जुन्या वैदिक ग्रथांमध्ये शेतीला उत्तम व्यवसाय म्हटले गेले आहे. परंतु हल्ली हा व्यवसाय अवकाळी पाउस,निसर्गाचा लहरीपणा यामुळे विस्कळीत होताना दिसत आहे. उत्पादन कमी आल्यामुळे बळीराजा देखील हाताश निराश होत आहे.अशा परिस्थितीत या बळीराजाला शासनही विविध योजनांच्या माध्यमातून बळ देत असते. नवनवीन प्रयोग,आधुनिक तत्रंज्ञानाचा उपयोग शेतीत करुन उत्पादन कसे वाढवावे याचे मार्गदर्शन शेतकर्यांना व्हावे म्हणून शासनाने शेतीशाळेसारखा प्रयोग आंमलात आणला आहे व हा प्रयोग यशस्वी झाल्याचे उत्तम उदाहरण सिन्नर तालुक्यात दिसत आहे.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत सिन्नर तालुक्यातील मौजे खोपडी गावात गहू पिकाची शेतीशाळा २००९-१० मध्ये राबविण्यात आली. शेतीशाळेच्या माध्यमातून खोपडी येथील ३० शेतकर्यांची निवड करण्यात आली. रब्बी हंगामात एकूण्र २० आठवडे गहू या पिकावर मार्गदर्शन करण्यात आले. त्यामध्ये एकात्मिक पीक व्यवस्थापन शेतकरी अवलंब करीत असलेल्या शेतावर निरीक्षण घेण्यात आली. त्यामुळे प्रत्येक आठवडयातील शेत पिक परिस्थितीनुसार कीड रोग,तण, पाणी व्यवस्थापन, अन्न द्रव्ये व्यवस्थापन याविषयीच्या नोंदी करण्यात येत असत. निरीक्षणे घेतल्यानंतर निवड केलेल्या चारही गटांतर्गत चित्रीकरणे म्हणजे शेतात घेतलेल्या निरीक्षणांचे ड्राईंग शीट व त्याचे रेखाटन केले जात असे. निरीक्षणाव्दारे तयार केलेल्या चित्रीकरणाचे शेतकर्यांमधूनच सादरीकरण केले जात असे.
नाशिक जिल्यातील सिन्नर एक अंशत: आदिवासी तालुका असुन तालुक्यातील शेतकर्यांचे खरीप हंगामात भात,मका,सोयाबीन व नागली तर रब्बी हंगामात गहू,हरभरा ही मुख्य पिके आहेत. गहू व हरभरा पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी कृषि विभाग प्रयत्नशील आहे. शेतीशाळा हे कृषि विस्ताराचे प्रभावी माध्यम असल्याने तालुक्यात विविध योजने अंतर्गत ७ शेतीशाळेचे या रब्बी हंगामात आयोजन केलेले जाते . गहू पिकासाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत खोपडी या ठिकाणी आत्मा संस्थेअंतर्गत या शेतीशाळा घेण्यात आली आहे. या व्यतिरिक्त खरीप हंगामात गळित धान्य विकास कार्यक्रमांतर्गत सोयाबीन पिकासाठी नायगांव येथे शेतीशाळा घेण्यात येत आहेत. शेतीशाळेसाठी वरील सर्व ठिकाणी शेतकरी विशेषत: महिला शेतक र्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
शेतीशाळेसाठी गावनिहाय वार निश्चित करुन देण्यात आला आहे व प्रत्येक शेतीशाळेस एक समन्वयक व एक मार्गदर्शक यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक आठवडयाच्या ठरलेल्या दिवशी नेमणूक केलेले कर्मचारी शेतीशाळेत हजर राहून मार्गदर्शन करतात. प्रत्येक आठवडयाचा पिकनिहाय अभ्यासक्रम ठरवून देण्यात आलेला असून त्या आठवडयातील ऍग्रोवन अंकाचे वाचन करण्यात येते. स्थानिक गरजेनुसार प्रात्यक्षिक करुन दाखविण्यात येते. उदा. पिकात पक्षांसाठी लाकडी मचाण तयार करणे, निंबोळी अर्काची फवारणी करणे, गिरीपुष्पाची बांधावर लागवड, भात नियंत्रित अंतरावर लागवडीसाठी दोरी तयार करणे व लागवड करणे,बीजप्रक्रिया इ.प्रात्यक्षिकांचे आजपर्यंत आयोजन करण्यात आलेले आहे.
शेतीशाळेतील ३० शेतकर्यांचे ४-५ गट तयार करण्यात येतात. कृषि तंत्रज्ञानाव्यतिरिक्त स्थानिक गरजा लक्षात घेवून विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात येते. शेतकर्यांमध्ये सांघिक भावना वाढविण्यासाठी शेतीशाळेत सांघिक खेळाचे आयोजन करण्यात येते.
या उपक्रमात तालुक्यातील आ.पी.बिन्नर, व्ही.पी.मेहरे या कृषि सहाय्यकांनी शेतीशाळा आयोजित केल्या आहेत. विविध योजनेतंर्गत शेतीशाळांचे उत्तमरित्या आयोजन करुन कृषि विभाग शेतकर्यांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण करणे व उभारी देण्याचे काम करीत आहे करण्याचे काम करत आहेत.
'महान्यूज.'
No comments:
Post a Comment