पुढील ३५ वर्षा मध्ये जगाची लोकसंख्या ७.१ अब्ज वरून ९ अब्ज होऊ शकते आणि या लोकसंख्येला लागणारे अन्न हि एक मोठे समस्या आहे. त्यासाठी शेतीचे उत्पन्न पुढील काही वर्षांमध्ये दुप्पट करावे लागणार आहे असे शेतीविषयक विचारवंतांचे म्हणणे आहे. सद्य परस्थिती पाहता हि गोष्ट अवघड आहे पण शक्य आहे. या उद्याच्या जगाला अन्न पुरवण्यासाठी सध्याचे शेतीविषयक शिक्षण आणि तंत्रज्ञाचा वापर करणे आवश्यक आहे आणि त्याचबरोबर काही नवीन पद्धती, शेती अवजारे आणि नवीन शोध याची गरज आहे. त्यासाठी काही समस्यांचे निराकरण करणे अतिशय अवश्य आहे. प्रामुख्याने भेडसावणाऱ्या समस्या :
१)प्रति एकरी कमी उत्पादन:
अयोग्य खाते आणि औषधे, अयोग्य पीकाची निवड आणि अपुरी माहिती या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांचे प्रति एकरी उत्पादन घटते. उत्पादन वाढवण्यासाठी योग्य पीक घेणे आवश्यक असून त्याचबरोबर पिकाची पुरेपूर माहिती, योग्य शेती अवजारे आणि खाते यांचा योग्य वापर करावा लागणार आहे.
२)वया जाणारे अन्न:
हि एक अतिशय महत्वाची समस्या आहे. प्रत्येक तयार केलेल्या १०० कॅलरी अन्नापैकी ६५ कॅलरी अन्न वाया जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी काही नवीन संकल्पना राबवण्याची गरज असून तयार केलेले सर्व शेती उत्पादन आपल्याला कसे पूर्णपणे वापरता येईल याची काळजी घेणे अवश्य आहे.
३)वातावरणाची अपुरी साथ:
बदलते वातावर आणि त्याचा शेती उत्पादनावर होणार परिणाम हि एक अतिशय गंभीर समस्या आहे व या समस्येसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. अवकाळी पाऊस, गारांचा मारा आणि वाढते तापमान असे काही ग्लोबल वॉर्मिंग चे परिणाम असून त्यामुळे शेतकऱ्यांना सुद्धा त्याचा तोटा होत आहे आणि यामुळे शेती उत्पादन (अन्न) घटत आहे.
४)वातावरणाची अपुरी माहिती:
शेतकऱ्यांना वातावरणाची माहिती नसल्या कारणाने शेतकरी काही उपाययोजना करण्यात अपयशी ठरतो. त्यासाठी वातावरणाची अचूक माहिती देणारी संकेतस्थळ आणि विविध मोबाइल अँप्लिकेशन याचा चांगल्या प्रकारे वापर करता येऊ शकतो. या माहितीमुळे शेतकरी वेळोवेळी वातावरणातील बदलांसाठी काही प्रमाणात प्रतिबंधक उपाययोजना करण्यांत यशस्वी ठरेल आणि त्याचा फार मोठ्या प्रमाणात फायदा शेतकऱ्याला होईल.
जर शेतकऱ्यांना बाजारपेठ, वातावरण, पिकांची पुरेपूर माहिती अणि जल व्यवस्थापन याची माहिती असेल तर शेतीची उत्पादन पुढील येणाऱ्या कही वर्षामधे आपण दुप्पट करू असे शेती विषयक तज्ञांचे म्हणणे आहे . अणि या साठी इंटरनेटचा वापर वाढवला पाहिजे जेणेकरून शेतीविषयक सर्व माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मिळेल. तसेच भांडवल गुंतवणूक आणि शेती व्यवस्थापन याचीही फार गरज असून या गोष्टी शेतकऱ्यांना समजावून घेण्याची गरज आहे. जगामध्ये इस्राईल,अमेरिका, इटली, जर्मनी, चीन आणि न्यू झेलण्ड अशा काही राष्ट्रांनी शेतीमध्ये फार प्रागति केली असून या देशामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या फक्त १५ ते २० % असून सुद्धा ते त्यांना लागणारे सर्व अन्न तयार करू शकतात तेव्हा इतर देशांनी सुद्धा त्याच्या काही अत्याधुनिक पद्धती अणि तंत्रज्ञान याचा वापर करणे अवश्य आहे. आज भारतामध्ये शेती करणाऱ्या लोकांचे प्रमाण ३०% असून आपण आपले सर्व अन्न देशांमध्येच तयार करू शकतो त्यासाठी शिक्षणाची गरज आहे.
बरोबर आहे, जमीन तेवढीच राहणार आहे पण लोकसंख्या वाढतच राहणार आहे.
ReplyDelete