आज अतिजोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे...
कारण सॅटेलाइट फोटो मध्ये दिसत असल्याप्रमाणे ढगांचा खूप मोठा समूह हा अरबी समुद्रावरून कोकण किनारपट्टीकडे आगेकूच करत आहे व तो आज दुपारी कोकण किनारपट्टीवर दाखल होऊन पुढे संपूर्ण कोकण व्याप्त होईल.
संध्याकाळपर्यंत तो सह्याद्री पर्वतरांग ओलांडून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर,सातारा,पुणे, नाशिक भागात सुद्धा पावसाचा मोठा तडाखा देऊ शकतो.
आज एकंदरीत पाहता *कोकण*
म्हणजेच उत्तर गोवा,दक्षिण गोवा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,मुंबई महानगर,मुंबई उपनगर,पालघर,ठाणे....या जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
*पश्चिम महाराष्ट्र*
म्हणजे कोल्हापूर,सांगली, सातारा,पुणे,सोलापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
*उत्तर महाराष्ट्रातील*
नाशिक,अहमदनगरचा काही भाग,औरंगाबादचा काही भाग
असे आगेकूच करत पाऊस मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.
*एकंदरीत मान्सून खूप वेगात महाराष्ट्र पादाक्रांत करत आहे*
©
*राहुल रमेश पाटील*