Friday, May 6, 2011

जत बाजार समितीचे पालटले रुप.



सांगली जिल्हा हा एक सकारात्मक कार्य करणारा 'सहकार जिल्हा' म्हणून ओळखला जातो. सहकाराची शंभरी साजरी करत असताना सांगली जिल्ह्यात बर्‍याच संस्था आज आदर्श कार्यप्रणालीमुळे राज्यात आपला ठसा उमटवित आहेत. सांगलीतील जत तालुका एक दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. याच जत तालुक्यातील शेतकर्‍यांनी आपल्या आर्थिक प्रगतीबरोबर सांगली बाजार समितीची प्रगती केली आहे. दोन वर्षापूर्वी केवळ १५ हजार रुपयांपर्यंत उत्पन्न असणार्‍या बाजार समितीचे उत्पन्न आज २५ लाखाच्यावर गेले आहे. सहकारामुळेच ही किमया साधली आहे.

पुण्या-मुंबईमध्ये असणार्‍या इमारतीसारखी भव्य अशी वास्तू या बाजारसमितीला लाभली आहे. अडीच कोटी रुपये या इमारतीच्या निर्मितीस खर्च करण्यात आले आहेत. इमारतीची लांबी सलग अशी पाऊण किलोमीटर एवढी आहे. मोठय़ा शहरातील चाळीप्रमाणे पत्र्याची ५० दुकाने येथे होती. तेथे आज सुसज्ज असे १०४ गाळे निर्माण करण्यात आले आहेत. केवळ ८ हजार २०० रुपये इतके भाडे यापूर्वी मिळायचे. कुठल्याही प्राथमिक सुविधा येथे उपलब्ध नव्हत्या, अशा या बाजार समितीत सर्व अत्याधुनिक सुविधा आज उपलब्ध आहेत.

या बाजार समितीचे रुप पालटले आहे. या दुमजली इमारतीत पहिल्या मजल्यावर ५२ आणि तळमजल्यावर ५२ अशी या गाळ्यांची उभारणी आहे. स्वतंत्र पार्किंग व्यवस्था, पिण्याचे पाणी, विजेची सोय, सुलभ शौचालय आदी सुविधा येथे आहेत. भविष्यात कुठलीही उणिव राहू नये याची दक्षता बाजार समितीने घेतलेली आहे, याचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ग्रामीण भागातील शेतकरी आपला माल विकण्यास येथे येतो. माल विकेपर्यंत त्याला तेथे थांबावे लागते. या कालावधीत आपल्या प्राथमिक गरजांसाठी अन्यत्र कोठेही जावे लागू नये याची दक्षता येथे घेण्यात आली आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती प्रकाश जमदाडे यांनी सांगितली. 

शेतकरी हा केंद्रबिंदू मानून या बाजार समितीचे कामकाज चालते. जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मंगळवेढय़ाचा परिसर म्हणजे शाळू (ज्वारी), बाजरी आणि हरभरा यासाठी फारच प्रसिद्ध आहे. येथील धान्याला कर्नाटकात फारच मागणी असते. या सर्व बाबी लक्षात घेऊन शेतकर्‍यांना चांगला भाव मिळावा म्हणून जत येथे धान्य चाळणी प्रकल्पही उभारण्यात येत आहे. यासाठी ५५ लाखांची तरतूद करुन देण्यात आली असल्याची माहिती श्री. जमदाडे यांनी दिली.

सांगलीची हळद सुप्रसिद्ध आहे. शेतकर्‍याच्या हळदीला चांगला भाव मिळावा म्हणून हळद प्रक्रिया प्रकल्पही समितीने हाती घेतला आहे. त्या प्रकल्पात हळद वाळवून त्याची पावडर तयार करणे आणि १०० ते ५०० ग्रॅमपर्यंत पाकिटे तयार करण्याचा या प्रकल्पात समावेश आहे. हा प्रकल्पही कार्यान्वित होत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन बाजार समिती या विविध उपाययोजना राबवित असून त्यास परिसरातील शेतकर्‍यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद