Wednesday, September 1, 2010

AGMARK Certification for Export of Fruits and Vegetables / फळे व भाजीपाला निर्यातीकरिता एगमार्क प्रमाणीकरणाची आवश्यकता.

 युरोपियन युनियननी फळे व भाजीपाला या तयार मालाची आयात योग्य प्रकारे प्रतवारी करुन तसे प्रमाणपत्र देण्याबाबत बंधनकारक केलेले आहे. त्यानुसार फळे व भाजीपाल्याची निर्यात युरोपियन देशांना (उदा. युनायटेड किंगडम, नॅदरलॅड, हॉलंड, फ्रान्स इत्यादी) करण्याकरिता वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार, यांचे मार्फत पब्लीक नोटीस क्र.२८ (आर ई-२००२)/२००२-२००७ दिनांक २/८/२००२ अन्वये विपणन व तपासणी संचालनालय (Directorate of Marketing and Inspection) कृषि व सरकार विभाग, भारत सरकार, यांचेकडून कृषि उत्पादन (प्रतवारी व विपणन) १९३७ ऍगमार्क प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. युरोपियन कमिशन यांनीही कमिशन रेग्युलेशन (इसी) नं.७६१/२००३ दिनांक ३०/४/२००३ अन्वये युरोपियन देशांना आयात करण्यात येणा-या फळे व भाजीपाला करीता तपासणी ऍथोरिटी म्हणून विपणन व तपासणी संचालनालयास, नवी दिल्ली यांना संमती दिलेली आहे.
कृषि उत्पादन (प्रतवारी व विपणन) कायदा १९३७ अन्वये ऍगमार्कमार्फत प्रमाणपत्र दिले जाते.

ऍगमार्क म्हणजे काय ?
ऍग- ऍग्रीकल्चर मार्क - मार्केंटींग विविध शेतमालासाठी नियमानुसार ठरवून दिलेली प्रतवारी ऍगमार्क दिले जाते.
कृषि उत्पादन (प्रतवारी व विपणन) कायदा १९३७ मधील कलम ३ अन्वये फळे व भाजीपाला प्रतवारी व विपणन करीता खालीलप्रमाणे नियम करण्यात आलेले होते.

१. द्राक्ष- द्राक्ष प्रतवारी व विपणन नियम १९३७
२. कांदा- कांदा प्रतवारी व विपणन नियम १९६४
३. केळी- केळी प्रतवारी व विपणन नियम १९८०
४. आंबा- आंबा प्रतवारी व विपणन नियम १९८१
५. अननस-अननस प्रतवारी व विपणन नियम १९८२
६. पेरु- पेरु प्रतवारी व विपणन नियम १९८६

वरील सर्व फळे व भाजीपाला पिकाचे प्रतवारी आणि विपणन नियम रद्द करुन आता प्रमुख व्यापारी फळे व भाजीपाला पिकाकरीता फळे व भाजीपाला पिकाचे प्रतवारी आणि विपणन नियम २००४ नुसार ऍगमार्क प्रमाणपत्र दिले जाते.
सदर नियमानुसार खालील फळे व भाजीपाला पिकाचे प्रतवारी आणि विपणन प्रमाणके निर्धारीत करण्यात आलेली आहेत.

फळेपिके :-
१.द्राक्ष २.लिची ३.आंबा ४.डाळींब ५.अननस ६.पेरु

भाजीपालापिके :-
१.पत्ताकोबी २.टोमॅटो ३.केळी ४.लसूण ५.कांदा ६.वटाणा
फळे व भाजीपाला पिकाचे प्रतवारी आणि विपणन नियम २००४ अन्वये फळे व भाजीपला पिकाचे प्रतवारी प्रामुख्याने तीन प्रकारात केली जाते.

१. विशेष दर्जा (Extra class)
२. वर्ग-१ दर्जा (Class I grade)
३. वर्ग-२ दर्जा (Class II grade)

सदरचा प्रतवारी दर्जा देताना खालील बाबीवर विशेष भर दिला जातो.

१. गुणवत्ता
२. किड व रोग मुक्त
३. वजन
४. आकारमान
५. आकार
६. रंग
७. आद्रता
८. स्वच्छता इत्यादी
९. उर्वरीत अंश

फळे व भाजीपालापिकाचे पॅकींगवार खालील बाबी नमुद करावे लागते.

१. फळे / भाजीपाला पिकाचे नांव
२. जात
३. मालाचा दर्जा (विशेष दर्जा/वर्ग-१दर्जा/वर्ग-२ दर्जा)
४. आकार
५. लॉटनंबर/बॅच नंबर/कोड नंबर
६. उगमस्थान (source of origin)
७. वजन /नगाची संख्या
८. पॅकींग /निर्यातदाराचे नांव व पुर्णपत्ता
९. वापराबाबत वैघ मदत (जेथे लागु असेल)
१०. साठवणुकीच्या सुविघा
११. पॅकींगची तारीख
१२. कृषि विपणन सल्लागार, भारत सरकार यांनी वेळोवेळी ठरवून दिलेल्या प्रमाणकानुसार पुर्तता करणे.

