Sunday, January 29, 2012

मातीचे वरदान

प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी परिश्रमाची शिदोरी उपयोगी पडते. मातीशी इमान राखून केलेल्या कष्टामुळे शेतकऱ्याला मातीतून सोने पिकविता येते. त्याला मिळालेली संपत्ती, मान सन्मान हे त्या मातीचेच वरदान असते. असेच वरदान लाभलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातीन नाणीज गावच्या चंद्रकांत इरमल या शेतकऱ्याचा शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलाय.

गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या इरमल यांचे शिक्षण कठीण आर्थिक परिस्थितीमुळे होऊ शकले नाही. वडिलोपार्जित शेती सहा एकर होती. मात्र पारंपरिक पद्धतीने शेती करताना कुटुंबाचे पालनपोषण करणेही तसे जडच होते. शिवणकला शिकून सुरू केलेला व्यवसायही गावात फारसा प्रतिसाद न मिळाल्याने पुढे चालू शकला नाही. मात्र अशाही परिस्थितीत हार न मानता त्यांनी शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.
प्रयोगशीलतेची आवड असल्याने त्यांनी शेतीचे उत्पन्न वाढविण्याच्या विविध पर्यायांवर विचार केला. पारंपरिक भात पिकाने घरच्या गरजा पूर्ण करता येणे अशक्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शेतीतील नव्या प्रयोगांना सुरूवात केली. इरमल यांनी फळझाडे लागवड करताना आंबा, चिकू, कोकम, नारळ, काजू आदी कलमांची शेतात लागवड केली. कलमांची वाढ होऊन त्यापासून उत्पन्न मिळायला काही कालावधी लागणार असल्याने त्या दरम्यान त्यांनी आंतरपिके म्हणून भाजीपाला आणि कडधान्याचे पीक घेण्यास सुरूवात केली. आंतरपिकातून घरखर्च भागत असल्याने त्यांचा उत्साह वाढला.

उत्पन्न वाढत असल्याने त्यांनी पडीक जमिनीचा विकास करताना डोंगरमाथ्याच्या जमिनीची व्यवस्थित बांध-बंदिस्ती केली आणि उतारावर चरा पाडल्या. त्यामुळे जमिनीत पाणी मुरण्यास मदत झाली. माती परिक्षण, सेंद्रीय खताचा वापर, आधुनिक अवजारांचा वापर आणि सोबत संकरीत बियाणे यामुळे उत्पादकतेत वाढ झाली. या कामी त्यांना सहकार्य करणाऱ्याविषयी ते कृतज्ञता व्यक्त करतात. 

इरमल यांनी यापूर्वीदेखील तालुका पातळीवरील भातपीक स्पर्धेचा पुरस्कार मिळविला आहे. भातासोबत नागली, तूर आदी पिके खरीप हंगामात तर रब्बी हंगामात कडधान्य आणि भाजीपाला उत्पादन ते घेत आहेत. त्यांच्या शेतातील फळबागही बहरली आहे. त्यातूनही त्यांना चांगले उत्पादन मिळू लागले आहे. त्यांच्या शेतात गेल्यावर ते शेतीचे शास्त्र सविस्तरपणे आपल्यासमोर मांडतात. 

वडिलोपार्जित सहा एकरच्या शेतीत त्यांनी आपल्या परिश्रमाने आणखी सहा एकराची भर घातली आहे. कोकणात फुलशेतीचे प्रमाण कमी असून फुलांना मागणी असल्याने शास्त्रोक्त पद्धतीने अशी शेती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सतत नवे काहीतरी करायचे आणि शेतीतील नवे तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या शेतात त्याचा उपयोग करायचा असा छंद जडल्याने त्यांच्या शेतातून सतत चांगले परिणाम दिसून येत आहेत. या कष्टाळू आणि प्रयोगशील शेतकऱ्याला मातीचे असे काही वरदान लाभले आहे की ज्यामुळे त्यांचे दारिद्र्य तर दूर झालेच पण जीवनात काहीतरी करून दाखविण्याची आकांक्षादेखील पुरस्कारामुळे पूर्ण झाली. या पुरस्काराचा जराही गर्व न बाळगता आपल्या कामात व्यस्त राहण्याचा त्यांचा स्वभावच त्यांच्या यशाचे गमक असल्याचे त्यांची भेट घेतल्यावर लक्षात आले. असे 'शेतीनिष्ठ' सुपूत्रच काळ्या आईच्या गर्भातून सोने पिकवून तिचे पांग फेडू शकतात.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद