Wednesday, December 7, 2011

मसाला पिकांत मासरुळची आघाडी


बुलडाणा जिल्ह्यातील मासरुळ गावाची यापूर्वीची ओळख होती पानवेल, मिरची उत्पादन करणारे गाव. प्रतिकूल हवामानामुळे या पिकांना फटका बसला. आता या गावातील शेतकरी आले, हळद या पिकांमध्ये आपली ओळख तयार करण्याकडे वाटचाल करीत आहेत. या पिकातून आपली आर्थिक घडी बसवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

अनेकदा गावांची नावे एखादे वैशिष्ट्य दर्शवितात. कधी कधी ही नावेच गावचा चेहरा असतात. बुलडाणा तालुक्यातील मासरुळ या गावाबाबत असेच म्हणता येईल. या गावात सिंचनाची सोय असलेला प्रत्येक शेतकरी मिरचीचे पीक घेतोच घेतो. मिरची पिकाने या गावाला प्रगतीची वाट दाखवली. वाईच्या बाजारपेठेपासून ते थेट दिल्ली बाजारातील व्यापारी या गावात येऊन मिरची खरेदी करतात, अशी या गावची ख्याती झाली आहे. सध्या मिरचीला हवा तसा दर मिळतोच असे नाही. निसर्गाच्या लहरीपणाचे आघात अनेकदा सोसावे लागतात. त्यामुळेच येथील गावकरी आता मिरचीला थोडा ब्रेक देऊन हळद, आले अशा नगदी पिकांच्या लागवडीकडे झुकले आहेत.

बुलडाण्यापासून ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर असलेले हे मासरुळ तसे मराठवाड्याच्या सीमेलगतचे गाव आहे. मासरुळच्या शेजारी असलेली जालना जिल्ह्यातील असंख्य गावे मिरची उत्पादकांचा बेल्ट म्हणून ओळखली जातात. नैसर्गिक आघात, बाजारभावाची अनिश्चितता असतानाही या वर्षी मासरुळ येथे सुमारे चारशे ते पाचशे एकर क्षेत्रावर मिरची लागवड झालेली आहे, मात्र गेल्या काही वर्षातील क्षेत्रापेक्षा हे बरेच कमी आहे. 

तीन ते चार वर्षापासून इथला शेतकरी प्रयोग म्हणून आले लागवडीकडे झुकला. त्यानंतर आता या पिकाच्या सोबतीला हळदसुध्दा लावली जात आहे. या हंगामात गावातील शेतकऱ्यांनी साधारणत: दीडशे एकरावर हळद व अडीचशे एकर आले लागवड केली आहे. पाच हजारांपर्यंत लोकसंख्या असलेल्या गावात सातशे खातेदार आहेत. सुमारे ११०५ हेक्टर गावचे क्षेत्र आहे. पंचायत समिती सदस्य दादाराव काटोले यांनी तीन एकरांत हळद व आले लावले. सरपंच शेषराव सावळे यांनी तर साडेचार एकर क्षेत्रात आले तर तीन एकरावर हळद घेतली. जगन्नाथ उंबरकर यांच्याकडे आठ एकर हळद व तीन एकर आले आहे. सरला पांडुरंग गुळवे, वैजनाथ विसपुते, कैलास सिनकर, भास्करराव देशमुख, दौलत फुसे अशी असंख्य नावे या गावात हळद व आले उत्पादक म्हणून पुढे येतात. 

आल्याचे एकरी १०० तर हळदीचे दीडशे क्विंटलपर्यंत उत्पादन घेणारे शेतकरी या गावात आहेत. अनेक शेतकऱ्यांनी गादीवाफा (बेड) तयार करुन त्यावर हळद व आले लागवड केली आहे. काहींनी सरी-वरंबा पध्दतीने लागवड करीत आले व मका असे दुहेरी पीक घेण्याचाही प्रयोग केला.

रुंद गादी वाफा, बियाणे प्रक्रिया, कीड-रोग व्यवस्थापन आदी गोष्टी शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून वेळोवेळी समजावून दिल्या जात आहेत. ठिबक सिंचनाचा वापर तसेच विद्राव्य खते कशी वापरावीत याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन लाभत आहे. यामुळे उत्पादनात वाढ झाली असून पिकाचा दर्जासुध्दा चांगला राहत आहे. मासरुळचे सरपंच शेषराव साळवे म्हणाले की, आमच्या गावात आले पीक गेल्या काही वर्षापासून केले जात आहे. गावात एकूण शेतकऱ्यांपैकी किंमान ४० टक्के शेतकरी आले उत्पादक असतील. हळद पीकही आता शेतकरी घेऊ लागले आहेत. गेल्या वर्षी मी देखील हळदीचे बेणे विकले होते. आले पिकाचे ९० ते १०० क्विंटलपर्यंत उत्पादन मिळाले आहे. सर्व खर्च जाऊन दीड लाख रुपये उत्पन्न हाती मिळते. अर्थात, आले किंवा हळद या पिकांबाबत बोलायचे तर बाजार भावांवर फार काही अवलंबून आहे. भाव चांगले मिळाले तर नफाही वाढतो.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद