Sunday, February 27, 2011

परदेशात जातेय येलदरीची कोळंबी.





परभणी जिल्ह्यातील पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी सिध्देश्वर जलाशयातील कोळंबी (झिंगा) आणि कतला, मरळ या माशान्ं¬ाा चीन व जपानमधून मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी येलदरीच्या गोडय़ा पाण्यातील कोळंबीची हवाबंद डब्यातून चीन व जपानला निर्यात झाली. रोज सुमारे ३० क्विंटल कोळंबी पाठविली गेली. या कोळंबीला ९०० ते ११०० रुपये किलो भाव मिळाला. पूर्णा मत्स्यव्यवसाय सोसायटीने चीनबरोबरच जपानलाही कोळंबीची निर्यात केली आहे.

कोलकाता व मुंबईतूनही कोळंबी, कतला आणि मरळ या माशांना मोठी मागणी आहे. येलदरीचा जलाशय ४२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर पसरलेला आहे. जलाशयाची साठवणक्षमता ९३४ दक्षलक्ष घनमीटर एवढी आहे. या जलाशयात मासेमारीचे कंत्राट मिळालेल्या पूर्णा मत्स्य सोसायटीचे प्रमुख पुंडलिकराव नागरे यांना परभणीचा मासा देशात व विदेशातही प्रसिध्द करण्याचा चंग बांधला आहे. संस्थेने त्यासाठी जिंतूर येथे बर्फ निर्मितीचा कारखाना उभारला आहे. जलाशयातून गोळा केलेली मासळी आणि कोळंबी बर्फामध्ये घालून मुंबईला पाठविली जाते. मुंबई येथे कोळंबी आणि मासे हवाबंद डब्यात टाकण्याची प्रक्रिया केली जाते आणि तेथून त्यांची निर्यात होते.

येलदरी जलाशयात गेल्या हंगामात पाच ते आठ फूट लांबीचे आणि पाच ते सात किलो वजनाचे मासे आढळले होते. या वर्षी साडेतीन ते चार फूट लांबीचे तसेच तीन ते चार किलो वजनाचे मासे आढळत आहेत. कतला, मरळ, काऊशी या जातींबरोबरच रोहू, मिरगल, सिंगड, बलव, सिव्हलर, ग्रास्का, सार, स्कायस्क्रीन या जातीचे मासेही येथे आढळतात. पूर्णा सोसायटीने गेली पाच वर्ष सातत्याने विविध प्रकारची मत्स्यबीजे जलाशयात सोडलेली आहेत. कतला, मरळ आणि काळूशी माशांन्¬ाा मुंबईच्या बाजारपेठेत ६०० ते ८०० रुपये तर कोलकात्याच्या मार्केटमध्ये एक हजार ते १२०० रुपये भाव प्रतिकिलो मिळतो आहे. केरळमध्येही गोडय़ा पाण्यातील या जातीच्या माशांना मोठी मागणी आहे.

येलदरीच्या यशकथेपासून प्रेरणा घेऊन जिल्ह्यातील डोंगरतळा, कर्परा, बेलखेडा, मासोळी, लोअर-दुधना, गोदावरी नदीवरील बंधारे तसेच अन्य मध्यम आणि लघु तलावामध्ये मत्स्यव्यवसाय हळूहळू उभारी घेऊ लागला आहे. 
महान्यूज.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद