Saturday, July 21, 2018

Weather forecast/हवामान अंदाज - 21/07/18

*विदर्भातील सर्व जिल्ह्यांत जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे*

विदर्भातील अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

उत्तर महाराष्ट्रातील ठाणे पालघर नाशिक चा काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल.

उर्वरित महाराष्ट्रात वातावरण बहुतांशी ढगाळ राहील.

ऊन सावलीचा खेळ चालू होईल.

काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

महाकृषी हवामान अंदाज सहकार्य भारतीय हवामान शास्त्र ग्रुप.

Friday, June 8, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 08/06/2018

*आज दिनांक ८ जून २०१८* सकाळी*

*आज मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मान्सूनचा तडाखा*

*लातूर,नांदेड,बीड,परभणी हिंगोली,जालना,बुलढाणा, अकोला,वाशिम या जिल्ह्यांना मान्सूनचा जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे.*

*जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे तरी काळजी घ्यावी.*

*उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.*

*आज महाराष्ट्र बहुतांशी ढगाळ वातावरण राहील.*

*"राहुल रमेश पाटील"*

Thursday, June 7, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 07/06/2018


*नमस्कार मंडळी,**आज दिनांक 7 जून 2018*

*मान्सूनचे मध्य महाराष्ट्रामध्ये आगमन*

*मुंबई शहर व उपनगर तसेच कोकणाला मुसळधार पावसाचा धोका*

काल रात्रभर मध्य महाराष्ट्रातील म्हणजेच मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे...


यामध्ये उस्मानाबाद,लातूर, नांदेड,बीड,परभणी,हिंगोली, जालना,औरंगाबादचा काही भाग,बुलढाणा,वाशिम तसेच अहमदनगरचा काही भाग, सोलापूरचा काही भाग समाविष्ट आहे..
या भागात जोरदार पद्धतीने रात्रभर पाऊस पडत आलेला आहे...!
हे मान्सून आगमनाचे संकेत असून आजपासूनच या भागात मान्सून सक्रिय होण्यास चालू होईल.

खरंतर ढगांचा मोठा समूह आंध्रप्रदेशवरून रात्री मध्य महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे.

काल तांत्रिक अडचण असल्यामुळे मी आपणास *मराठवाड्यात मान्सूनचे आगमन व आगमनाबरोबर धुमाकूळ* या बाबतीत चेतावणी देऊ शकलो नाही त्यामुळे मला कृपया माफ करावे.

याबरोबरच कोकण किनारपट्टीला किंबहुना कोकण व सह्याद्री पर्वतरांगा जवळील पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना आज अतिजोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे...
कारण सॅटेलाइट फोटो मध्ये दिसत असल्याप्रमाणे ढगांचा खूप मोठा समूह हा अरबी समुद्रावरून कोकण किनारपट्टीकडे आगेकूच करत आहे व तो आज दुपारी कोकण किनारपट्टीवर दाखल होऊन पुढे संपूर्ण कोकण व्याप्त होईल.

संध्याकाळपर्यंत तो सह्याद्री पर्वतरांग ओलांडून पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर,सातारा,पुणे, नाशिक भागात सुद्धा पावसाचा मोठा तडाखा देऊ शकतो.

आज एकंदरीत पाहता *कोकण*
म्हणजेच उत्तर गोवा,दक्षिण गोवा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,मुंबई महानगर,मुंबई उपनगर,पालघर,ठाणे....या जिल्ह्यांतील सर्व तालुक्यांत जोरदार ते अती जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

*पश्चिम महाराष्ट्र*
म्हणजे कोल्हापूर,सांगली, सातारा,पुणे,सोलापूर या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

*उत्तर महाराष्ट्रातील*
नाशिक,अहमदनगरचा काही भाग,औरंगाबादचा काही भाग

असे आगेकूच करत पाऊस मध्य महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

*एकंदरीत मान्सून खूप वेगात महाराष्ट्र पादाक्रांत करत आहे*

©
*राहुल रमेश पाटील*

Friday, June 1, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 01/06/2018

*आज दिनांक 1 जून 2018* *सकाळी*

 *ईशान्येकडील राज्यांत मॉन्सूनचे आगमन शक्‍य*

*पुणे* - अरबी समुद्रात वेगाने प्रगती करत नैर्ऋत्य मोसमी पावसाने (मॉन्सून) कर्नाटकपर्यंत मजल मारली.
मॉन्सूनची उत्तर सीमा गुरुवारपर्यंत कायम होती.

ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मॉन्सून दाखल होण्यास बंगालच्या उपसागरात पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

अरबी समुद्रात असलेल्या कमी दाबक्षेत्रामुळे मॉन्सूनने कर्नाटक किनारपट्टी, दक्षिणअंतर्गत कर्नाटक, तमिळनाडूच्या काही भागांत वेगाने प्रगती केली.

कर्नाटकमधील शिराळी, हस्सन, मैसूरपर्यंतचा भाग मॉन्सूनने व्यापला आहे. देशाच्या दक्षिण भागात रविवारी (ता. 3) प्रगती करण्याची, तर तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे.

बंगालच्या उपसागरातून मॉन्सून ईशान्य भारतातील राज्यांमध्ये दाखल होणार असून, शुक्रवारी या भागात हजेरी लावणार आहे.

महाराष्ट्र आणि गोव्यात 6 जूननंतर पाऊस जोर धरणार असून, 6 ते 8 जूनपर्यंत महाराष्ट्रात मॉन्सून पोचणे शक्‍य आहे.

आग्नेय अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटांजवळ समुद्र सपाटीपासून चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

मध्य प्रदेशपासून पूर्व विदर्भ, तेलंगणापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याचे जाणवते.

*संदर्भ: भारतीय हवामान विभाग.*

Thursday, May 24, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 24/05/2018

*आज दिनांक २४ मे २०१८*

सॅटेलाइट फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रवरती ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे...

*कोकण विभाग*
दक्षिण गोवा, उत्तर गोवा,सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड,मुंबई,ठाणे,पालघर....
हे जिल्हे ढगाळलेले असून येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.
रत्नागिरी व उत्तर सिंधुदुर्ग जिल्हात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

*पश्चिम महाराष्ट्र विभाग*
कोल्हापूर,सांगली,सातारा, सोलापूर, पुणे या जिल्ह्यातील वातावरण जास्त ढगाळ आहे..
इथे मध्यम ते जास्त प्रमाणात पाऊस पडू शकतो.

*मराठवाडा विभाग*
उस्मानाबाद, बीड, नांदेड, अहमदनगर,औरंगाबाद, जालना,बुलढाणा हे जिल्हे सुद्धा काही अंशी ढगाळलेले आहेत.
येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.

*नाशिक विभाग*
नाशिक, धुळे जिल्ह्यातील काही भाग ढगांनी व्यापलेला असुन काही काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

*विदर्भ विभाग*
भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील काही भाग ढगांनी व्यापलेला आहे.
हलक्या सरी येऊ शकतात.

एकंदरीत पाहता हे वातावरणात *मान्सूनपुर्व पावसासाठी* चांगले दिसत आहे.

*आज दिवसभरात वातावरण ढगाळ राहील*

तसेच हवेत गारवा निर्माण होईल.

*मेकुनु* हे वादळ अजुन शक्तीशाली झाले असून ते उत्तर पश्चिम दिशेला सरकत आहे.

गेल्या ६ तासात ते १० कि.मी.प्रती तास या वेगाने ओमान देशाकडे जात आहे.

यातील वाऱ्याचा वेग १५०-१६० कि.मी प्रती तास इतका असुन त्याची चक्राकार गती १८० कि.मी प्रती तास इतकी आहे.

हे वादळ सध्या ओमान देशाच्या दक्षिण-पुर्व दिशेला ५३० कि.मी अंतरावर आहे.

या वादळाचा तडाखा महाराष्ट्र किंबहुना भारताला नसला तरी समुद्र खवळलेला राहील.
त्यामुळे मासेमारीसाठी जाणार्यानी १-२ दिवस थांबलेले बरे...........

*राहुल रमेश पाटील*

Wednesday, May 23, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 23/05/2018

*आज दिनांक २३ मे २०१८* *संध्याकाळी*

आधी सांगितल्याप्रमाणे मान्सूनपुर्व पावसाने संपूर्ण दक्षिण भारतात दमदार हजेरी लावली आहे...

*कर्नाटक,केरळ,तमिळनाडू, आंध्र प्रदेश,श्रीलंका,मालदिव, लक्षद्वीप बेटे व अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सूनपुर्व पावसाने आज सकाळपासूनच दमदार हजेरी लावली असून सकाळ पासून पावसाला चांगली सुरुवात झाली आहे.*

महाराष्ट्रातही नजिकच्या काळात मान्सूनपुर्व पावसाची शक्यता आहे.

एकंदरीत पाहता....
अरबी समुद्र, बंगालचा उपसागर व हिंदी महासागरात ढगांची बरीच गर्दी दिसत आहे....
*ही मान्सून लवकर येण्याची चिन्हे आहेत अस आमचं वैयक्तिक मत आहे....‌..*

*राहुल रमेश पाटील*

Tuesday, May 22, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 22/05/2018

*नमस्कार मंडळी,*
*आज दिनांक २२ मे २०१८* *सकाळी*

महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण होईल..व हलक्या पावसाची शक्यता आहे.

दुपारनंतर परत वातावरण निर्माण होऊन *मान्सूनपुर्व पाऊस* अपेक्षित आहे.

काही काही भागात *मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार* स्वरूपाचा पाऊस पडू शकतो.

*मेकुनु* हे वादळ आज  पश्चिम-उत्तर दिशेला सरकले असुन त्याची तिव्रता वाढली आहे.....

*राहुल रमेश पाटील*

Thursday, March 15, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 15/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक १५ मार्च २०१८.*

काल सकाळी सांगितल्याप्रमाणे दुपारनंतर महाराष्ट्राच्या दक्षिण भागातून म्हणजे गोवा,सिंधुदुर्ग-कोल्हापूर या भागातून ढग आपले मार्गक्रमण चालू करून ते सर्वदूर म्हणजे भंडारा-गोंदिया/नंदुरबार पर्यंत सर्वत्र तसेच पुढे मध्य प्रदेश, बिहार सीमेपर्यंत पोहोचले आहेत.


त्यामुळे काल दुपारनंतर- संध्याकाळी-रात्री व आज पहाटे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे..

काल व आज पहाटे बऱ्याच ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असेल.....

महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाचा दिवस असून आज परिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे....

महाराष्ट्रातील बहुतांशी तालुके हे दाट ढगांनी व्यापलेले असून बऱ्याच तालुक्यात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल...

खास करून
*कोंकण विभागातील* गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर हे जिल्हे जास्त दाट ढगांनी व्यापलेले आहेत...

*उत्तर महाराष्ट्र*
तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार जळगाव हे जिल्हे सुद्धा जास्त ढगांनी व्यापलेले आहेत...

*पश्चिम-मध्य महाराष्ट्र*
पश्चिम-मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा पुणे अहमदनगर  औरंगाबाद सोलापूर सांगली बीड उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नांदेड जालना बुलढाणा.. हे जिल्हे सुद्धा कमी-जास्त प्रमाणात ढगांनी व्यापलेले आहेत..

*विदर्भ*

विदर्भातील सर्वच जिल्हे कमी-जास्त प्रमाणात ढगाळलेले राहतील...

पावसाची शक्यता ही कोकणातील सर्व जिल्ह्यात तसेच सह्याद्री पर्वतरांगावरील पुर्वेकडील व पश्‍चिमेकडील भाग.....
उत्तर महाराष्ट्रातील गुजरात व मध्य प्रदेशाच्या सीमेवरील अमरावती नागपुर पर्यंतचा भाग व पुणे अहमदनगर हा मध्य महाराष्ट्राचा भाग जास्त ढगाळ वातावरण असल्याने येथे हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे...

एक आनंदाची बातमी आहे...

केरळ-मालदीव जवळील वादळ हे काल संध्याकाळपासून थोडे कमकुवत झाले आहे ते उत्तर/उत्तर-पश्चिम दिशेला सरकत असून ते हळूहळू कमकुवत होऊन अरबी समुद्रातच विरून जाईल अशी शक्यता आहे.

*पण*
त्याबरोबरीनेच ढगांचा खूप मोठा समूह मालदीव पासून गोवा मुंबईच्या समुद्रात एकत्रित झाल्याने ही पुढील काळात चिंतेची बाब होऊ शकते....

आम्ही या ढगांच्या समुहावरती बारीक नजर ठेवून आहोत गरज लागेल तसे दुपारनंतर परत एकदा हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल.......!

©

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Wednesday, March 14, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 14/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक १४ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा अरबी समुद्र किनाऱ्यावरील भाग तसेच ठाणे जिल्हा, नाशिक जिल्हा, नंदुरबार, धुळे जळगाव,जिल्ह्याचा काही भाग, अमरावती जिल्ह्याचा काही भाग हा बऱ्याच प्रमाणात ढगाळ वातावरण आहे..

आज महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र,कोकण विभाग, उत्तर महाराष्ट्र किंचित मध्य महाराष्ट्र या विभागातील सर्व जिल्ह्यांत वातावरण कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहील....

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Tuesday, March 13, 2018

Current status of cyclone/वादळाची सद्यस्थिती.

खालील सॅटेलाईट फोटो ह्या  हाय-डेफिनिशन HD इमेज आहेत....

आजपासून आपल्याला या high definition images *भारतीय हवामान खात्याकडून* मिळण्यास रितसर सुरुवात होत आहे......!

यामुळे आपल्याला पुढील अभ्यासात खूप मोठा फायदा होणार आहे.

गेले दोन-तीन दिवस मी यासाठी खुप प्रयत्न करून ते साध्य केले आहे....

या गोष्टींसाठी आपल्याला भारतीय हवामान दिल्ली विभागातील सगळ्यात उच्च शास्त्रज्ञ श्री महापात्रा व त्यांचे सहयोगी श्री विरेंद्र सिंह यांची खूप मोठी मदत झाली त्यांचे शतशः आभार....

आज पासूनच या गोष्टीचा आपल्याला खूप मोठा फायदा होणार आहे त्यामुळे योग्यवेळी किंबहुना वेळेच्या आधी आपल्याला हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन करणे खूप सोपे होणार आहे....!

या हाय डेफिनेशन सॅटेलाईट इमेजेस सहजासहजी कोणालाही उपलब्ध होत नाहीत......

त्या आम्हाला मिळाल्या हेच खूप मोठे सौभाग्य......

Sunday, March 11, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 11/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ११ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील मध्य व विदर्भाकडील भागांवर बरेच ढग जमले आहेत..

*मध्य महाराष्ट्रातील*
पश्चिम अहमदनगर..
उत्तर औरंगाबाद,जळगाव बहुतांशी जिल्हा..
मध्य जालना,
परभणी बहुतांशी जिल्हा..
हिंगोली संपूर्ण जिल्हा...
बुलढाणा उत्तर व पश्चिम काही भाग..
अकोला संपूर्ण जिल्हा..
वाशिम पश्चिमेकडील काही भाग....

*विदर्भातील*
अमरावती बहुतांशी जिल्हा..
यवतमाळ मध्य काही भाग वगळता संपूर्ण जिल्हा..
वर्धा संपूर्ण जिल्हा..
नागपूर संपूर्ण जिल्हा..
चंद्रपूर संपूर्ण जिल्हा..
भंडारा-गोंदिया संपूर्ण जिल्हा..
गडचिरोलीचा दक्षिण भाग...

वर सांगितल्याप्रमाणे वरील सर्व भाग हि दाट ढगांनी व्यापलेला असून या भागांतील वातावरण दुपारपर्यंत ढगाळ राहू शकते....
सकाळी लवकर व दुपारनंतर काही भागात हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.....
घाबरून जाण्याचे काही कारण नाहिये.....
कारण हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असून खूप काही नुकसान करणारा नाहीये..

काही भागात मात्र थोडा जास्त पाउस पडू शकतो पण नुकसान होणार नाही.....

पश्चिम महाराष्ट्रात दक्षिणेकडील सांगली सोलापूर काही जिल्हे किरकोळ ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकते पण पावसाची कुठेही शक्यता नाही....

पश्चिम महाराष्ट्र व कोकणात हलक्या स्वरूपाचे बाष्प वातावरणात असल्यामुळे उकाडा जास्त जाणवेल.....!

गोवा वगळता आज वातावरण कुठेच कोरडे नाहीये.......

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Saturday, March 10, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 10/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक १० मार्च २०१८.*

वरील सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर ढगांची रेलचेल खुप जास्त प्रमाणात दिसून येत आहे...
हिंदी महासागरात म्हणजेच मालदीव,लक्षद्वीप बेटे व श्रीलंका देशाच्या आसपास ढगांची गर्दी खुप आहे.
ही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा आहे..कारण आता वारे नैसर्गिकरित्या  नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे.. त्यामुळे ते येताना समुद्रावरील बाष्प व ढग जमिनीवर म्हणजेच महाराष्ट्रावर घेऊन येण्याची शक्यता आहे..
त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आवकळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मागिल आठवड्यात बऱ्यापैकी ढगाळ वातावरण दिसून आले...
काही ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली.
हे ढग थोड्याफार प्रमाणात पश्चिम-उत्तर दिशेकडून आले होते..

पुढील आठवड्यात वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र राहील.. उकाडा जास्त जाणवेल..पण अधुनमधून वाऱ्यांचा वेग वाढला तर उकाडा कमी होईल...
१६ मार्च नंतर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प जास्त आल्याने व काही प्रमाणात ढग भरकटून आल्याने वातावरण ढगाळ निर्माण होईल....

उत्तर मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात वातावरण ढगाळ राहील..
खास करून धुळ्यापासून, जळगाव,औरंगाबाद, बुलडाणा, जालना,परभणी चा काही भाग..हिंगोली जिल्ह्याचा काही भाग..

अकोला वाशिम जिल्ह्यांचा काही भाग हा ढगाळ वातावरण राहील...
जळगाव जिल्ह्यामध्ये हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे....

वरील जिल्ह्यांपैकी बऱ्याच तालुक्यात हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे.....

उर्वरित महाराष्ट्रात आकाश निरभ्र राहील व उकाडा वाढत जाईल...

पश्चिम महाराष्ट्र  वगळता इतरत्र सर्व विभागात वातावरणात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प साधारणतः आहे त्यामुळे उकाडा जास्तच जाणवेल....

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Friday, March 9, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 09/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ९ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे विदर्भातील सर्व जिल्ह्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे...

यवतमाळ जिल्हाचा दक्षिणेकडील काही भाग वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत वातावरण खूपच जास्त ढगाळ आहे येथे आज मध्यम ते थोडाफार भारी पावसाची शक्यता आहे...
काही ठिकाणी जिथे ढगांची उंची जास्त असेल तिथे हलक्या गारपिटीचा अंदाज आहे.
दुपारनंतर हि गारपीट होऊ शकते...

निम्मा पूर्व अमरावती जिल्हा, संपूर्ण वर्धा जिल्हा काही प्रमाणात ढगाळ वातावरण असून दुपारनंतर हलक्या पावसाची शक्यता आहे...

नागपूर जिल्ह्याचा उत्तर पूर्वेकडील काही भाग वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे.
दुपारनंतर येथे हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचा दक्षिणेकडील काही तालुके वगळता मध्य व उत्तरेकडील सर्व तालुक्यात वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे..
येथेही मध्यम ते किंचीत भारी पावसाची शक्‍यता आहे...

भंडारा-गोंदिया जिल्ह्यातही वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ असून तेथेही हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे...

वाशिम अकोल्याचा ही पूर्वेकडील काही भाग साधारण ढगाळ असल्याने येथे हलक्‍या पावसाची शक्‍यता आहे....


उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांचा विचार करता नाशिक,औरंगाबाद जिल्ह्यातील काही भाग हा जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण आहे..
काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे...

नाशिक भाग हा द्राक्ष बागायतदाऱ्यांचा असल्याने भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते परंतु जास्त घाबरून न जाता आलेल्या संकटाला सामोरे जावे..
खूप काही मोठा पाऊस होण्याची शक्‍यता नाही पण हलक्‍या ते मध्यम पावसाची शक्‍यता आहे...
दुपार नंतर हळूहळू हे वातावरण निवळण्यास सुरुवात होईल...
नाशिक जिल्ह्यात बागलन, मालेगाव,नांदगाव,येवला, देवला,चांदवड या तालुक्यांत जास्त प्रमाणात वातावरण ढगाळ असल्याने येथे मध्यम ते किंचित भारी पावसाची शक्‍यता आहे....

औरंगाबाद जिल्ह्यातील पश्चिम-उत्तर कडचा भाग म्हणजेच कन्नड,वैजापूर खुलताबाद,गाणगापूर या तालुक्यांत वातावरण जास्त प्रमाणात ढगाळ आहे त्यामुळे येथे हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल....

जळगाव जिल्ह्याचा दक्षिणेकडील काही भाग तसेच धुळे नंदुरबार जिल्ह्याचा काही भाग वातावरण ढगाळ निर्माण होईल.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*.

Wednesday, March 7, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 07/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ७ मार्च २०१८.*

सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे काही ढग अचानकपणे महाराष्ट्रावर निर्माण झाले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये घबराहट होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील बऱ्याच भागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा काही अंशी नंदुरबार व धुळे संपूर्ण जिल्हा जळगाव जिल्हा हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण निर्माण होईल..
मध्य महाराष्ट्रात म्हणजेच मराठवाड्यातील उत्तर जालना,बुलढाणा संपूर्ण जिल्हा,वाशिम जिल्हा काही अंशी हिंगोली परभणी जिल्हा, यवतमाळ चा दक्षिणेकडील भाग नांदेड संपूर्ण जिल्हा हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण राहील....

तसेच रायगड,ठाणे, पुणे अहमदनगर,औरंगाबाद काही अंशी ढगाळ वातावरण राहील...

चिंता करण्याचे काही कारण नाही आहे.
कारण यातून हलक्या सरी वगळता काही जास्त मोठ्या पावसाची शक्यता वाटत नाही.

महाराष्ट्रावरील हे सर्व ढग गुजरात कडे आगेकूच करत असल्यामुळे याचा महाराष्ट्रात धोका कमी आहे पण याचा वेग मंदावला तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे नाशिक,जळगाव या भागात दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे.

ज्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मध्ये घबराहट पसरविण्यात आलेली आहे त्या प्रमाणात काही अवकाळी पाऊस व गारपिटीचीे शक्यता नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी खूप चिंता करू नये....


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Tuesday, March 6, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 06/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ६ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज क्रमांक एक मध्ये दिसत असल्याप्रमाणे मादागास्कर देशाजवळ गेले काही दिवस एक भयंकर वादळ आपले भयानक स्वरूप धारण करुन आहे.. त्याच्याजवळच एक ढगांचा मोठा समूह आपले अस्तित्व बळकट करत आहे....

उत्तर हिंदी महासागरात व बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार या द्वीप समूहामध्ये काही बरेच भरकटलेले ढग आले आहेत...

महाराष्ट्र शासनाने म्हणजेच हवामान खात्याने जो गारपिटीचा व अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे..
त्यासाठी आवश्यक असे ढग सध्यातरी कुठूनही महाराष्ट्रावर येतील अशी परिस्थिती नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी विनाकारण खूप घाबरून जाण्याची गरज नाही.....

वर सांगितल्याप्रमाणे ढग हे वरील भागातच आहेत ते खूप मोठे अंतर पार करून महाराष्ट्रावर येतील अशी परिस्थिती पुढील दोन-तीन दिवसांमध्ये निर्माण होईल अशी शक्यता कमी आहे... त्यामुळे गारपीट व अवकाळी पाऊस होईल असे वाटत नाही..

सॅटेलाइट इमेज क्रमांक 2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे कोकणामध्ये ठाणे,रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वतरांगामधील डोंगरातील काही भाग ढगाळ वातावरण निर्माण होईल...

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्हा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे..
सातारा जिल्हा,
उत्तर व पूर्व कोल्हापूर जिल्हा, पूर्व सांगली जिल्हा,
उत्तर सोलापूर जिल्हा वातावरण ढगाळ राहिल...

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात काही अंशी..
नंदुरबार जिल्हा काही अंशी..
जळगाव जिल्हा उत्तर सीमेवरील काही भाग ढगाळ राहील..

औरंगाबाद बहुतांश जिल्हा ढगाळ राहील..
दक्षिण अहमदनगर,बीड-लातूर,उस्मानाबाद, बुलढाणा,नांदेड जिल्ह्याचा यवतमाळ जिल्ह्याकडील भाग काही अंशी ढगाळ वातावरण राहील....
वाशिम,हिंगोली, परभणी अकोला काही अंशी ढगाळ वातावरण राहील....

विदर्भातील अमरावती,नागपूर जिल्हा काही अंशी हा ढगाळ राहील..
तसेच वर्धा जिल्हा किंचित, चंद्रपूर उत्तरभाग,गडचिरोली उत्तर भाग हा भाग काही अंशी ढगाळ वातावरण राहील....

वर सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात ढगाळ वातावरण राहील पण घाबरून जाण्याचे काही कारण नाही....
कारण हे ढग  अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकत नाहीत....

सह्याद्री पर्वतरांगांमध्ये बऱ्याच प्रमाणात वातावरण ढगाळ आहे पण किंचित ठिकाणी हलक्‍या सरी सोडून कुठेही पावसाची शक्‍यता नाही...


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Monday, March 5, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 05/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ५ मार्च २०१८.*

सॅटेलाइट इमेज मध्ये( झुम करुन पहावे) दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील खास करून पश्चिम महाराष्ट्रामधील व सह्याद्री पर्वत रांगाना लागून असलेल्या पर्वत रांगा ज्या तालुक्यात आहेत तेथील भागात वातावरण ढगाळ झाले आहे....


घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही आहे कारण हे ढग पाऊस पडू शकत नाहीत....

गेले दोन-चार दिवस आम्ही पाहत आहोत की शासकीय परीपत्रकानुसार ज्या बातम्या येत आहेत त्यानुसार 7 8 मार्च रोजी गारपिट सांगितली आहे पण सध्या तरी तशी कोणतीही परिस्थिती दिसत नाही आहे..
त्यामुळे महाराष्ट्रातील कोणत्याही शेतकऱ्याने घाबरून जाण्याचे काही कारण नाही...

परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत गरज लागेल तसे सखोल मार्गदर्शन केले जाईल.....!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Saturday, March 3, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 03/03/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक ३ मार्च २०१८.*

सॅटेलाईट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात हवामान बहुतांशपणे कोरडे आहे.

कमी-जास्त प्रमाणात महाराष्ट्र, मध्य प्रदेश/गुजरात  सीमेवरील बऱ्याच भागात बाष्प जास्त  असल्याने वातावरण किंचित ढगाळ होण्याची शक्यता आहे.

आजुन सुद्धा पहाटे व मध्यरात्री किंचित थंडी जाणवू शकते कारण थोड्याफार  प्रमाणात उत्तरेकडून थंड वारे अजून महाराष्ट्रावर वाहत आहेत.

परंतु दुपारी बारानंतर उन्हाचा कडाका जाणवू शकतो... थोडाफार वाऱ्याचा वेग जास्त असल्या कारणाने उकाडा सुसह्य होईल पण बऱ्याच भागामध्ये ऊन जाणवेल.

विशेषतः कोकणात उष्णतेची लाट असा प्रकार पहावयास मिळेल... कारण तिथे वातावरणात बाष्प जास्त असल्याने दमटपणा वाढला आहे.

पुढील आठवड्यात एक-दोन दिवस महाराष्ट्रातील थोड्याफार भागात विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे ढगाळ वातावरण होण्याची चिन्हे आहेत.


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Wednesday, February 28, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 28/02/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक २८ फेब्रुवारी २०१८.*

वरील सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिम दिशेकडून म्हणजेच कर्कवृत्तावरील रेषेवर ढगांचा  खूप मोठा समूह पश्चिमेतील ओमान/मस्कत भागाकडून पाकिस्तानातील कराची/ गुजरातचा कच्छ, पक्ष्चिम मध्यप्रदेश, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्याकडे आगेकूच करत   आहे.

आज संध्याकाळपर्यंत हा ढगांचा समूह संपूर्ण गुजरात, पश्चिम मध्य प्रदेश,उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत आपली व्याप्ती वाढवेल व येथील संपूर्ण वातावरण कमी जास्त प्रमाणात ढगाळ होईल.

संध्याकाळी उत्तर महाराष्ट्रातील नाशिक,नंदुरबार, धुळे,जळगाव या जिल्ह्यांतील काही तालुक्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता आहे.

ही शक्यता असली तरी ती खूपच कमी असलेने घाबरून जाण्याचे कारण नाही.

पण  ढगांची आगेकूच अशीच राहिली तर उत्तर महाराष्ट्रात व विदर्भापर्यंत मध्यप्रदेश- महाराष्ट्र सीमेवरील जिल्ह्यात वातावरण उद्यापर्यंत ढगाळ व हलक्या पावसाची शक्यता निर्माण होईल.
क्वचित काही ठिकाणी ढगांची उंची जास्त राहिली तर मग गारपीठीची ही शक्यता नाकारता येत नाही.
पण ही शक्यता खुप कमी आहेत.

सुधारित हवामानाचा अंदाज व सखोल मार्गदर्शन आज संध्याकाळी सहा वाजता दिले जाईल.
आज याची खूप गरज वाटतेय.


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Monday, February 26, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 26/02/2018

*नमस्कार मंडळी,*

*आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाईट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे अफगाणिस्तान/पाकिस्तान या भागातील भयानक वादळ आपले आणखीच भयानक रूप धारण करीत असून त्याने लंब गोलाकार नागाच्या फण्यासारखा आकार धारण केला आहे.

या भयानक वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये खूप दाट असे अवकाळी पाऊस व गारपिटीहीे करण्याजोगे ढग आहेत त्यामुळे हे वादळ सरकत राजस्थान/गुजरात या भागावर आले  तर मग उत्तर महाराष्ट्राची दयनीय अवस्था होऊ शकते.

त्या दिशेने या वादळाची थोडीफार पावले पडत असून आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत...!

आज मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर काहीसे जास्त प्रमाणात बाष्प आले आहे त्यामुळे पहाटे बऱ्याच ठिकाणी हलकेसे धुके पडले असेल....
त्यात हे बाष्प वायव्य/ उत्तरेकडून आले असल्याने यात गारवा आहे त्यामुळेच सकाळी किंचित थंडी जास्त जाणवली असेल.

आम्हाला चिंता याच गोष्टींची असून पुढील परिस्थितीचा अंदाज घेणे अवघड जात आहे.
कारण वाऱ्याची दिशा व हवेचा दबाव वायव्य/ उत्तरेकडून महाराष्ट्राकडे दिसत असल्यामुळे हे भयानक वादळ महाराष्ट्रावर येऊन नुकसान करते की काय ही चिंता सतावत आहे.

असो,

पुढील परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेऊन आहोत.. गरज असल्यास रात्री परत एकदा माहिती व सखोल मार्गदर्शन केले जाईल....!

आज उकाडा जास्त जाणवेल पण त्याबरोबरच वाऱ्याचा वेग महाराष्ट्रातील बऱ्याच भागात थोडाफार जास्त असल्याने तो सहन करता येईल...
आज वातावरण कोरडे नसून थोडेफार बाष्प महाराष्ट्रावर आहे त्यामुळे काही भागात दमटपणा जाणवेल.

काही भागात वातावरण किंचित म्हणजे किंचित ढगाळ होण्याची शक्‍यता आहे याचे कारण वातावरणातील बाष्प हे आहे......!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Sunday, February 25, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 25/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २५ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे पश्चिमेकडील पाकिस्तान/अफगाणिस्तान या देशावरील जी भयानक  वादळ सदृश्य परिस्थिती आहे...ती पुढील काळासाठी महाराष्ट्रासाठी किंबहुना भारतासाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत....!

या वादळाचे भारताकडे म्हणजेच राजस्थान/गुजरात या भागाकडे आगेकुच दिसत आहे, त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात याची वाटचाल ही चिंतेची बाब ठरणार आहे......

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात वातावरणात बाष्प आल्यामुळे उद्या पहाटे किंचित ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे....

आम्ही येणाऱ्या परिस्थितीवर डोळ्यात तेल घालून नजर ठेवून आहोत पुढील काळात जसे गरजेचे वाटेल तसे पुढील अंदाज व सखोल मार्गदर्शन केले जाईल......!


*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Saturday, February 24, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 24/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे जम्मू-कश्मीर, काबूल वरती चीनपर्यंत एक चक्रीवादळ आपले भयानक रुप धारण करीत आहे.

हे समुद्रातील चक्रीवादळ नसल्याने याचे स्वरूप थोडेफार वेगळे आहे या वादळात थंडगार ढग असल्याने याचा परिणाम येथील भागात विपरीतपणे होऊ शकतो.

पण या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्राचा बराचसा फायदा झाला आहे. कारण
महाराष्ट्रातील बऱ्याच भागात संभावित गारपीट व अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता होती ती टळली आहे....

पुढील आठवड्यात  वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र असेल कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्प महाराष्ट्रावर येत असून ते हळूहळू थंडी कमी करून उकाडा वाढवतील.

महाराष्ट्रात पहाटे काही ठिकाणी किंचित धुके पडण्याची शक्यता आहे.
पहाटे थोडीफार थंडी/धुके व दिवसभर कोरडे वातावरण/उकाडा जाणवेल.
संध्याकाळी छानसा वारा सुटेल.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Friday, February 23, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 23/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*
खालील सॅटेलाइट फोटो क्रमांक-1 मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्राचा गोवा राज्याकडील दक्षिण भाग वगळता उर्वरित सर्व महाराष्ट्रात पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे उत्तरेकडून वाहणार्‍या वार्‍यामुळे सरकत खाली आले असून आज पहाटे महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचे धुके पडले असेल.

सॅटेलाइट क्रमांक-2 मध्ये दिसत असल्याप्रमाणे
उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा मध्य भाग,
नंदुरबारचा बहुतांशी भाग, धुळ्याच्या उत्तरेकडील भाग, जळगावचा बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.

पश्चिम महाराष्ट्रात पुणे जिल्हाचा बहुतांशी भाग,
साताऱ्याचा सह्याद्री पर्वतरांगाकडील पश्चिम भाग, कोल्हापूरचा बहुतांश भाग,
सांगली जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा मध्य भाग, काही अंशी ढगाळ वातावरण राहील.

मराठवाड्यामध्ये अहमदनगरचा निम्मा उत्तर भाग,
औरंगाबादचा काही दक्षिण भाग,
जालना जिल्हा बहुतांश भाग, परभणी जिल्ह्याच्या पश्चिमेकडील व बीड जिल्ह्याच्या उत्तरेकडील काही भाग,
उस्मानाबाद जिल्हा बहुतांश भाग, लातूर जिल्ह्यात मध्य भाग,
नांदेड जिल्ह्याचा यवतमाळकडील पुर्व-उत्तरेच्या भागात वातावरण ढगाळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमरावती विभागातील अमरावतीचा उत्तर भाग,
बुलढाणा,वाशिम,अकोला,हिंगोली जिल्ह्यातील काही भाग तसेच यवतमाळ जिल्ह्याचा नांदेड हिंगोली कडील पश्चिम-दक्षिण भाग ढगाळ राहील.

विदर्भात वर्धा जिल्ह्याचा काही भाग,
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
चंद्रपूरचा बऱ्यापैकी सर्व भाग, गडचिरोली जिल्ह्यातील पूर्ण भाग, वातावरण ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे.

सॅटेलाइट फोटो क्रमांक-३मध्ये दिसत असल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्याचा व यवतमाळ जिल्ह्याचा एकमेकांत सामावलेल्या भागावरती खूप जास्त प्रमाणात ढगांची दाटी आहे त्यामुळे तेथील वातावरण खूप ढगाळ राहील....

तसेच परभणी जिल्हा जालना जिल्ह्याच्या सीमेवरील परभणी चा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....

उस्मानाबाद जिल्ह्याचा मध्य दक्षिण भाग व लातूर जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग खूप ढगाळ वातावरण निर्माण होईल....

आपण ज्या गारपिटीची व अवकाळी पावसाची धास्ती घेऊन बसला आहात त्याची चाहूल राजस्थान व गुजरात/कच्छ येथे लागली असून तो महाराष्ट्रात आज येईल असे वाटत नाही कारण त्याचा वेग कमी असून तो जैसलमेर,जोधपुर,भुज,कराची या भागामध्ये बऱ्यापैकी स्थिरावला आहेे.
तो महाराष्ट्राच्या उत्तर भागात,मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात, गुजरातच्या दक्षिण भागात प्रवेश करील असे संकेत आहेत....

पण आमचा अभ्यास असा सांगतो की आज तरी महाराष्ट्रातील कोणत्याच भागामध्ये पाऊस व गारपिटीची शक्यता नाही.....तरी झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार,धुळे,नाशिक मधील उत्तर भागात किंचित पाऊस होऊ शकतो.

घाबरून जाण्यासारखी खूप बिकट परिस्थिती नाहीये तरी धैर्याने येणाऱ्या संकटाला सामोरे जावे.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

Thursday, February 22, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 22/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २२ फेब्रुवारी २०१८.*

सॅटेलाइट फोटो क्रमांक -१ मध्ये दिसत असल्याप्रमाणे उत्तरेकडून हवेचा दाब हा वाढला असून किंचित प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रावर साधारण थंडी आज जाणवत असेल.

कोल्हापूर सिंधुदुर्ग वगळता संपूर्ण महाराष्ट्रभर पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प उत्तरेकडून सरकत आले असून आज बहुतेक महाराष्ट्रातील बऱ्याच भागात पहाटे थोडेफार धुकेे दिसून आले असेल.

ही येणाऱ्या काळातील धोक्याची घंटा असून पुढील काळात काबुल,मुलतान, श्रीनगर या भागातील म्हणजेच पाकिस्तान भागात असलेले थंडगार ढग खाली सरकत पंजाब,राजस्थान, गुजरात/मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रावर येऊ शकतात.

दुसरी एक शक्यताही असू शकते जी म्हणजे येणाऱ्या काळात म्हणजेच एक-दोन दिवसात बहरीन,कतार व मस्कत या भागावरील जे दाट ढग आहेत तेसुद्धा कराची, भुज या  मार्गे महाराष्ट्रात येऊ शकतात.

सरकार व प्रशासनाने दिलेल्या धोक्याच्या सूचनेनुसार वरील दोन शक्यता असून या शक्यतेमुळेच अवकाळी पाऊस व गारपीट होऊ शकते.

तिसरी ही एक शक्यता आहे ती म्हणजे सोमालिया देशाजवळ व लक्षद्वीप मालदीवच्या खाली जे वादळ सदृश्य ढग आहेत ते जर नैर्ऋत्य दिशेकडून येणार्‍या वाऱ्याबरोबर महाराष्ट्रावर आले तर मग अवकाळी पाऊस व गारपीट घेऊन येऊ शकतात.
पण ही शक्यता कमी वाटते कारण हवेचा दाब उत्तरेकडून दक्षिणेकडे सध्यातरी दिसत आहे.

सॅटेलाइट फोटो क्रमांक-२ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही भागावर किरकोळ ढगाळ वातावरण दिवसभर बनून राहील....


कोकण विभागातील रत्नागिरीचा सह्याद्री पर्वताकडील भाग किरकोळ ढगाळ राहील.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याचा बहुतांशी भाग, सातारा जिल्ह्याचा निम्मा पश्चिम भाग,
सांगली जिल्ह्याचा शिराळा वाळवा पलूस कडेगाव हा भाग....
कोल्हापूर जिल्ह्याचा बहुतांशी भाग,
सोलापुरातील कर्नाटक सीमेवरील काही तालुके हे दिवसभर ढगाळ राहील.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिकचा बहुतांश भाग,
नंदुरबार जवळजवळ सर्व भाग,
धुळे जिल्हाचा उत्तरेकडील सीमेवरील भाग,
जळगाव जिल्हा बऱ्यापैकी संपूर्ण भाग किंचित ढगाळ राहील.

मराठवाड्यातील अहमदनगर जिल्ह्याचा पुणे जिल्ह्या लगतचा जो भाग आहे तो सोडून उर्वरित सर्व भाग,
बीड जिल्ह्याचा पूर्वेकडील सर्व भाग,
औरंगाबादचा काही भाग, लातूरचा पश्चिमेकडील भाग, उस्मानाबादचा निम्मा दक्षिणेकडील भाग,
परभणी,बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांशी भाग किंचित ढगाळ वातावरण निर्माण होईल.

विदर्भात यवतमाळ जिल्ह्याचा  पश्चिम भाग जास्त ढगाळ वातावरण राहू शकते,
अकोला चा बहुतांशी भागही ढगाळ वातावरण असेल, तसेच हिंगोली जिल्हा बऱ्यापैकी ढगांनी व्यापलेला असेल.

घाबरून जाण्याचं काही कारण नाही कारण जी परिस्थिती येईल त्या परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहोत व वेळच्या वेळी किंबहुना वेळेच्या आधीच आम्ही तुम्हाला सर्व माहिती व सखोल मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ जेणेकरून तुम्हांला येणाऱ्या परिस्थितीवर थोडीफार तरी मात करता येईल.......!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

Wednesday, February 21, 2018

Weather forecast/हवामान अंदाज 21/02/2018

*नमस्कार मित्रांनो,*

*आज दिनांक २१ फेब्रुवारी २०१८ सकाळी......*

काल जी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती ती बर्‍यापैकी निवळली असून आज दिवसभरात महाराष्ट्रावर वातावरण स्वच्छ व निरभ्र राहील.

खालील सॅॅटेलाइट फोटो क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे महाराष्ट्रातील उत्तर भाग ज्यामध्ये सर्व जिल्हे येतात....

ठाणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव औरंगाबाद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अशा सर्व जिल्ह्यात....

दक्षिणेकडील सिंधुदुर्ग-गोवा कोल्हापूर सांगली साताराचा काही भाग रत्नागिरी सोलापूर या भागात वातावरणात बाष्प काही प्रमाणात टिकून आहे.. त्यामुळे साधारण उकाडा जास्त जाणवेल......!

तसेच,

खलील सॅटेलाइट फोटो क्रमांक दोनमध्ये दिसत असल्याप्रमाणे विषुववृत्तावर......म्हणजेच खालील फोटो मध्ये शून्य अंशांची जी रेषा आहे.. तिथपासून दहा अंशांच्या रेषेपर्यंत उत्तर व दक्षिण या दोन्ही भागात म्हणजेच "विषुववृत्तीय" प्रदेशात ढगांची एकदमच दाटी कालपासून वाढली असून येणाऱ्या काळात ही चिंतेची बाब असू शकते......

कारण सध्या वाऱ्याचा वेग व दिशा नैऋत्येकडून हिमालयाकडे असल्याने यातील काही दाट ढग हे पुढील काळात म्हणजेच पुढील महिन्यात भारताच्या किंबहुना महाराष्ट्राच्या भूपृष्ठावर येऊन अवकाळी पाऊस घेऊन येण्याची शक्यता आहे.....

भारत सरकारने सूचना दिल्याप्रमाणे येत्या एक-दोन  दिवसानंतर पाऊस व गारपिटीची शक्यता आहे....
*पण* परिस्थिती एवढी भयानक नाही.
कारण सद्यस्थितीला तरी उत्तरेकडून व दक्षिणेकडून ढगांची आगेकूच महाराष्ट्रावर दिसत नाही.
कदाचित आज-उद्या परिस्थिती बदलू शकेल पण परिस्थिती खूपच भयानक असेल असे वाटत नाही.
सर्व समाज माध्यमांमधून व tv चॅनल्समधून जे भासविण्यात येत आहे तेवढी परिस्थिती भयानक असेल असे वाटत नाही तरीही शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेतलेली बरी......

खालील व्हिडिओ मध्ये आम्ही आपणास गेल्या 24 तासातील ढगांची व वातावरणातील बाष्प यांची परिस्थिती दाखवीत आहोत...

यातून असा निष्कर्ष निघतो की सध्या तरी वातावरण हे पूर्णपणे शांत असून एक दोन दिवस असेच शांत राहण्याची शक्यता आहे........!

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*

Tuesday, February 20, 2018

हवामान अंदाज २० फेब्रुवारी २०१८.

*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक २० फेब्रुवारी २०१८.*

वरील व्हिडिओ मध्ये दिसत असल्याप्रमाणे गेल्या चोवीस तासांमध्ये ढगांचा व वातावरणातील बाष्प वरीलप्रमाणे मार्गक्रमण करत असून ते पश्चिमेकडून म्हणजेच अफगाणिस्तान/ पाकिस्तान या भागातून राजस्थानकडे आल्यामुळे चिंतेचे कारण बनले आहे.
हेच ढग येणाऱ्या काळामध्ये उत्तर महाराष्ट्र व महाराष्ट्रातील इतर भागात पाऊस कदाचित गारपीट घेऊन येउ शकतील.....!
आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहोत पुढे जशी गरज असेल तसे अपडेट करण्यात येईल.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

Monday, February 19, 2018

हवामान अंदाज 19 फेब्रुवारी 2018.

*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक १९ फेब्रुवारी २०१८.*
उत्तर महाराष्ट्रावर काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसून येईल कारण आफ्रिकेमधील सोमालिया व इथोपिया या देशावरून काही ढग भरकटून गुजरात व उत्तर महाराष्ट्रातील काही तालुक्यांत आले असून त्यामुळे किंचित ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
नंदुरबार धुळे जिल्हा  दिवसभर ढगाळ राहण्याची शक्‍यता आहे
तसेच नाशिक मधील उत्तरेकडील काही तालुके दिवसभर कमी-जास्त प्रमाणात ढगाळ राहतील व पुणे जिल्हयातील उत्तरेकडील जुन्नर तालुक्याच्या पश्चिम भाग व आसपासचा भाग हा काही प्रमाणात ढगाळ दिसून येईल.

अहमदनगर जिल्ह्याचा उत्तरेकडील भाग किंचित ढगाळ राहण्याची शक्यता आहे कारण तिथे वातावरणात बाष्प अधिक प्रमाणात दिसून येत आहे

ठाणे जिल्हा व कोकण विभागातील मुंबई ,रायगड, रत्नागिरी ,सिंधुदुर्ग ,उत्तर व  दक्षिण गोवा हे सर्व जिल्हे वातावरणातील बाष्प अधिक आसल्या कारणाने येथील वातावरण दमट राहील.

*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

Sunday, February 18, 2018

अवकाळी पाऊस व गारपीट हवामान अंदाज.

आज दिनांक १८ फेब्रुवारी २०१८.*
उत्तर भारतात उपलब्ध असलेले वातावरणातील पाण्याची वाफ म्हणजेच बाष्प हे महाराष्ट्र व गुजरात/मध्यप्रदेश सीमेवरती मर्यादित राहून तिथपर्यंतच धुके व थोडीफार थंडी तयार करीत आहे.
तसेच दक्षिण भारतात केरळ तमिळनाडू या राज्यांच्या आसपास वातावरणातील बाष्प व विषुववृत्तावरील पाऊस पाडण्याजोगे ढग मर्यादित राहून उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल देत आहेत.
विषुववृत्तावरील ढगांची दाटी ही येणाऱ्या काळामध्ये काही प्रमाणात अवकाळी पाऊस व किंचित प्रमाणात गारपीट घेऊन येण्याची शक्यता आहे.
कारण आता वाऱ्याची दिशा बदलली असून ते नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हे वारे विषुववृत्तावरील ढग  महाराष्ट्रावर किंबहुना भारतीय जमिनीवर येऊन अवकाळी पाऊस व गारपीट अशी परिस्थिती निर्माण करू शकतात.
आत्ता घाबरून जाण्याचं कारण नाहीये कारण ही परिस्थिती येणाऱ्या काही महिन्यात उद्भवू शकते अशी कोणतीही परिस्थिती आत्ता लगेच उद्भवू शकत नाही. कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांचा वेग अजून म्हणावा तितका बळकट झाला नाहीये.
त्यामुळे सध्यातरी फेब्रुवारी महिन्यामध्ये अवकाळी पाऊस व गारपिट यांची शक्यता कमी आहे.
सध्या महाराष्ट्रावर कोरडे वातावरण असून उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली आहे तसेच पहाटे व संध्याकाळी तापमान किंचित कमी जाणवत आहे त्यामुळे थंडी बोचरी जाणवत असेल कारण वाऱ्यांचा वेग काही प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे व महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये वारे वेगवेगळ्या दिशेतून मार्गक्रमण करत आहेत.
सरतेशेवटी वाढणाऱ्या उन्हाच्या कडाक्यामुळे तब्येतीवर परिणाम होवू शकतो त्यामुळे तब्येतीची काळजी घ्यावी.
तसेच शेती क्षेत्रासाठी विशेष सल्ला असा की उन्हाची तीव्रता वाढत असल्याने जमिनीतील उपलब्ध पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढत चालला असून त्यासाठी शेतीमध्ये जमिनीवर आवश्यक तेवढे नैसर्गिक आच्छादन निर्माण करून आपण नैसर्गिक गांडूळ व सूक्ष्म जीवजंतूंचे संरक्षण करावे कारण येणार्‍या उन्हाळ्यात हेच गांडूळ व सूक्ष्म जीवजंतू आपल्याला चांगल्या दर्जाचे पिक देणार आहेत.
निसर्ग आपल्याला एवढे भरभरून देत असताना आपणही त्या निसर्गाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*
*सांगली*
*7303222222*

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद