स्कायमेट संस्थेचा अंदाज; आगमन सर्वसाधारण
वेळेआधी
पुणे - देशात यंदा मॉन्सून सर्वसाधारण वेळेच्या
आधी जोरदारपणे दाखल होईल आणि देशभर
सरासरीएवढा (102 टक्के) पाऊस पडेल, असा
अंदाज स्कायमेट वेदर सर्विसेस या खासगी संस्थेने
व्यक्त केला आहे. महिनानिहाय सरासरीच्या तुलनेत
जूनमध्ये 107 टक्के, जुलैमध्ये 104 टक्के,
ऑगस्टमध्ये 99 टक्के, तर सप्टेंबरमध्ये 96 टक्के
पाऊस पडणार असल्याचे स्कायमेटमार्फत जाहीर
करण्यात आले आहे.
देशात जून ते सप्टेंबर या कालावधीत 887
मिलिमीटर म्हणजेच सरासरीच्या 102 टक्के पाऊस
पडेल. यात चार टक्क्यांनी वाढ किंवा घट होऊ
शकते. हंगामात सरासरीहून अती पाऊस पडण्याची
शक्यता 8 टक्के, सरासरीहून अधिक पाऊस
पडण्याची शक्यता 25 टक्के, सरासरीएवढा पाऊस
पडण्याची शक्यता 49 टक्के, सरासरीहून कमी
पाऊस पडण्याची शक्यता 16 टक्के, तर दुष्काळ
पडण्याची शक्यता फक्त दोन टक्के असल्याची
माहिती संस्थेमार्फत देण्यात आली आहे.
मॉन्सून देशात दाखल होतानाच त्यापासून जोरदार
पाऊस पडण्याचा अंदाज आहे. हंगामात कोकणासह
पश्चिम किनारपट्टीवर बहुतेक ठिकाणी, पंजाब,
हरियाना, केरळ, गोवा आणि उत्तर प्रदेशच्या
पश्चिम भागात चांगला पाऊस होईल. तर तामिळनाडू,
रायलसिमा व कर्नाटकच्या दक्षिण भागात
सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता
वर्तविण्यात आली आहे.
सरासरीएवढा पाऊस पडण्याची शक्यता जूनमध्ये
64 टक्के, जुलैमध्ये 74 टक्के, ऑगस्टमध्ये 72
टक्के तर सप्टेंबरमध्ये 57 टक्के आहे. याउलट
सरासरीहून कमी प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता
जूनमध्ये 7 टक्के, जुलैमध्ये 9 टक्के, ऑगस्टमध्ये
18 टक्के तर सप्टेंबरमध्ये 25 टक्के आहे. म्हणजेच
एकूण हंगामाचा विचार करता सरासरीएवढ्या किंवा
त्याहून अधिक पावसाची शक्यता सर्वाधिक आहे.
त्यातही मॉन्सून वेळेत दाखल होण्याची व त्याचे
देशभर चांगल्या प्रमाणात वितरण होण्याची चिन्हे
आहेत.
स्कायमेटने 2012 मध्ये देशात सरासरीहून 95 टक्के
तर 2013 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याचा
अंदाज व्यक्त केला होता. या दोन्ही वर्षी अनुक्रमे
93 टक्के व 105 टक्के पाऊस पडल्याने दोन्ही
अंदाज बरोबर आले. गेल्या वर्षी (2014) 91 टक्के
पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
प्रत्यक्षात 88 टक्के पाऊस पडला. अंदाजातील चार
टक्के कमी अधिक बदलाची शक्यता विचारात घेता
आत्तापर्यंत वर्तविण्यात आलेले मॉन्सूनचे तीनही
अंदाज बरोबर आल्याचा दावा संस्थेमार्फत करण्यात
आला आहे.
अंदाज मॉन्सूनपूर्व घडामोडींचा...
- एप्रिलचा शेवटचा आठवडा, मेचा पहिला आठवडा -
पश्चिम किनारपट्टीवर पाऊस
- मेच्या दुसऱ्या आठवड्यात गुजरात व महाराष्ट्रात
पावसाचा अंदाज
- उत्तर व इशान्य भारतात पूर्वमोसमी पावसात
वाढीचा अंदाज
- मॉन्सून वेळेच्या आधी व जोरदारपणे दाखल
होण्याची शक्यता
- असा राहील देशातील पाऊस (मॉन्सून 2015)
महिना --- पावसाचे प्रमाण (मि.मी.)--- टक्केवारी
जून --- 174 --- 107
जुलै --- 300 --- 104
ऑगस्ट --- 258 --- 99
सप्टेंबर --- 167 --- 96
- अंदाज महाराष्ट्रातील मॉन्सूनचा (सरासरीच्या
तुलनेत पाऊस - 2015)
महिना --- कोकण --- मध्य महाराष्ट्र ---
मराठवाडा --- विदर्भ
जून --- अती जास्त --- थोडा जास्त ---
सरासरीएवढा --- कमी
जुलै --- सरासरीएवढा --- सरासरीएवढा ---
सरासरीएवढा --- सरासरीएवढा
ऑगस्ट --- कमी --- कमी --- कमी --- कमी
सप्टेंबर --- कमी --- कमी --- कमी --- कमी
No comments:
Post a Comment