Monday, October 31, 2011

एकरी १५० में. टन उस उत्पादनाची किमया.


गाजर गवत : गरज समूळ उच्चाटनाची

अत्र तत्र सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपाणी न घातला पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा कडेला, शेताच्या बांधावर, जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते. गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.

या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत. त्यामुळे गाजर गवताच्या समूळ उच्चाटनाची गरज लक्षात घेऊन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या सकल्पनेतून अमरावती येथे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ मंडळींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

राज्यात सुमारे चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापलेले आढळते. तसेच शेतीच्या पीक उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कृषी उत्पादनात वाढ करणे आणि गाजर गवताचे निर्मूलन करणे यासाठी सन २००६ मध्ये विधानसभेत ठराव पारित करण्यात आला होता. अजूनही हे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून या घातक गाजर गवताचे उच्चाटनासाठी तीन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम संबंधित यंत्रणेनी राबवावा या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.

कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचचे उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे.
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात.

पॉवर टिलर ठरला शेतकऱ्यांसाठी वरदान


भारत हा कृषी प्रधान देश आहे. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत शेती करण्याच्या पध्दतीत परिस्थितीनुरुप बदल होत गेले. शेतीच्या विकासाच्या दृष्टीने हे सकारात्मक बदल आहेत. अधिक उत्पादन देणारे बी- बियाणे, सुधारित लागवड पध्दती, पीक संरक्षणाचे उपाय व शेतीचे यांत्रिकीकरण आदी बाबीचा येथे उल्लेख करावा लागेल.

फार वर्षापूर्वी शेतकरी हा लाकडाच्या नांगराचा वापर शेतीच्या मशागतीसाठी करीत होता. यानंतर लोखंडी नांगराचा वापर करु लागला यासाठी बैलजोडी हे माध्यम होते. कालांतराने वाढत्या महागाईमुळे मजुरांची रोजंदारी वाढली, तसेच गुरांसाठी वैरणाची - चाऱ्याची कमतरता भासू लागली याचे परिणाम चाऱ्याचे दर वाढीवर झाले त्यामुळे शेतीसाठी बैलजोडी न परवडणारी झाली. शेतीसाठी आधुनिक यंत्रसामग्रीची आवश्यकता निर्माण झाली. त्यापैकीच पॉवर टिलर उपयुक्त ठरु लागला.

Wednesday, October 26, 2011

सेंद्रिय शुद्धता


राज्य शासनातर्फे सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेती आणि त्यासाठी लागणाऱ्या खतनिर्मिती युनिटबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पालगड गावातील कोंडविलकर कुटुंबाने चांगला गांडुळखत प्रकल्प उभारून शासनाच्या या प्रयत्नांना प्रतिसाद दिला आहे.

पुष्पा कोंडविलकर यांचेकडे पारंपरिक फळबाग आणि भाताची शेती होत असे. शेतीसाठी रासायनिक खतांचा वापर करण्यात येई. सेंद्रिय खताविषयी अधिक माहिती घेतल्यावर बाहेरून किंमत मोजून खत आणण्याऐवजी आपल्याच शेतात सेंद्रिय खताचे युनिट उभारण्याचे त्यांनी निश्चित केले. २००५ मध्ये श्री समर्थ गांडूळ खत प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली. कोंडविलकर गुरुजींनी निवृत्तीनंतर या युनिटकडे लक्ष देण्यास सुरूवात केली. प्रकल्पाची गुणवत्ता चांगली असली तर भूमीपुत्राचे ऋण फेडण्यासाठी खत प्रकल्पाच्या माध्यमातून चांगली संधी मिळेल म्हणून त्यांनी या प्रकल्पाचा सूक्ष्म अभ्यास केला.

रेशीम शेती....फायदा किती

प्रत्‍येक क्षेत्रात महिला ह्या पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून प्रगती करीत आहेत. शेतीमध्‍ये महिला केवळ निंदण, वखरण, मशागत आदी कामे करीत नाहीत तर या कामासोबतच संपूर्ण शेतीचा डोलारा आपल्‍या खांद्यावर घेतात. रेशीमच्‍या उत्‍पादनातून एकरी एक लाख रुपयांचे उत्‍पन्‍न घेण्‍याची किमया वरखेडच्‍या कुसुमताई ढगे यांनी केली आहे.

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्‍यातील वरखेड येथील श्रीमती ढगे यांनी रेशीम उद्योगात आदर्श निर्माण केला असून एकरी एक लाख रुपयांचे उत्‍पन्‍न मिळविले आहे. पाच वर्षात त्‍यांनी हा पल्‍ला गाठला आहे. पाथरीपासून १५ कि.मी. अंतरावर वरखेड शिवारात रामदास ढगे हे शेतातच राहतात. त्‍यांच्‍या पत्‍नी कुसूमताई यांना सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. त्‍यांनी पारंपरिक शेतीबरोबरच रेशीम शेतीला प्राधान्‍य दिले. पाच वर्षापासून त्‍या यशस्‍वीरित्‍या रेशीम शेती करीत आहेत. कुसूमताईंनी अडीच एकरात तुतीची लागवड केली असून त्‍यापासून त्‍यांना दरवर्षी सुमारे दोन लाख रुपयांचे रेशीम कोषाचे उत्‍पन्‍न मिळत आहे.

Thursday, October 20, 2011

इतिहास खेड्यांचा..


खेडे हा समाजाच्या उत्क्रांत अवस्थेतील एक महत्वाचा टप्पा आहे. त्याची निरनिराळी अवस्थांतरे व विविध प्रकार आहेत. ते समजून घेतले म्हणजे तेथील लोकजीवनाची, संस्कृतीची, नात्या-गोत्याची निरनिराळी अंगे लक्षात येतात. खेडयांचे अनेक प्रकार आहेत. त्यात स्थलांतर करणारी खेडी, अंशत: स्थायी खेडी, कायम स्थायी खेडी, नदी काठावरील खेडी, डोंगराळ व वालुकामय प्रदेशातील खेडी, नागरी समुदायाजवळची खेडी, जमीनदारी खेडी, रय्यतवाडी खेडी, सहकारी खेडी इत्यादी प्रकारात खेडयांची वर्गवारी करण्यात येऊ शकेल.

भारत हा खेडयांचा देश आहे. भारतातील ७० टक्के लोक आज सुध्दा खेडयांतच राहतात. त्यामुळे भारतीय जीवनाचे खेडे हे प्रमुख केंद्र फार प्राचीन काळापासून आहे. वेदकाळातील वाङमयामध्ये खेडयांचे महत्व वर्णिले आहे. एकंदरीत सर्वच दृष्टीकोनातून खेडयांचे भारतीय जीवनातील महत्वपूर्ण स्थान निश्चित झाले आहे. राज्यकारभारातील प्रमुख घटक म्हणून, सांस्कृतिक जीवनातील प्रमुख केंद्र म्हणून, सामाजिक जीवनातील प्रमुख आधार म्हणून खेडयांचे महत्व ओळखले गेले आहे. भारताचा आत्मा खेडयात राहतो, असे यथार्थ वर्णन महात्मा गांधी यांनी केले होते.

सौर ऊर्जा कुंपणामुळे शेतकऱ्यांना दिलासा


विदर्भातील बहुतांश शेती ही कोरडवाहू प्रकारात मोडते. त्यामुळे शेतीत अधिक उत्पादनासाठी जशी सिंचन सुविधांची गरज असते तशीच गरज असते ती त्यांच्या पिकाच्या सुरक्षिततेची. निसर्गावर अवलंबून असणाऱ्या येथील शेतीतील पिकाचे शेतकऱ्यांना संरक्षण करता आले नाही तर तो कायमचा कफल्लक, कर्जबाजारीच राहील. म्हणून त्यांच्या पिकाला तारेचे अथवा सौर उर्जेचे कुंपण घालून अथवा अन्य मार्गांचा वापर करुन संरक्षण मिळण्याची गरज असते. गोरगरीब शेतकरी कुंपणासाठी पैसे खर्च करण्यास मागेपुढे पाहतो, कारण त्यांची प्राथमिकता ही त्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण करण्याची असते.

Wednesday, October 19, 2011

'धवल' यशाचा मार्ग
कोकणातील भातशेती सामान्य शेतकरी आणि शेतमजूरांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. भातकापणीनंतर त्याच जमिनीवर पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन त्यांची विक्री करायची हाच पर्याय या शेतकऱ्यांसमोर असतो. ग्रामीण भागातील महिला शेतावर मोलमजूरी करून कुटुंबासाठी अर्थार्जन करतात. शेतीच्या हंगामानंतर मात्र घरातील अर्थशास्त्राचे नियोजन करणे त्यांना जड जाते. अशा महिलांसाठी बचत गट चळवळ आधार ठरली आहे. खेड तालुक्यातील दयाळ गावातील महिलादेखील याच चळवळीच्या माध्यमातून स्वावलंबी झाल्या आहेत.

कारल्याचे गोड गाव


अकोला जिल्हा मुख्यालयापासून ३५ किमी अंतरावर डोंगराच्या कुशीत वसलेल्या जनुना गाव गावात पारंपरिक पध्दतीने शेती व्यवसाय केला जात असे पारंपारिक शेतीतून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नव्हते म्हणून या गावक-यांनी नव्या पिकाचा शोध सुरु केला.कारल्याच्या रुपाने हा शोध पूर्ण करण्यात या गावक-यांना यश आले. महान या सिंचन प्रकल्पामुळे जनुना गावाचा जन्म झाला.तब्बल १५ वर्षापूर्वी वसलेले हे गाव दळणवळणाच्या सोयीसुविधेपासून कोसो दूर होते.

आज गावातून दळणवळण वाढले आहे. ६० कुटुंब आणि ३५० लोकसंख्या असलेल्या या गावात १९१ हेक्टर शेतीचे क्षेञ आहे. मूग,कापूस,सोयाबीन आणि उडीद या पारंपारिक पिकातून म्हणावे तेवढे उत्पन्न मिळत नाही. खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ घालण्याची कसरत फार मोठी होती,असे सांगणारे शेतकरी कारल्यानेच तारले,असे अभिमानाने सांगतात.

हिरव्या शेतात पिकतयं 'सोनं'


कोकणातील डोंगराळ भागात शेती करणे हे कष्टाचे आणि तेवढ्याच जिकिरीचे काम असते. मुंबई आणि पुणे येथे होणाऱ्या स्थलांतरामुळे शेतीसाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होणे कठीण असते. डोंगरावरील चढउतारामुळे शेती कसण्यासाठी प्रचंड परिश्रम करावे लागतात. शिवाय सातबारा उताऱ्यावर कुटुंबातील अनेकांची नावे असल्याने जमिनीच्या मालकीलाही मर्यादा येतात. शेतीच्या कामांसाठी वेळेवर मजूर उपलब्ध होत नाहीत. यावर उपाय म्हणून कृषि विभाग आणि कृषिभूषण रणजीत खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणात सामुहिक शेती मुळ धरू लागली आहे. सामुहिक शेतीचा असाच यशस्वी प्रयोग रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यातील अलोरे गावात करण्यात आला आहे.

घनकचऱ्यापासून सेंद्रिय आणि जैविक खतनिर्मिती


घनकचऱ्यापासून खतनिर्मिती करणारा राज्यातील तिसरा प्रकल्प अकोला येथील अमानतपूर ताकोंडा येथे सुरु आहे. प्रत्येक आठवड्याला १०० टन सेंद्रिय, जैविक खतनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पास आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पामुळे घनकचऱ्याचे नियोजन करणे अकोला महापालिकेला शक्य तर झालेच शिवाय आर्थिक उत्पन्नातही वाढ झाली आहे.

अकोल्यातील भूधन ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २००३ मध्ये शहरापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या अमानतपूर ताकोंडा येथे खतनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी महानगरातील घनकचरा पुरविण्यात येतो. त्यासाठी मनपाला प्रती खेप १०० रुपये मिळतात. हा प्रकल्प सुरु झाल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे मनपाला सहज शक्य झाले आहे.

Sunday, October 16, 2011

लिंबूवर्गीय फळांची आता यंत्राने तोडणी


लिंबूवर्गीय फळपिकांच्या तोडणीतील श्रम कमी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी विभागाने अद्ययावत यंत्र विकसित केले आहे. संयुक्त संशोधन परिषदेच्या बैठकीत या यंत्राच्या प्रसाराला मान्यता मिळाली आहे.

पारंपरिकतेसोबतच व्यावसायिक शेतीकामात मजुरांच्या उपलब्धतेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मजुरांच्या उपलब्धतेच्या या समस्येचे समाधान काही अंशी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच हा एक पुढील टप्पा बनू शकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

शेतक-यांनी तयार केली पाण्याची बँक


सातारा तालुक्यातील धावडशी हे छोटेसे गाव. या गावातील १५ शेतकऱ्यांनी एकत्र येउन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला आणि सर्वानुमते विचारांती योग्य नियोजन होउन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरवात केली. साता-यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलिस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहका-यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.

Wednesday, October 12, 2011

गोंधळवाडीचा गोडंबी उद्योग


अकोला जिल्हयातील पातूर तालुक्याच्या ठिकाणापासून १२ किलोमिटर अंतरावर ९०० आदिवासी वस्ती असलेल्या गोंधळवाडी या गावक-यांचे उत्पन्नाचे साधन म्हणजे शेती आणि मजुरी. कमाल जमीनधारणा आणि कोरडवाहू शेतीतील उत्पादकतेच्या मर्यादा त्यामुळे उत्पन्नाचे इतर पर्याय या ग्रामस्थांकडून शोधणे सुरु होते.गोधळवाडी ग्रामस्थांचा हा शोध वाशीम जिल्हयातील मालेगाव तालुक्यातील अमानी गावात संपला.

अमानीतील पंरपरागत गोडंबी उद्योग,त्यापासन झालेली रोजगार निर्मिती व मिळणारे उत्पन्न अशी सर्वांग माहिती मिळविण्यासाठी गोंधळवाडी येथील रामदास गोदमले यांनी पुढाकार घेतला.बिब्बा उद्योगाशी संबंधित माहिती घेतल्यानंतर कोरडवाहू शेतीला या गोडंबी उद्योगाची जोड दिल्यास निश्चितच उत्पन्नात भर पडेल आर्थिक स्थैर्य लाभेल असा विश्वास या गावातील रामदास गोदमले यांना आला. त्यानंतर त्यांनी अमानीतील या उद्योगाकरिता लागणा-या कच्चा मालाचे पुरवठादारांशी संपर्क साधत त्यांच्याशी व्यावसायिक बोलणी केली. गेल्या चार वर्षापासून गोंधळवाडीतील बहुतांश घरात बिब्बे फोडून गोडंबी उत्पादन घेतले जाते.

बंधा-यात पाणी...... ग्रामस्थ समाधानी

पंढरपूर तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशील असणारे गाव म्हणून गादेगावचा उल्लेख होतो. गावाच्या विकासाबाबत येथील नागरिक सदैव जागरुक असतात. पंढरपूर तालुक्याच्या पश्च्चिमेला असणा-या व सुमारे १० हजार लोकसंख्या असलेल्या गादेगाव मध्ये प्रशासन व जनता एक विधायक कामासाठी एकत्र आली आणि त्यातून उभे राहिले एक सकारात्मक कार्य.

या गावाच्या पश्चिमेस ओढयावर बांधण्यात आलेल्या शिवकालीन पाणी साठवण बंधा-याच्या भिंतीतून पाण्याची गळती होत असल्याने तलावामध्ये पाणी साठवणूक होत नव्हती.यामुळे या गावातील पिण्याच्या पाण्यासाठी नागरीकांचे हाल होत होते. यावर सर्व ग्रामस्थांनी एकत्र येवून गळती दुरुस्त करण्याबाबत ग्रामपंचायतीला सुचविले. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ही गळती दुरुस्त करण्याचा निर्णय घेतला.

चांदवडी माळरानावर फुलविली आमराई


तीन गावांच्या सरहद्दीवर वसलेले वेलंग (चांदवडी)(पु.) हे वाई तालुक्यातील गाव. येथील सुनंदा पाटणे या प्रगतीशील शेतकरी महिलेने आपल्या स्वत:च्या खडकाळ जमिनीत खडक फोडून आमराईचे स्वप्न साकार केले आहे. श्रीमती पाटणे यांचा आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून हा एक आदर्श प्रयोग म्हणून पंचक्रोशीत ओळखला जावू लागला आहे.

सौ. पाटणे यांचे पती हिंदूराव पाटणे राज्य परिवहन महामंडळाकडे वाहक पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांना शेतीकडे पुरेसा वेळ देता येत नाही. पूर्वीचे हे गाव धोम धरणात गेल्यामुळे जांब, खडकी, मर्ढे या गावांच्या माळावर या प्रकल्पग्रस्तांना वसविण्यात आले आहे. पुनर्वसित मंडळींना थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या गावात शेतजमिनी मिळाल्यामुळे प्रयोगशील शेती करता येत नव्हती. हीच अवस्था सुनंदा पाटणे यांची होती.

सामाजिक वनीकरणाने बहरले रस्ते


ग्लोबल वॉर्मिंगचा धसका अख्या जगाने घेतला आहे. वृक्षतोड सातत्याने सुरु राहिल्यास निश्चितच ऋतुचक्र बदलून मोठा दुष्परिमाण भोगावा लागेल हे सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिषाची गरज नाही. सामाजिक वनीकरण विभाग वृक्षलागवडीसाठी दरवर्षी प्रयत्न करीत आहे. शासनाबरोबरच नागरिकांनी जेथे पुढाकार घेतला आहे तेथे परिस्थिती आशादायी असल्याचे पहायला मिळते.

