Monday, October 31, 2011

कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचचे उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे.
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात.

सदर बचतगटास काही तरी उदयोग करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच कालावधीत राज्य सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाकडून बचतगटाच्या विविध उपक्रमाविषयी प्रस्ताव मागविले होते. या महामंडळाने कांदा बीज उत्पादनास प्राधान्य देण्याचें ठरवले. कारण नाशिक जिल्हयात कांदयाची मोठी बाजारपेठ असली तरी दरवर्षी कांदा बीज मिळविण्यासाठी शेतक-यांना नेहमीच अडचण येते. त्यामुळे कांदा बीज हा मुख्य प्रकल्प हाती घेतला. त्यादृष्टीने शहर परिसराचा अभ्यास केला. हा प्रकल्प राबविण्यासाठी जमिनीची आवश्यकता होती. परंतु जमीनीची किंमत लोक अव्वाच्या सव्वा सांगत होते. यावेळी बचतगटाच्या महिलांनी माविमच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक अधिकारी ज्योती निंभोणकर यांची भेट घेतली . त्यांना कांदा बीज शेती करावयाचे सांगितल्यावर ज्योती निभोणकर यांनी नायकवाडी परिसरास भेट दिली. चर्चेच्या अंती या बचतगटाच्या महिला सभासदाची एक एकर ३० गुंठे शेत जमीन कांदा बीज उत्पादनासाठी १० वर्षासाठी भाडे तत्त्वार घेतली. तसेच भाडयापोटी विहिर दुरुस्त करण्याचे देण्याचे ठरले.हा संपूर्ण खर्च एकंदरीत ४० ते ५० हजार रुपयापर्यंत होता. यासाठी माविमने २८ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले तर महिलांनी तेरा हजार रुपये जमा करुन एकुण ४५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीचा उपयोग कांदा बीज उत्पादनाची सामूहिक शेती करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात येवुन शेतीचा उत्पादन काढण्यासाठी प्रगतीचे पाऊले पडू लागले.

महत्वाचे म्हणजे कांदा बीज लागवडीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी पिंपळगाव येथील द्राक्ष कृषी संशोधन केंद्रास महिलांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले. यास राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठानचे सहकार्य मिळाले. या प्रतिष्‍ठानकडून परतीच्या बोलीवर बियाणे घेण्यात आले. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये कांदा लागवडीस सुरुवात झाली. बचतगटाच्या महिला सदस्यांना या कामासाठी पाठींबा मिळावा यासाठी त्यांच्या पतीची समज काढण्यात आली की यातून मिळणारा पैसा हा घरची आर्थ्रिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. त्यानंतर महिलांना घरचा सदर उदयोग करण्यास उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे.

कांदयाला जेव्हा पालवी फुटली तेव्हा आलेली पालवी काढून टाका म्हणजे नवीन पाने आल्यावर चांगले उत्पादन येते असे मत गावातील मंडळीनी व्यक्त केले. असा गैरसमजाचा सल्ला समन्वयक ज्योती निभोणकर यांनी समजल्यावर त्यांनी महिलांची बैठक घेऊन कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कांदयाची पाने कापणे चुकीचे व अत्यंत धोकादायक असल्याचे स्पषट केले. कोणाचे ऐकण्यापेक्षा बचतगटाच्या सदस्यांनी माविम अथवा कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून असलेल्या अडचणी शंकाचे निरसन करावे असाही निभोणकर यांनी मोलाचा सल्ला दिला. या बचतगटाने इंटरनेट , वेगवेगळी पुस्तके, कृषी प्रदर्शने अशा माध्यमतून कांदा उत्पादना विषयी माहिती घेत या प्रकल्पाकडे काळजीपूर्वक लक्ष दयायला सुरु केले. महिलांनी वेळोवळी कांदा बीज व्यवस्थेत यावे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. एनएचएफाआरडीच्या वतीने दर महिन्यास कांदयाच्या पिकाचे अवलोकन केले जाते. त्यांच्या या अथक प्रयत्नांना आज फळ आले कांदा बीज उत्पादनाची शेती या महिलांनी यशस्वीपणे करुन दाखविली . या हंगामात बचतगटास या शेतीव्दारे अडीचशे क्विंटल बीज हाती आले आहे. हे बीज त्यांनी कराराप्रमाणे एनएचएफआरडीकडे सूपूर्द केले असून त्यांची गुणवत्ता तपासून त्यांची रक्कम लवकरच त्यांची हाती पडेल.
ग्रामीण भागातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे येत असून उत्तम प्रकारे उदयोग करुन रोजगार उपलब्धतेबरोबर स्वावलंबी होण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. यांचा आदर्श इतरांनी घेतला तर रोजगार मिळून स्वावलंबी होऊ शकतो. हे खरोखरच महिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद