Wednesday, January 18, 2012

स्थापत्य अभियंत्याने फुलवली आल्याची शेती


गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका हा धान उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तथापि, धान उत्पादनाची शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरत असल्याने शेतकरी वैफल्यग्रस्त होत आहेत. परंतु आधुनिक तंत्रज्ञान व अंगभूत सृजनात्मकता यांचा मेळ घालून अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त प्रतापगड भागातील बेरोजगार स्थापत्य अभियंता यशवंत सोपानराव गणवीर यांनी शेतीमध्ये आल्याच्या शेतीचा नवा प्रयोग यशस्वी करुन दाखविला आहे.
यशवंत गणवीर यांनी आपल्या शेतीत अन्य पीक घेण्याची संकल्पना आखून तीन एकर शेतीत लगेच आर्थिक प्राप्ती होईल अशी पिके घेण्याचे ठरविले. अडीच एकर शेतीत त्यांनी आल्याची लागवड करुन सुमारे २५ टन उत्पादन घेतले आणि इतरांसाठी आदर्श निर्माण केला. त्यांचा आत्मविश्वास त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. त्याबरोबरच अर्ध्या एकर शेतीत त्यांनी हायब्रीड चना, मिरची, वांगी, बीट, कोथिंबीर व अन्य पिकांची लागवड केली. यातून वर्षाला ५० हजाराचे उत्पन्न घेण्याचा त्यांचा मानस आहे.

श्री.गणवीर यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता यावी म्हणून शेतात आधी विहीर तयार केली. त्यातून ठिबक सिंचन पद्धतीने आले व अन्य पिकांना पाणी देण्याचे काम ते करीत आहेत. ठिबक सिंचन प्रक्रियेत प्रथमत: दोन ते अडीच लाखाचा खर्च आला असला तरी हा एकदाच करावयाचा खर्च असून पहिल्याच वर्षी हा खर्च पिकांच्या उत्पन्नाद्वारे भरून निघणार असल्याचा त्यांना विश्वास आहे. यासोबतच आणखी दोन एकर शेतीमध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था करीत असून लवकरच त्यात दोन प्रकारच्या जातींचे टरबूज लावण्याचे काम सुरु करणार असल्याचेही गणवीर यांनी सांगितले.

धान व आले यांच्या किंमतीचा व उत्पादनाचा तुलनात्मकदृष्ट्या विचार केल्यास धानापेक्षा आल्याचे उत्पादन विपुल होते व भाव देखील अधिक मिळतो. बाजारात देखील आल्याला विशेष मागणी असते, असे गणवीर यांचे निरीक्षण आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरुन व स्वत: मेहनत करुन त्यांनी आपल्या शेतात आल्याची शेती फुलवून परिसरातील शेतकऱ्यांना एक नवा मार्ग दाखवला आहे.

पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन शेतकऱ्यांनी व्यावसायिकदृष्ट्या पिकांमध्ये विविधता आणल्यास शेती व्यवसाय फायदेशीर ठरतो, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शेतकऱ्यांनी याद्वारे प्रेरणा घेऊन शेतीपद्धतीत विविधता आणल्यास वैफल्य घालवण्यास त्याचा निश्चितच फायदा होईल, यात शंका नाही.

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद