धुळे जिल्हयातील साक्री तालुक्यातील छावडी गावात दि. २६ जानेवारी, २००८ रोजी सातपुडा सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांच्या समवेत बैठक घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता महिला बचत गटाची स्थापना केली. ध्येय कसे गाठावे याचे योग्य नियोजन केले. गटाच्या अध्यक्षा म्हणून श्रीमती अंजना किशन पिंपळे व सचिव म्हणून श्रीमती पुनम ओंकार पिंपळे यांची निवड करण्यात आली. स्टेट बँक ऑफ इंडिया, निजामपूर शाखेत गटाच्या नावाने खाते उघडले.
या बचत गटास खेळते भांडवल शासनाने दिलेले अनुदान याचा योग्य तो फायदा उठवत गटाने आपली यशस्वी वाटचाल करण्याचा प्रयत्न चालवला व दिलेले रुपये २५,००० कर्ज फेड वेळीच करत त्यांनी शासनाने दिलेले १ लाख रुपये एवढया रकमेचे अनुदान कायमस्वरुपी खेळते भांडवलाचा फायदा मिळवून घेतला.