*नमस्कार मित्रांनो,*
*आज दिनांक २४ फेब्रुवारी २०१८.*
सॅटेलाइट इमेज मध्ये दिसत असल्याप्रमाणे जम्मू-कश्मीर, काबूल वरती चीनपर्यंत एक चक्रीवादळ आपले भयानक रुप धारण करीत आहे.
हे समुद्रातील चक्रीवादळ नसल्याने याचे स्वरूप थोडेफार वेगळे आहे या वादळात थंडगार ढग असल्याने याचा परिणाम येथील भागात विपरीतपणे होऊ शकतो.
पण या चक्राकार स्थितीमुळे महाराष्ट्राचा बराचसा फायदा झाला आहे. कारण
महाराष्ट्रातील बऱ्याच भागात संभावित गारपीट व अवकाळी पाऊस पडण्याची जी शक्यता होती ती टळली आहे....
पुढील आठवड्यात वातावरण बऱ्यापैकी स्वच्छ व निरभ्र असेल कारण नैऋत्येकडून हिमालयाकडे वाहणाऱ्या वाऱ्यामुळे समुद्रावरील बाष्प महाराष्ट्रावर येत असून ते हळूहळू थंडी कमी करून उकाडा वाढवतील.
महाराष्ट्रात पहाटे काही ठिकाणी किंचित धुके पडण्याची शक्यता आहे.
पहाटे थोडीफार थंडी/धुके व दिवसभर कोरडे वातावरण/उकाडा जाणवेल.
संध्याकाळी छानसा वारा सुटेल.
*राहुल रमेश पाटील*
*पर्यावरण व हवामान अभ्यासक*

No comments:
Post a Comment