Monday, October 10, 2011

शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्प - राधाकृष्ण विखे पाटील


राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्प गोगलगाव येथे राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत संकरीत गाई, शेळीपालन, कुक्कुट पालन, शेततळे, ठिबक सिंचन आदी योजना एकत्रितपणे राबवून शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नती साधावी असे प्रतिपादन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे केले.

राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या डाग पाझर तलावाचे भूमिपूजन व कोरडवाहू शाश्वत शेती प्रकल्पाचा शुभारंभ श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते.

Thursday, October 6, 2011

समाजात मांगल्य निर्माण करू या - मुख्यमंत्री


अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद यासारख्या कुप्रवृत्ती नष्ट करून समाजात मांगल्य निर्माण करू या, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दसऱ्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

विजयादशमी म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा आणि विजयोत्सवाचा सण आहे. दुष्प्रवृत्तींवर सत्प्रवृत्तींच्या विजयाचे प्रतीक म्हणून आपण हा सण उत्साहाने साजरा करतो. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, दहशतवाद याबरोबरच जातीभेद, वर्णभेद, धर्मांधता, अंधश्रद्धा याविरुद्ध लढण्यासाठी विजयादशमीचे पर्व प्रेरणादायक आहे. या पवित्र सणाशी अनेक पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ जोडले असले तरी याचे केवळ प्रतिकात्मक महत्व नाही, तर आपण सर्वांनी यानिमित्ताने एकत्र येऊन समाजातील दुष्प्रवृत्तींविरुद्ध लढण्याची प्रतिज्ञा केली पाहिजे. अनिष्ट प्रवृत्तींचा नाश करून मांगल्याचे स्वागत करूया असे मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

राज्यात हळव्या भाताची काढणी सुरु तर भुईमूग, तूर, कापूस पक्वतेच्या अवस्थेत


राज्यात चालू वर्षी खरीप पिकाच्या दृष्टीने चांगला पाऊस झाला असून हळव्या भाताची काढणी सुरु झाली आहे. निमगरवे भात दाणे भरण्याच्या अवस्थेत तसेच गरवे भात फुलोरा अवस्थेत आहे. ज्वारी दाणे भरण्याच्या अवस्थेत असून बाजरीची काढणी सुरु आहे. मूग, उडीद आणि सोयाबीन पिकाची काढणी सुरु झाली आहे. भुईमूग, तूर आणि कापूस पक्वतेच्या अवस्थेत आहेत.

राज्यात चालू वर्षी आतापर्यंत १,१६७.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

राज्यातील नाशिक जिल्ह्यातील देवळी, सातारा जिल्ह्यातील मान दहीवडी, सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ, पलूस, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम, नांदेड जिल्ह्यातील भोकर, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा, आणि यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी अशा एकूण ११ तालुक्यात ४० ते ६० टक्के एवढाच पाऊस झाला आहे.

जलसंधारणामुळे लोधवड्यात पाणीच पाणी


केवळ अभियानांमध्ये क्रमांक मिळविण्यापेक्षा गावाच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटविण्यासाठी केलेले श्रम आता फलदायी ठरल्याचे समाधान लोधवडेकरांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळत आहे. यंदा माणमध्ये पावसाने हुलकावणी दिल्याने भविष्यात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, जलसंधारणांच्या कामांमुळे लोधवडे परिसरात पाण्याची चिंताच उरलेली नाही.

उन्हाळ्यात लोधवडेकरांच्या पाण्यासाठी टँकरची प्रतीक्षा करावी लागत असे, ही स्थिती बदलायला हवी हे समजत होते, पण त्यासाठी काय करावे हेच गावकऱ्यांना उमजत नव्हते. याच दरम्यान गावचे सुपुत्र व सध्याचे कृषि सचिव प्रभाकर देशमुख यांच्या प्रयत्नातून इंडोजर्मन प्रकल्पाचे फादर रॉबर्ट डिकोस्टा यांनी गावाला भेट दिली आणि लोधवडेकरांच्या भाग्योदयास सुरवात झाली. या प्रकल्पाची सुरवात गावात करण्यात आल्याने अनेकांना रोजगराही मिळाला. सुरवातीला लोकांनी श्रमदानातून काम करून इंडोजर्मनच्या परीक्षेत ग्रामस्थांनी बाजी मारली.

जमिनीच्या पुनर्मोजणी संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय - मुख्यमंत्रीराज्यातील भूमि पुनर्मोजणीसंदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी मुंबईत केले. 

राष्ट्रीय भूमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (NLRMP)अंतर्गत भू -मापन संदर्भात जमाबंदी आयुक्त आणि संचालक चंद्रकांत दळवी यांनी मुख्यमंत्र्यांसमोर सादरीकरण केले, त्यावेळी ते बोलत होते.

या सादरीकरणास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री आर.आर.पाटील, मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव राजीव अग्रवाल, वित्त विभागाचे प्रधान सचिव एस.के. श्रीवास्तव, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सिताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. नितीन करीर व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Tuesday, October 4, 2011

फुलशेतीतून लाखाचे उत्पन्न


कष्ट आणि जिद्द यातून यश मिळवता येते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळच्या वरुड येथील माधव पडघणे या रोजंदारी कामगाराने नर्सरीचे स्वप्न बघितले आणि प्रयत्नातून पूर्ण केले. रोजंदारी कामगार आज निसर्ग नर्सरीचा मालक झाला.

श्री. पडघणे पाच वर्षांपूर्वी वरुडच्या नर्सरीत रोपट्यांना पाणी देण्याचे काम करीत होते. चिकित्सक वृत्तीमुळे पाणी देण्याबरोबरच झाडावर डोळे बांधून कलम तयार करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. एवढ्यावरच न थांबता नर्सरी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. त्यादृष्टीने थोडीफार बचत करीत व मक्त्याने शेती करून पैसा जमविला व दीड एकर शेती विकत घेतली. या शेतीत फुलशेती फुलवून श्री. पडघणे यांनी आर्थिक बाजू भक्कम केली. गुलाब, निशीगंध, ग्लॅरेडिया, वॉटर लिली, झेंडू आदी फुलांची लागवड करून त्यांचा शहरातील बाजारपेठेत पुरवठा केला. यातून त्यांनी नागपूर रोडवर नर्सरीसाठी जागा विकत घेतली. श्री. पडघणे यांची नर्सरी आज तेथे बहरली आहे.

Sunday, October 2, 2011

मत्स्य व्यवसायाने मालामाल केले


श्रीमती मालाबाई बंडुजी डहारे ही अतिशय कष्टाळू परंतु गरीब महिला होती. मनामध्ये स्वत:करिता व समाजाकरिता काहीतरी वेगळं करण्याची धडपड,यामुळे आपल्या परिसरातील सहयोगिनीच्या मदतीने १४ महिलांना एकत्रित केले व सिद्धी महिला बचत गटाची स्थापना १/३/२००६ रोजी नगरधन ता. रामटेक येथे केली 

गटाचा व्यवहार सुरळीत असल्यामुळेच युको बॅक ,नगरधनच्या बॅक व्यवस्थापकाने गटाचे ग्रेडेशन करुन गटाला प्रथम कर्ज १५ हजार उपलब्ध करुन दिले. यापैकी मालाबाई यांनी रुपये पाच हजार कर्ज गटाकडून २ टक्के व्याज दराने घेतले. त्यामुळे छोट्या तळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टप्प्या टप्याने सदर कर्जाची गटाला परतफेड केली. त्यातून मालाबाईला रुपये दोन हजार सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा मिळाला.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून फुलविली पपई बाग


यवतमाळ जिल्ह्यातील पोफाळी (कारखाना) येथून चार किलोमिटर अंतरावर असलेल्या पळशी येथील प्रगतशिल शेतकरी गोविंद तासके यांनी परंपरागत शेती व पीक पध्दतीला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व शासनाच्या एन.एच.एम. अंतर्गत पपईची बाग फुलविली आहे.

अवघ्या आठ महिन्याच्या कालावधीत या शेतकऱ्याला पहिल्या तोड्यात १ लाख १० हजार रुपये तर दुसऱ्या तोड्यात ६० हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. गोविंद तासके यांनी मागील वर्षी १८ नोव्हेंबर २०१० रोजी दोन हेक्टरमध्ये पपई पिकाची लागवड केली होती. पपईच्या दोन झाडातील अंतर त्यांनी ७ बाय ८ ठेवून ड्रीप तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळे सिंचन करणे सुलभ झाले. एका झाडाला ७० ते १०० पर्यंत पपया लागल्या आहेत. दोन हेक्टरमध्ये १ लाख ६० हजार रुपये खर्च आला. शेतात ३ हजार झाडे उभी असून येत्या काळात ६ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे तासके यांनी सांगितले.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद