गटाचा व्यवहार सुरळीत असल्यामुळेच युको बॅक ,नगरधनच्या बॅक व्यवस्थापकाने गटाचे ग्रेडेशन करुन गटाला प्रथम कर्ज १५ हजार उपलब्ध करुन दिले. यापैकी मालाबाई यांनी रुपये पाच हजार कर्ज गटाकडून २ टक्के व्याज दराने घेतले. त्यामुळे छोट्या तळ्यामध्ये मत्स्य व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर टप्प्या टप्याने सदर कर्जाची गटाला परतफेड केली. त्यातून मालाबाईला रुपये दोन हजार सर्व खर्च वजा जाता निव्वळ नफा मिळाला.
त्यानंतर दोन महिन्यानंतर पुन्हा गटाकडून २ टक्के व्याजदराने दहा हजार कर्ज मत्स्य व्यवसाय वाढविण्याकरिता घेतले. त्यामधून रुपये पाच हजार नफा झाला. त्यानंतर बॅकेने गटाचे व्दितीय ग्रेडेशन केले व महाराष्ट्र शासनाच्यावतीने जाहीर झालेल्या ४ टक्के योजनेनुसार रुपये ८० हजार कर्ज गटाला दिले. त्यामधून रुपये ५० हजार कर्ज मालाबाईने मत्स्य व्यवसाय वाढविण्याकरिता गटाकडून २ टक्के व्याजदराने कर्ज घेतले. त्यामधूनच मालाबाई महिन्याला तीन ते पाच हजार रुपये मासिक नफा प्राप्त करते.
मालाबाई अत्यंत नम्र ,विनयशील आहेत. कुणालाही मदत लागली तर त्या सदैव तत्पर असतात. त्यामुळेच गटाच्या माध्यमातून मालाबाईनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले. माविममुळेच मी घडले याची जाणीव ठेवून मालाबाई माविमचे सतत आभार व्यक्त करत असतात. मालाबाईच्या निरंतर प्रयत्नातूनच त्यांचा विकास झाला.
मालाबाईची प्रेरणा अनेक महिलांना शिकण्यासारखी आहे. त्यांनी जीवनाशी संषर्ष करीत वेळ प्रसंगी गावकरी लोकांशी दोन हात केले. परंतु हरली नाही. सतत निरंतर प्रयत्नातून तिचा उदय झाला व आज ती संघर्षातून लढा देत देत इतपर्यंत पोहचली, भविष्यात यापेक्षा मोठा व्यवसाय करुन इतर महिलांना यामध्ये सामावून घेण्याची मनिषा त्यांनी व्यक्त केली आहे.

No comments:
Post a Comment