फळे व भाजीपाला पिकाची निर्यातीकरिता पॅकींगची पध्दत

१. फळे व भाजीपाला मालाची गुणवत्ता टिकून राहील अशा पध्दतीने पॅकींग करणे.
२. पॅकींग मटेरियलच्या आतमध्ये मालावर आतुन व बाहेरुन इजा पोहोचणार नाही याची दक्षता घेणे.
३. पॅकीगवर लेबल लावताना वापरण्यात येणारी शाई विषारी नसली पाहीजे.
४. कंटेनरमध्ये फळे व भाजीपाल्याची पॅकींग करताना आंतरराष्ट्रीय पॅकेजिंग आणि ट्रान्सपोर्ट कोड निर्यात पध्दतीनुसार करणे.
५. कंटेनर हे स्वच्छ, हवेशीर वहातुकीसाठी योग्य, व त्यामध्ये घातक व बाहेरील पदार्थ नसले पाहिजे.
६. प्रत्येक पॅकींग /लॉटमध्ये एका जातीचे व एका दर्जाचे माल असणे आवश्यक आहे.
७. प्रत्येक पॅकेजमध्ये आयातदाराच्या मागणीनुसार पॅकींग व लेबल असणे आवश्यक आहे.
८. स्थानिक बाजारपेठामध्ये विक्री करीता फळे व भाजीपालामध्ये अन्न व भेसळ प्रतिबंध नियम १९५५ मधील हेवी मेटल, किटकनाशके, अप्लाटॉक्सीन आणि इतर अन्न सुरक्षितता प्रमाणकाची पुर्तता करणे अवाश्यक आहे.

ऍगमार्क प्रमाणीकरण करण्याकरीता अनुसरावयाची कार्यपध्दतती

फळे व भाजीपाला प्रतवारी आणि विपणन नियम २००४ नुसार ऍगमार्क प्रमाणीकरणासाठी सर्टीफिकेट ऑफ ऍथोरायझेशन (CA) घेणे आवश्यक आहे.
सर्टीफिकेट ऑफ ऍथोरायझेशन (CA) मिळण्यासाठी खालील बाबीची पर्तता करावी लागते.

१. विपणन आणि तपासणी संचालनालयामार्फत विहित केलेल्या प्रपत्र-१ मध्ये अर्ज (DMI)
२. कंपनीचे अधिकृत व्यक्तिचे लेटरहेडवर स्वाक्षरी
३. मेमोरॅडम ऑफ आर्टीकलची प्रत
४. कंपनीच्या अधिकृत व्यक्तिने जागेचा व्यवस्थति नकाशा(डायमेन्शनसह) स्वाक्षरीत केलेली प्रत
५. मालाची हाताळणी, पॅकींग व ग्रेंडीग करण्याकरीता कार्यरत असलेल्या कामगाराचे वैद्यकीय दृष्टया तंदुरुस्त असल्याबाबत नोंदणीकृत वैद्यकीय डॉक्टरचे प्रमाणपत्र
६. आयात व निर्यात कोड नंबरची (IEC No)
७. पॅकींगहाउस करीता अपेडा यांचेकडे नोंदणी केली असल्यास त्याची प्रत
८. रु.१०००/- अधिक सर्व्हीस टॅक्सचा डिमांड ड्राफट
९. सर्टीफिकेट ऍथोरायझेनकरीता अर्जदाराकडे स्वतःची अथवा भाडयाची जागा असल्यास त्याठिकाणी प्रपत्र ब मध्ये नमुद केल्याप्रमाणे कमीतकमी सुविधा आवश्यक आहे.
१०. सर्व झेरॉक्स प्रतीवर कंपनीचा अधिकृत व्यक्तिचे सही व शिक्का आवश्यक आहे.
११. सर्व कागदपत्राच्या ३ प्रती.

फळे व भाजीपाला पिकाचे प्रतवारी करावयाच्या ठिकाणी आवश्यक कमीतकमी सुविधा.

१. जागा स्वच्छ आणि सुरक्षित
२. जागेचा परिसर स्वच्छ असला पाहिजे.
३. सदरची जागा ही रसायन कारखाने व खत कारखान्याजवळ नसली पाहिजे.
४. जागा ही किड ,किटक आणि उदीर पासुन मुक्त असली पाहिजे.
५. जागेमध्ये ट्रेनेजच्या चांगल्या सुविधा असल्या पाहिजेत.
६. जागेमध्ये TSS,sugar Acid ratio,etc तपासणीच्या सुविधा असणे आवश्यक आहेत.
७. खराब झालेल्या /रिजेक्ट केलेल्या मालाचे विल्हेवाट लावण्या-या सुविधा असणे आवश्यक आहे

वरील सर्व बाबीचा पर्तता केल्यानंतर डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग ऍण्ड इन्स्पेकशन (DMI) ऍथोरिटी व्दारे CA (certificate of Authorication) प्रमाणपत्र दिले जाते. सद्या राज्यात १५० निर्यातदारानी (DMI) कडून सर्टीफिकेट ऑफ ऍथोरायझेशन घेतलेले आहे.

निर्यातीकरीता सर्टीफिकेट ऑफ ऍगमार्क ग्रेंडीग (CAG) मिळण्याकरीता अनुसरावयाची कार्यपध्दत

फळे व भाजीपाला युरोपियन देशाना निर्यात करण्याकरीता सर्टीफिकेट ऑफ ऍगमार्क ग्रेंडीग (CAG) घेण्यासाठी निर्यातदाराकडे सीए सर्टीफिकेट ऑफ ऍथोरायझेशन आहे त्यांनाच ऍगमार्क कार्यालयास अर्ज करता येतो.

१. प्रपत्र सी-१ मध्ये अर्ज
२. अर्जासोबत
अ) कमर्शियल इनव्हाईस प्रत (sect attesed)
आ) उर्वरीत अंश तपासणी अहवालाची प्रत
इ) निर्यातदाराचे प्रपत्र C-II मध्ये हमीपत्र
३. कन्साइमेटच्या किमंती ०.२ टक्के अधिक सेवाकर कमीतकमी रु.२००/- प्रमाणे डिमांड ड्राफट व्दारे फि भरावी लागते.
४. CA धारकानी मान्यता दिलेल्या जागेवर फळे व भाजीपालाची पॅकींग ग्रेडींग करत असताना तपासणी अधिकारी प्रत्यक्ष मालाची पहाणी करुन व योग्य त्या तपासणी करुन तपासणी अधिका-यांमार्फत ऍगमार्क ग्रेड दिला जातो व तसे CAG certificate ऍगमार्क प्रमाणपत्र दिले जाते. त्यानुसार प्रत्येक बॉक्सवर ऍगमार्क चिन्ह व ग्रेड छापावे लागते.
महाराष्ट्रामध्ये CAG certificate ऑफ (ऍगमार्क ग्रेडींग प्रमाणपत्र देण्यासाठी डायरेक्टोरेट ऑफ मार्केटिंग ऍण्ड इन्स्पेकशन, संचालनालयामार्फत खालील अधिका-याना अधिसुचित केलेले आहे.

१. मुबई - Dy, A.M.A.
Directorate of Marketing and Inspection,
New CGO Building IIIrd floor New Marin lines, Mumbai-20

२. नाशिक - Sr. Marketing Officer,
Directorate of Marketing and Inspection
New Kamal Niwas,Behind Hotel Vaces tourist,
Nashik Road

३. सांगली - Marketing Officer,
Directorate of Marketing and Inspection,
APMC Seva grah, Market Yard, Sangli

४. पुणे - Marketing Officer,
Directorate of Marketing and Inspection,
Gardens Training centre, Beej Bhavan,
Market Yard, Pune-7

निर्यातदाराला युरोपियान देशाना फळे व भाजीपाला निर्यातीकरीता CAG घेण्यापुर्वी मुंबई येथील कार्यालयाकडून CA (certificate of Authorization) घेणे आवश्यक आहे. मुंबई कार्यालयाचा पत्ता Dy, A.M.A. Directorate of Marketing and Inspection, New CGO Building IIIrd floor New Marin lines, Mumbai-20 असा आहे.
राज्यातुन मोठया प्रमाणात द्राक्षाची निर्यात ही युरोपियन देशांना केली जाते. त्याकरीता अपेडाच्या मार्गदर्शनाखाली Residue Monitoring Plan for Grapes ची अंमलबजावणी राज्य शासनामार्फत केली जाते. युरोपियन देशाना ऍगमार्क प्रमाण घेतल्यानंतरच द्राक्ष निर्यातीसाठी फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र दिले जाते.येथून पुढे निर्यातदाराना कांदा, आंबा, डाळींब या पिकाचे युरोपियन देशाना निर्यातीकरीता ऍगमार्क प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे.
ऍगमार्क चिन्हांकीत कृषि मालाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याबद्दल ग्राहाकांना हमी मिळते.

Special Thanks,
गोविंद ग.हांडे
(एमएससी, कृषि किटक शास्त्र), कृषि अधिकारी.

http://www.mahakrushi.blogspot.com/
(website:- http://www.agmarknet.com/ ).

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद