Tuesday, October 4, 2011

फुलशेतीतून लाखाचे उत्पन्न


कष्ट आणि जिद्द यातून यश मिळवता येते. यवतमाळ जिल्ह्यातील पुसदजवळच्या वरुड येथील माधव पडघणे या रोजंदारी कामगाराने नर्सरीचे स्वप्न बघितले आणि प्रयत्नातून पूर्ण केले. रोजंदारी कामगार आज निसर्ग नर्सरीचा मालक झाला.

श्री. पडघणे पाच वर्षांपूर्वी वरुडच्या नर्सरीत रोपट्यांना पाणी देण्याचे काम करीत होते. चिकित्सक वृत्तीमुळे पाणी देण्याबरोबरच झाडावर डोळे बांधून कलम तयार करण्याचे तंत्र त्यांनी आत्मसात केले. एवढ्यावरच न थांबता नर्सरी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले. त्यादृष्टीने थोडीफार बचत करीत व मक्त्याने शेती करून पैसा जमविला व दीड एकर शेती विकत घेतली. या शेतीत फुलशेती फुलवून श्री. पडघणे यांनी आर्थिक बाजू भक्कम केली. गुलाब, निशीगंध, ग्लॅरेडिया, वॉटर लिली, झेंडू आदी फुलांची लागवड करून त्यांचा शहरातील बाजारपेठेत पुरवठा केला. यातून त्यांनी नागपूर रोडवर नर्सरीसाठी जागा विकत घेतली. श्री. पडघणे यांची नर्सरी आज तेथे बहरली आहे.

या नर्सरीचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी विजय लोखंडे व तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर यांच्या उपस्थितीत नुकतेच पार पडले. नर्सरीत निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक असलेली दुर्मिळ वनस्पतींची रोपे माधव पडघणे यांनी आवर्जून तयार केली. यात वड, पिंपळ, आवळा, सीताफळ, सिसम यांचा समावेश आहे. जादा प्रमाणात ऑक्सिजन देणारी तुळशीची हजार रोपे त्यांनी निसर्गप्रेमींना अत्यल्प दरात पुरविली आहेत.

दुर्मिळ वनस्पती उपलब्ध करून देण्याचा माधव पडघणे यांचा संकल्प आहे. त्यांना डोळे बांधून कलम तयार करण्याचे कौशल्य अवगत आहे. लखनौ पेरुची त्यांनी लागवड केली असून त्यापासून असंख्य कलमे तयार केली आहेत. हा पेरू अवघ्या सहा महिन्यांत फळांनी लगडतो. या पेरुला विशेष मागणी आहे. नर्सरीसोबतच फुलशेती करून माधव आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवितात. फुलांच्या विक्रीतून त्यांना दररोज उत्पन्न मिळते. नर्सरीतून यंदा त्यांना सुमारे दीड ते दोन लाखांचे उत्पन्न मिळाले आहे.

या नर्सरीच्या उभारणीसाठी व फुलशेतीसाठी त्यांना पंतप्रधान पॅकेजमधून मदत मिळाली. त्यांचे सर्व कुटुंब शेतात व नर्सरीत राबत असून ही नर्सरी आदर्श बनविण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पडघने यांनी केलेला हा प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या नर्सरीला भेट देतात. त्यांच्या श्रमाची फलनिष्पत्ती पाहून अचंबित होतात. आगामी काळात नर्सरीत अनेक जातींच्या फुलांचा समावेश करण्याचा त्यांचा मानस आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद