अकोल्यातील भूधन ऑरगॅनिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २००३ मध्ये शहरापासून ५ किमी. अंतरावर असलेल्या अमानतपूर ताकोंडा येथे खतनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या प्रकल्पासाठी महानगरातील घनकचरा पुरविण्यात येतो. त्यासाठी मनपाला प्रती खेप १०० रुपये मिळतात. हा प्रकल्प सुरु झाल्याने घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे मनपाला सहज शक्य झाले आहे.
अकोला येथील भूधन ऑरगॅनिक या संस्थेने नव्याने पुण्याच्या एनकेजी संस्थेसोबत करार केला आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी दररोज लागणाऱ्या घनकचऱ्याची गरज वाढली आहे. आता ४० टन कचरा या प्रकल्पाला हवा आहे. तथापि महापालिका २५ टनच कचरा पुरवित आहे. या प्रकल्पासाठी केवळ बाजारातील कचरा पुरविण्यात येत आहे.
महानगरातील इतर कचराही या प्रकल्पासाठी वापरल्यास शहरातील कचऱ्याचे व्यवस्थापन करणे शक्य होणार आहे. कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा पर्याय मनपासमोर आहे. असे प्रकल्प उभे राहत असतील तर केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय देखील सहकार्य करते. २००४-२००५ मध्ये केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने यासंदर्भात देशातील सर्वच महानगरपालिका अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. अकोला मनपाचे अधिकारी हे प्रशिक्षण घेऊन आले आहेत.
No comments:
Post a Comment