Thursday, September 2, 2010

Fumigation for Export in Wooden Packing- ISPM -15 / "लाकडी आवेष्टनामध्ये निर्यातीकरिता आयएसपीएम-१५ नुसार धुरीकरणाची आवश्यकता"

राज्यातून मोठया प्रमाणात औद्योगिक साहित्य लाकडी पॅकींगद्वारे निर्यात केली जाते. तसेच कंटेनरद्वारे कृषि माल निर्यातीकरीता सुध्दा लाकडी पॅलेटचा वापर केला जातो. लाकडी पॅकींगद्वारे किडी व रोगाचा प्रसार होवू नये म्हणून International Standards for phytosanitory measures-15 (ISPM-15) नुसार लाकडी पॅकींगकरीता मिथाईल ब्रोमाईड चे धुरीकरण किंवा हॉट वॉटर ट्रिटमेंट करुन तसे लाकडी पॅकींग मटेरियलवर स्ट्रॅपिंग करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे व त्याची अमलबजावणी प्रगतशिल देशामार्फत करण्यात येत आहे.

(ISPM-15) आयएसपीएम-१५ म्हणजे काय ?

आंतरराष्ट्रीय प्रमाणके स्वच्छता उपाययोजना-१५
एका देशातुन दुस-या देशास कृषि मालाची आयात व निर्यात करण्याकरीता सन १९५१ मध्ये आंतरराष्ट्रीय पिक सरक्षण करार International Plant Protection cornetin (IPPC) करण्यात आलेला आहे. सदर कराराचे १७० सदस्य देश असुन भारत ही सदर कराराचा एक सदस्य देश आहे.

आंतरराष्ट्रीय पिक संरक्षण कराराचा उद्देश (IPPC)

एका देशातुन दुस-या देशात मालाचा आयात व निर्यातीद्वारे किड,रोग व तणाचा प्रसार होवू नये. तसेच त्यापासुन मानव, प्राणी व पिकांना बांधा होणार नाही, हा मुख्य उद्देश आहे. सर्व सदस्य देशाना सदर कराराचे पालन करणे बंधनकारक आहे.
खुल्या जागतिक बाजारपेठेमुळे आयात व निर्यातीच्या संधी निर्माण झाल्यामुळे एका देशातुन दुस-या देशांना आयात व निर्यातमध्ये वाढ होत आहे. याचा विचार करुन आयात व निर्यातीद्वारे रोग व किडीचा प्रसार होवू नये या दृष्टिकोनातुन (IPPC) करारामध्ये सन- १९९७ मध्ये समिती स्थापन करुन सदर समितीद्वारे १८ उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये (ISPM-15) नुसार लाकडी पँकींग करीता मिथाईल ब्रोमाईड या किडनाशकाची धुरीकरण किंवा हॉट वॉटर ट्रिटमेंट करणे आवश्यक करण्यात आलेले आहे.

लाकडी पॅकींग करीता प्रामुख्याने खालील लाकडाचा वापर केला जातो.

१. टिक वुड
२. रबर वुड
३. पाईन वुड
४. ब्रम्हा वुड
५. सिल्व्हर वुड
लाकडी पॅकींग साहित्यास प्रामुख्याने वुड बोरर व वाळवी या किडीचा प्रादुर्भाव होतो. तसेच बुरशीचाही प्रादुर्भाव होतो. सदर किडी रोगाचे नियंत्रणाकरीता ?आंतरराष्ट्रीय प्रमाणके स्वच्छता उपाययोजना -१५? मधील मार्गदर्शन सुचना नुसार लाकडी पॅकींग मटेरियलला मिथाईल ब्रोमाईड या किडनाशकाची धुरीकरण करुन तसे केल्याचे लाकडी पॅकींगवर पक्याशाईने नमुद करणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे मार्क केले जाते.

धुरीकरण कोणाकडून करुन घेणे आवश्यक आहे.

(ISPM-15) नुसार लाकडी पँकींग मटेरियलला धुरीकरणे करण्यासाठी केंद्र शासनाने National Plant Protection Organisation (NPPO) अंतर्गत पिक संरक्षण सल्लागार,भारत सरकार फरिदाबाद यांना Fumigation Operation चा परवाना देण्याचा अधिकार दिलेले आहेत. सदर परवाना देताना Methyl Bromide चे fumigation तंज्ञ व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी तंज्ञ व्यक्तिची नियुक्ती करुनच (ISPM-15) Methyl bromide fumigation करण्याचा परवाना दिला जातो. सद्या देशात १७० परवाना धारक असुन राज्यात २३ अधिकृत परवानाधारक आहेत.

लाकडी पँकींग मटेरियला मिथाईल ब्रोमाईडची धुरीकरण अधिकृत परवाना धारकाकडून करुन घेवून विहित नमुण्यात प्रमाणपत्र घेतल्यानंतर संबधीत PSC Authority कडून संबधीत आयातदार देशाच्या नावाने PSC घेणे आवश्यक आहे. लाकडी साहित्याचे धुरीकरण केले नाही किंवा लागडी साहित्यामध्ये किडीचा व रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास Consignment रद्द होवू शकते.

निर्यातदारानी लाकडी पॅकींग मटेरियल खरेदी करताना व त्याद्वारे पॅकींग करताना खालील प्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे.

१. लाकडी साहित्यास साल नसली पाहिजे.
२. वाळवीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे.
३. बोरर किड/बुरशीचा प्रादुर्भाव नसला पाहिजे.
४. जंगली लाकडाची भेसळ नाही. याची खात्री करणे
५. अधिकृत पॅकरकडून योग्य प्रतीचे लाकूड खरेदी केले पाहिजे.
६. लाकडी पॅकींग मटेरियलला Methyl Bromide चे fumigation अधिकृत परवानाधारक operator कडूनच करुन घेतले पाहिजे.
७. लाकडी पॅकींग मटेरियलची साठवणूक योग्यरित्या केली पाहिजे.

Special Thanks,
गोविंद ग. हांडे
(कृषि प्रक्रिया व व्यापारक्षम शेती,)
 
http://www.mahakrushi.blogspot.com/

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद