Wednesday, February 16, 2011

द्राक्ष बागेतल्या आंतरपिकातून कमाई.




सांगली जिल्ह्यातला वाळवा तालुका बागायत पिकांसाठी राज्यात प्रसिद्ध आहे. या तालुक्याचे वैशिष्ठ्य म्हणजे येथे अनेक अभ्यासू शेतकरी आपल्या छोटय़ाशा जमिनीत अनेक छोटे-मोठे प्रयोग करीत असतात. अशाच कष्टाळू शेतकर्‍यांमध्ये जालिंदर जमादार यांचा समावेश होतो. आपल्या केवळ अर्धा एकर जमिनीवर अधिक पिकाचा ताण येत असतानासुद्धा त्यांनी प्रयासाने आतरपीक घेऊन आपल्या शेतकरी मित्रांसमोर एक आदर्श ठेवला आहे.

याबाबत माहिती देताना श्री. जमादार म्हणाले, आपल्या द्राक्ष बागेत आंतरपीक घेण्याचे मी ठरवताच, माझ्या मित्रांनी, नातलगांनी याबाबत मला प्रोत्साहनच दिले. माझ्या बागेसाठी ढबू व लवंगी मिरचीची उच्च प्रतिची रोपे मी आणली. प्रत्येकी १० गुंठय़ामध्ये मी ढबू आणि लवंगीची लागवड केली आणि मग द्राक्ष व या रोपांसाठी मी ठिबक सिंचनाची व्यवस्था केली. २०१० मध्ये जूनच्या शेवटच्या आठवडय़ात ही सर्व लागवड मी केली.

आंतरपीक घेताना वेगवेगळे खत देण्याचे प्रयोग मी केले. सर्वप्रथम शेण व मलमूत्र आणि फॉस्फेटची अर्धा लिटर आळवणी घालून नियोजनानुसार पाणी, खते आणि औषधांचा वापर केला. त्यामुळे रोपांची चांगलीच वाढ झाली. या बरोबर डीएपी/एमओपी/युरिया/१०:२६:२६, १०:२०:२० नर्मदा कॅन, करंजी व लिंबोळी पेंडेचीही मात्रा दिली. ही खते देत असताना रिंग पद्धतीचा वापर करुन प्रत्येकी चार दिवस दोन तास भरपूर पाणी दिले.

या सर्वांचा परिणाम आता दृष्टीस पडतो आहे. या महिनाअखेर ढबूचे मी दहा टन तर लवंगीचे सात टन उत्पन्न घेतले आहे. माझी ही ढबू व लवंगी मिरची पुण्या-मुंबईला जात आहे. ढबूला २०० रुपये तर लवंगीला १५० रुपये प्रती १० किलो भाव मिळत आहे. आता दुसर्‍या २० गुंठय़ामध्ये आपण कोबीची याच तर्‍हेने लागवड केली असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

आताचे हे हवामान शेतीला पोषक नाही. आपल्या द्राक्षबागेची जोपासना हवामानाचा अंदाज घेऊन मी करत आलो आहे. सध्या आकाशवाणी, दूरदर्शन तसेच मोबाईलवर येणारे एसएमएस पाहून त्याप्रमाणे मी उपाययोजना करत असतो. गेली तीस वर्षे द्राक्षबागेचा प्रयोग आपण करत आहोत. या अनुभवाचा उपयोग केल्याने माझ्या बागेवर अवकाळी पावसाचा परिणाम झाला नाही. हवामानाचा अंदाज घेत सर्व कामे आपण वेळीच केली. थंडीचे वातावरण असूनही कोणताही रोग अथवा प्रादूर्भाव आपल्या बागेवर झाला नाही, असे त्यांनी आत्मविश्वासाने सांगितले.

मिरचीचे विक्रमी उत्पन्न घेऊनही द्राक्षाच्या उत्पन्नावर कोणताही परिणाम झालेला नाही, याची खात्री त्यांची बाग पहात असताना येत होती. एका वेलीवर २५ ते ३० घड लटकताना दिसत होते. फळांचा आकारही चांगलाच दिसत होता. स्वत: जमादार हे मजुरांबरोबर शेतात उन्हामध्ये राबत असतात. पोटच्या मुलाप्रमाणे या बागेची काळजी त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या प्रयोगाची दखल कृषी विभाग, प्रगतीशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ यांनी घेतली आहे. 'अधिक धान्य पिकवा' अशा घोषणा देताना श्री. जमादारांचा हा प्रयोग आपणाला बरेच काही सांगून जातो.



'महान्यूज'

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद