Sunday, February 27, 2011
माणिकगड पहाडावरील हरितक्रांती.
परदेशात जातेय येलदरीची कोळंबी.
Wednesday, February 23, 2011
वाळव्यातील कृषी प्रकल्प.
भारस्वाडय़ाचा एकात्मिक दुग्ध प्रकल्प
कराडात साकारला पहिला ऍग्रो टुरिझम प्रकल्प.
गव्हाच्या शेतीची यशोगाथा.
Sunday, February 20, 2011
आवळा प्रक्रिया उद्योगाने दाखविली यशाची वाट
'महान्यूज
Wednesday, February 16, 2011
द्राक्ष बागेतल्या आंतरपिकातून कमाई.
सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुका बागायत पिकांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या तालुक्याचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे अनेक अभ्यासू शेतकरी आपल्या छोटय़ाशा जमिनीत अनेक छोटे-मोठे प्रयोग करीत असतात. अशाच कष्टाळू शेतकर्यांमध्ये जालिंदर जमादार यांचा समावेश होतो. आपल्या केवळ अर्धा एकर जमिनीवर अधिक पिकाचा ताण येत असतानासुद्धा त्यांनी प्रयासाने आतरपीक घेऊन आपल्या शेतकरी मित्रांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
याबाबत माहिती देताना श्री. जमादार म्हणाले, आपल्या द्राक्ष बागेत आंतरपीक घेण्याचे मी ठरवताच, माझ्या मित्रांनी, नातलगांनी याबाबत मला प्रोत्साहनच दिले. माझ्या बागेसाठी ढबू व लवंगी मिरचीची उच्च प्रतिची रोपे मी आणली. प्रत्येकी १० गुंठय़ामध्ये मी ढबू आणि लवंगीची लागवड केली आणि मग द्राक्ष व या रोपांसाठी मी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. २०१० मध्ये जूनच्या शेवटच्या आठवडय़ात ही सर्व लागवड मी केली.
आंतरपीक घेताना वेगवेगळे खत देण्याचे प्रयोग मी केले. सर्वप्रथम शेण व मलमूत्र आणि फॉस्फेटची अर्धा लिटर आळवणी घालून नियोजनानुसार पाणी, खते आणि औषधांचा वापर केला. त्यामुळे रोपांची चांगलीच वाढ झाली. या बरोबर डीएपी/एमओपी/युरिया/१०:२६:२६, १०:२०:२० नर्मदा कॅन, करंजी व लिंबोळी पेंडेचीही मात्रा दिली. ही खते देत असताना रिंग पद्धतीचा वापर करुन प्रत्येकी चार दिवस दोन तास भरपूर पाणी दिले.
या सर्वांचा परिणाम आता दृष्टीस पडतो आहे. या महिनाअखेर ढबूचे मी दहा टन तर लवंगीचे सात टन उत्पन्न घेतले आहे. माझी ही ढबू व लवंगी मिरची पुण्या-मुंबईला जात आहे. ढबूला २०० रुपये तर लवंगीला १५० रुपये प्रती १० किलो भाव मिळत आहे. आता दुसर्या २० गुंठय़ामध्ये आपण कोबीची याच तर्हेने लागवड केली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.
आताचे हे हवामान शेतीला पोषक नाही. आपल्या द्राक्षबागेची जोपासना हवामानाचा अंदाज घेऊन मी करत आलो आहे. सध्या आकाशवाणी, दूरदर्शन तसेच मोबाईलवर येणारे एसएमएस पाहून त्याप्रमाणे मी उपाययोजना करत असतो. गेली तीस वर्षे द्राक्षबागेचा प्रयोग आपण करत आहोत. या अनुभवाचा उपयोग केल्याने माझ्या बागेवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला नाही. हवामानाचा अंदाज घेत सर्व कामे आपण वेळीच केली. थंडीचे वातावरण असूनही कोणताही रोग अथवा प्रादूर्भाव आपल्या बागेवर झाला नाही, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
मिरचीचे विक्रमी उत्पन्न घेऊनही द्राक्षाच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही, याची खात्री त्यांची बाग पहात असताना येत होती. एका वेलीवर २५ ते ३० घड लटकताना दिसत होते. फळांचा आकारही चांगलाच दिसत होता. स्वत: जमादार हे मजुरांबरोबर शेतात उन्हामध्ये राबत असतात. पोटच्या मुलाप्रमाणे या बागेची काळजी त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल कृषी विभाग, प्रगतीशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांनी घेतली आहे. 'अधिक धान्य पिकवा' अशा घोषणा देताना श्री. जमादारांचा हा प्रयोग आपणाला बरेच काही सांगून जातो.
'महान्यूज'
कशी रोखली गेली चिनी कांद्याची घुसखोरी!
जागतिक बाजारातील नेमक्या गरजा लक्षात घेऊन त्या दृष्टीने नियोजन करण्यात वाकब्गार असणाऱ्या चीनने दोन महिन्यांपूर्वी भारतात निर्माण झालेल्या टंचाईच्या पाश्र्वभूमीवर, आपल्या कांद्याचे मार्केटींग करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय कांद्याच्या तुलनेत आकाराने भलामोठा दिसणारा अन् रंगातही वेगळेपण अधोरेखीत करणाऱ्या चिनी कांद्याचे जेव्हा मुंबईच्या बाजारात आगमन झाले, तेव्हा भल्याभल्यांचे लक्ष वेधले गेले. कांदा उत्पादनात वेगवेगळे प्रयोग करणारी नाशिकस्थीत राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन व विकास प्रतिष्ठान संस्थाही त्यास अपवाद राहिली नाही. उलट आकारमानामुळे जादा उत्पादनाची शाश्वती देणारा कांदा स्थानिक पातळीवर कसा उत्पादीत करता येईल, याचे संशोधन करण्याकडे संस्थेने लक्ष केंद्रीत केले होते. परंतु, वेगवेगळ्या कारणांमुळे प्राथमिक टप्प्यात हा विचार सोडून द्यावा लागल्याची माहिती प्रतिष्ठानचे संचालक आर. पी. गुप्ता यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या कांद्याचे उत्पादन स्थानिक पातळीवर शक्य असले तरी त्याचे बीज केवळ थंड प्रदेशातील हवामानात तयार होवू शकते. त्याकरिता दिवसातील १४ ते १५ तास सूर्यप्रकाशाची गरज भासते. यामुळे जम्मू काश्मीर सारख्या थंड प्रदेशात प्रथम बीज तयार करून ते महाराष्ट्रात लागवडीसाठी आणावे लागेल. ही बाब आर्थिकदृष्टय़ा किफायतशीर ठरणार नाही. शिवाय, फारसा स्वाद नसलेल्या चिनी कांद्यास पुरेसे ग्राहक नसल्याने इतका ‘द्राविडी प्राणायाम’ करून फारसे काही साध्य होणार नसल्याचा निष्कर्ष फलोत्पादन प्रतिष्ठानने काढला आहे.
स्थानिक बाजारात दाखल झालेल्या चिनी कांद्याविषयी बरीच चर्चा झाली असली तरी त्यास ग्राहकांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. त्याची सौम्य चव हे त्यामागील प्रमुख कारण असल्याचे गुप्ता यांनी नमूद केले. भारतीय कांद्याप्रमाणे तो तिखट नसल्याने स्थानिक पातळीवर उत्पादन घेतले तरी ग्राहक लाभणे अवघड आहे. यामुळे प्रतिष्ठानने चिनी कांद्याच्या संशोधनास पूर्णविराम दिला आहे. दुसरीकडे पाकिस्तानी कांद्याचे नमुने तपासून ते त्रयस्थ देशातील बीजाचा वापर करत आहेत काय, याची छाननी सध्या प्रतिष्ठान करत आहे.
आभार-लोकसत्ता.
Friday, February 11, 2011
Monsanto’s Roundup Triggers Over 40 Plant Diseases and Endangers Human and Animal Health
The diseased field on the right had glyphosate applied the previous season. Photo by Don Huber |
Sudden Death Syndrome is more severe at the ends of rows, where Roundup dose is strongest. Photo by Amy Bandy. |
- The glyphosate molecule grabs vital nutrients and doesn’t let them go. This process is called chelation and was actually the original property for which glyphosate was patented in 1964. It was only 10 years later that it was patented as an herbicide. When applied to crops, it deprives them of vital minerals necessary for healthy plant function—especially for resisting serious soilborne diseases. The importance of minerals for protecting against disease is well established. In fact, mineral availability was the single most important measurement used by several famous plant breeders to identify disease-resistant varieties.
- Glyphosate annihilates beneficial soil organisms, such as Pseudomonas and Bacillus bacteria that live around the roots. Since they facilitate the uptake of plant nutrients and suppress disease-causing organisms, their untimely deaths means the plant gets even weaker and the pathogens even stronger.
- The herbicide can interfere with photosynthesis, reduce water use efficiency, lower lignin, damage and shorten root systems, cause plants to release important sugars, and change soil pH—all of which can negatively affect crop health.
- Glyphosate itself is slightly toxic to plants. It also breaks down slowly in soil to form another chemical called AMPA (aminomethylphosphonic acid) which is also toxic. But even the combined toxic effects of glyphosate and AMPA are not sufficient on their own to kill plants. It has been demonstrated numerous times since 1984 that when glyphosate is applied in sterile soil, the plant may be slightly stunted, but it isn’t killed (see photo).
- The actual plant assassins, according to Purdue weed scientists and others, are severe disease-causing organisms present in almost all soils. Glyphosate dramatically promotes these, which in turn overrun the weakened crops with deadly infections.
Glyphosate with sterile soil (A) only stunts plant growth. In normal soil (B), pathogens kill the plant. Control (C) shows normal growth. |
Photo by Robert Kremer |
- The glyphosate concentration in the soil builds up season after season with each subsequent application.
- Glyphosate can also accumulate for 6-8 years inside perennial plants like alfalfa, which get sprayed over and over.
Wheat affected after 10 years of glyphosate field applications. Glyphosate residues in the soil that become bound and immobilized can be reactivated by the application of phosphate fertilizers or through other methods. Potato growers in the West and Midwest, for example, have experienced severe losses from glyphosate that has been reactivated.- Glyphosate can find its way onto farmland accidentally, through drifting spray, incontaminated water, and even through chicken manure!
Thursday, February 10, 2011
Wednesday, February 9, 2011
योग्य पद्धतीने बांधा शेततळे वाचा महाकृषी मध्ये.
कसे असावे कोंबडी खाद्य वाचा महाकृषी मध्ये...
कृषी विकासदर घेणार पाच टक्क्यांची उडी...
कृषी क्षेत्राच्या प्रगतीच्या आधारावर यंदाच्या आर्थिक वर्षात (2010-11) एकूण देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) 8.6 टक्के राहील असा अंदाज केंद्रीय सांख्यिकी विभागाने (सीएसओ) वर्तविला आहे. चांगल्या पाऊसमानाने खरीप हंगामाने दिलेला हात, हिवाळ्यातील पावसामुळे रब्बी हंगामासाठी झालेली पाण्याची बेगमी यामुळे गतवर्षीच्या विकासदरामध्ये तब्बल पाच टक्क्यांची उडी कृषी क्षेत्र घेऊ शकणार असल्याचा अंदाज सीएसओने व्यक्त केला आहे.
2009-10 मध्ये कृषीचा विकासदर केवळ 0.4 टक्के होता, तेव्हा देशाचा आर्थिक विकासदर आठ टक्के राहिला होता. चालू वर्षात कृषी आणि पूरक उद्योगांच्या विकासात 5.4 टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे "जीडीपी'चा आलेख गेल्या वर्षाच्या तुलनेत चढता राहणार आहे.
अर्थमंत्री प्रणव मुखर्जींनी "जीडीपी' साडेआठ टक्क्यांदरम्यान असेल असे म्हटले होते. तर रिझर्व्ह बॅंकेने गेल्या महिन्यात तिमाही पतधोरण आढाव्यादरम्यानदेखील साडेआठ टक्क्यांचाच अंदाज वर्तविला होता. त्या पार्श्वभूमीवर "सीएसओ'चा वाढीव अंदाज आशादायक मानला जात आहे. विशेष म्हणजे या अंदाजामागे 2010-11 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान, नोंदविलेल्या 8.9 टक्के जीडीपीचा आधार आहे. याशिवाय कृषी क्षेत्राने 0.4 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांवर घेतलेली झेपदेखील या अंदाजासाठी उपयुक्त ठरली आहे. त्या तुलनेत उत्पादन क्षेत्राचा विकासदर हा गेल्या वर्षीइतकाच म्हणजे 8.8 टक्के एवढा कायम आहे.
देशातील दरडोई उत्पन्नात 6.7 टक्क्यांनी वाढ होऊन तो 36 हजार तीन रुपयांवर जाणार आहे. यापूर्वीच्या अंदाजानुसार दरडोई उत्पन्न 6.1 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा होती.
आर्थिक वर्ष - कृषी विकास दर -- आर्थिक विकास दर (जीडीपी) (टक्के)
2007-08 - 4.7 - 9.03
2008-09 - 1.6 - 6.7
2009-10 - 0.4 - 7.2
2010-11 - 5.4 - 8.6
Tuesday, February 8, 2011
मिनी डाळ मिल प्रक्रिया उद्योगासाठी ठरली आहे वरदान.
याचे फायदे म्हणजे तशी १२५ किलो डाळीवर प्रक्रिया करता येवू शकते आणि
याच्यापासून ७५ % उतारा मिळू शकतो. तूर, मुग, उडीद, हरभरा या दालीसाठी हि मिनी डाळ मिल अत्यंत औप्योगी आहे. संपूर्ण माहिती वाचा अग्रोवोन मध्ये.
Monday, February 7, 2011
खात अनुदानात केंद्राकडून कपात, किमती वाढणार...
एप्रिल पासून पुन्हा अनुदानात कपात होण्याची शक्यता आहे.
नत्र आणि गंधक अनुदान कापतीतून वाचले.
Saturday, February 5, 2011
शंभर टक्के बायोगॅस योजना राबविणारी बरगेवाडी..
Tuesday, February 1, 2011
२०१० हे वर्ष ठरले आहे सर्वात उष्ण...
११० वर्षातील उच्चांकी तापमानाची नोंद.
या आपत्ती मुले वर्षभरात ११० लोकांचे बळी गेले आहेत.
सविस्तर वाचा अग्रोवोन मध्ये...
गुणवत्ता असेल तर बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ अमर्याद आहे.
गटाच्या अध्यक्षा प्रीती कुलकणी व हरहुन्नरी आहेत त्या त्यांच्या मैत्रिणी मंदाकिनी टेंभर (उपाध्यक्षा) उज्वला नाईकवाडे,ज्योती अरगडे,सुमन आढावा,विद्या औताडे,संगीता देवकर,मंगल गवळी,अश्विनी धोंडे, सुनिता निकुंभ,वंदना नाईकवाडे,संध्या दहे,कल्पना दंडवते,विनीता कदम,मीना भंडारी (सचिव) संगमनेर येथे आयोजित करण्यात आलेले कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गेल्या होत्या.तिथेच त्यांना आवळयापासून तयार केलेले विविध पदार्थ पहावयास मिळाले.ते कसे करायचे याची पुस्तिकाही बघायला मिळाली. इतके त्यांच्यासाठी पुरेसे होते.कोपरगांवमधीलच संजीवनी बचत गट मार्गदर्शन केंद्राच्या संपर्कात त्या सर्वजणी होत्याच.फावल्या वेळात घरबसल्या लघुउद्योग सुरु करुन तुम्हीही प्रपंचाला हातभार लावू शकता हा श्रीमती स्नेहा कोल्हे यांचा सल्ला त्यांनी प्रत्यक्षात आणण्याचा निर्णय घेतला.
फक्त पंधराशे रुपये एवढेच त्यांचे सुरुवाताचे भांडवल होते.त्यातूनच त्यांनी आवळे आणले अन्य साहित्य जमा केले व आवळा सरबत,आवळा मुरांबा आणि आवळा कॅन्डी तयार केली.तयार झालेला माल त्यांनीच घरोघरी जाऊन विकला. मग एकातून दुसरी,दुस-यातून तिसरी अशा ऑर्डर मिळत गेल्या.
मागणी वाढली तसे भांडवल अपुरे पडू लागले.फक्त बचतीच्या रकमेवर गरज भागेना. त्यांना मग श्रीमती अनिता मुरकुटे यांनी मार्गदर्शन केले.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गटाने कर्ज प्रस्ताव दिला.तो मंजूर झाला.दहा हजार रुपये कर्ज मिळाले.त्याचा वापर करुन गटाने उत्पादन वाढविले.आज गटाच्या आवळा उत्पादनांची उलाढाल ३० हजार रुपयांपेक्षा अधिक आहे.
अलीकडेच कोपरगाव येथे जेष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त कृषी प्रदर्शन झाले.त्यात या गटाची उत्पादने होती.स्वत: श्री कोल्हे यांनी त्यांच्या स्टॉलला भेट दिली.उत्पादनांची,उत्पादन प्रक्रियेची माहिती घेतली व सर्व सदस्यांचे कौतूकही केले.श्रीमती कुलकर्णी यांच्या भगिनी अमेरिकेत असतात.त्यांच्या माध्यमातून तिथे काही प्रतिसाद मिळतो का ? यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.फक्त आवळा कॅन्डीवरच अवलंबून न ाहता या महिलांनी आता गटाच्या माध्यमातून चांगल्या प्रतीच्या साडया,लहान मुलांचे कपडे मोठया प्रमाणावर आणून त्यांचीही विक्री सुरु केली आहे.त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
'महान्यूज'