Monday, October 31, 2011

गाजर गवत : गरज समूळ उच्चाटनाची

अत्र तत्र सर्वत्र उगवणारे गाजर गवत सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणतेही खतपाणी न घातला पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा कडेला, शेताच्या बांधावर, जंगलात अशा ठिकाणी हे गवत उगवते. गाजर गवत किती उपद्रवी आहे हे कोणाला कितपत माहित असेल हे सांगता येत नाही.

या गाजर गवताचे मानवी आरोग्यावर आणि पिक उत्पादनावर मात्र अनिष्ट परिणाम होतात हे तितकेच खरे आहे. या गवताच्या संपर्कात आल्यास त्वचा रोग, ॲलर्जी, श्वसनाचे आजार उद्भवतात. गाई, म्हशींनी गाजर गवत खाल्ले तर दूधात कडसरपणा येतो असे अनेक अवगुण या गाजर गवतात आहेत. त्यामुळे गाजर गवताच्या समूळ उच्चाटनाची गरज लक्षात घेऊन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त गणेश ठाकूर यांच्या सकल्पनेतून अमरावती येथे संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना तज्ज्ञ मंडळींनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

राज्यात सुमारे चार ते पाच लाख हेक्टर क्षेत्र गाजर गवताने व्यापलेले आढळते. तसेच शेतीच्या पीक उत्पादनात घट होत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे, कृषी उत्पादनात वाढ करणे आणि गाजर गवताचे निर्मूलन करणे यासाठी सन २००६ मध्ये विधानसभेत ठराव पारित करण्यात आला होता. अजूनही हे गाजर गवत मोठ्या प्रमाणावर दिसून येते. म्हणून या घातक गाजर गवताचे उच्चाटनासाठी तीन वर्षाचा कालबध्द कार्यक्रम संबंधित यंत्रणेनी राबवावा या दृष्टीने या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते.

गाजर गवताची उत्पत्ती
मे‍‍‍‍क्सिको (अमेरिका) हे गाजर गवताचे उगमस्थान आहे. आपल्या देशात १९५५ मध्ये प्रथम पुणे येथे हे गवत निदर्शनास आले. अशी माहिती अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही एम. भाले यांनी दिली. या कार्यशाळेत सादरीकरणाव्दारे डॉ. भाले यांनी गाजर गवताचा पूर्वइतिहास, मानवी आरोग्यावर होणारे विपरित परिणाम, गाजर गवत कुठे आढळते, याविषयी सविस्तर प्रबोधन केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील कृषी तज्ज्ञ डॉ. रत्नप्रसाद वासकर यांनी कार्यशाळेत माहिती देतांना सांगितले. की, राज्यात १९७२ च्या दुष्काळी परिस्थितीत आयात झालेल्या मिलो ज्वारी, गव्हाच्या माध्यमातून गाजर गवताचे बी आपल्याकडे आले. हवेच्या प्रवाहासह ते सर्वत्र पसरले आणि गाजर गवत पक्के ठाण मांडून बसले.

हे गाजर गवत, आम्लयुक्त, अर्कयुक्त जमिनीवर कमी पाऊस पडला तरीही उगवते. पिकाची नासाडी, ॲलर्जी, चर्मरोग, श्वसनाचे आजार उद्भवतात. त्यामुळे हे गवत उपद्रवी आहे मानले जाते.


प्रतिबंधात्मक उपाययोजना
आपल्याकडे गाजर गवत इतके फोफावत आहे. त्यामुळे त्याचा झटपट नायनाट होणार नाही परंतु टप्प्याटप्प्याने सामूहिकरित्या मोहिम, उपक्रम घेण्यात आले तर ते शक्य आहे.

परभणी येथील मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. डब्ल्यू. वडनेरकर यांनी गाजर गवताच्या प्रतिबंधात्मक उपायोजनाची माहिती दिली. गाजर गवताचे निर्मूलन करणे अत्यावश्यक असून. जैविक नियंत्रण पध्दतीनुसार मेस्किकेन भुंग्याव्दारे या गवतांवर नियंत्रण ठेवता येते. कारण विद्यापीठात करण्यात आली आणि त्याचे परिणामही अनुकूल दिसून आले.

या गवताच्या नायनाटासाठी तणनाशके महागडी असल्याने परवडत नाही. गवत विषारी असल्यामुळे मजूर काम करत नाहीत त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी संशोधन सूरु झाले. या गवतावर २२ प्रकारच्या कीडी तात्पुरत्या स्वरुपात आढळतात. १९८३ मध्ये मेक्सीको भुंगा हा उत्तम प्रकारे नियंत्रक करु शकतो ही बाब संशोधनातून समोर आली. परभणी येथे कृषी विद्यापीठात या भुंग्याचे प्रजनन करण्यात येते.

नव्या जागेत हे भुंगे सोडण्याची प्रक्रीया सांगताना डॉ. वडनेरकर म्हणाले, शेतात प्रती हेक्टरी ५०० भुंगे सोडले पाहिजेत. हे भुंगे एका सच्छिद्र पॉलीथीन पिशवीतून आणून सोडावेत. प्रती भुंगा एक रुपया अशी त्याची किंमत आहे.

याशिवाय १०० लिटर पाण्यात २० किलो जाडे मिठ घालून केलेले द्रावण गाजर गवतावर फवारावे तसेच तरोटा ही वनस्पती सुध्दा गाजर गवताला नियंत्रित करु शकते त्यामुळे ऑक्टोंबर महिन्यात तरोट्याच्या बिया गोळा कराव्यात आणि या बियाची एप्रिल, मे महिन्यात गाजर गवताच्या पसिरात धूळफेक करावी.

गाजर गवत निर्मूलनासाठी, नागरिक, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्या सहकार्याने संबंधित यंत्रणांनी मोहिम हाती घेणे गरजेचे आहे.

अमरावती विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर परिषदांचे मुख्याधिकारी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), कृषी विभागाचे अधिकारी, विद्यापीठाचे प्रतिनिधी आदिंनी प्रशिक्षण कार्यशाळेचा लाभ घेतल्यामुळे गाजर गवत उच्चाटनाची मोहिम यशस्वी होईल अशी अपेक्षा आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद