*नमस्कार मंडळी,*
*आज दिनांक २६ फेब्रुवारी २०१८.*
सॅटेलाईट इमेज क्रमांक १ मध्ये दिसत असल्याप्रमाणे अफगाणिस्तान/पाकिस्तान या भागातील भयानक वादळ आपले आणखीच भयानक रूप धारण करीत असून त्याने लंब गोलाकार नागाच्या फण्यासारखा आकार धारण केला आहे.
या भयानक वादळ सदृश्य परिस्थितीमध्ये खूप दाट असे अवकाळी पाऊस व गारपिटीहीे करण्याजोगे ढग आहेत त्यामुळे हे वादळ सरकत राजस्थान/गुजरात या भागावर आले तर मग उत्तर महाराष्ट्राची दयनीय अवस्था होऊ शकते.
त्या दिशेने या वादळाची थोडीफार पावले पडत असून आम्ही या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत...!
आज मध्य महाराष्ट्र,पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यावर काहीसे जास्त प्रमाणात बाष्प आले आहे त्यामुळे पहाटे बऱ्याच ठिकाणी हलकेसे धुके पडले असेल....
त्यात हे बाष्प वायव्य/ उत्तरेकडून आले असल्याने यात गारवा आहे त्यामुळेच सकाळी किंचित थंडी जास्त जाणवली असेल.
आम्हाला चिंता याच गोष्टींची असून पुढील परिस्थितीचा अंदाज घेणे अवघड जात आहे.
कारण वाऱ्याची दिशा व हवेचा दबाव वायव्य/ उत्तरेकडून महाराष्ट्राकडे दिसत असल्यामुळे हे भयानक वादळ महाराष्ट्रावर येऊन नुकसान करते की काय ही चिंता सतावत आहे.
असो,
पुढील परिस्थितीवर आम्ही बारीक नजर ठेऊन आहोत.. गरज असल्यास रात्री परत एकदा माहिती व सखोल मार्गदर्शन केले जाईल....!
आज उकाडा जास्त जाणवेल पण त्याबरोबरच वाऱ्याचा वेग महाराष्ट्रातील बऱ्याच भागात थोडाफार जास्त असल्याने तो सहन करता येईल...
आज वातावरण कोरडे नसून थोडेफार बाष्प महाराष्ट्रावर आहे त्यामुळे काही भागात दमटपणा जाणवेल.
काही भागात वातावरण किंचित म्हणजे किंचित ढगाळ होण्याची शक्यता आहे याचे कारण वातावरणातील बाष्प हे आहे......!
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:
Post a Comment