लागवडीपूर्वी दहा गुंठ्यात नेट उभे करुन जमिनीवर चांगले कुजलेले शेणखत घातले. त्यात तीन फूट रुंदीचे बेड तयार केले. बेड तयार झाल्यावर दीड फूट अंतरावर मिरचीची लागवड करण्यात आली. लागवडीनंतर नियोजन करून वेळोवेळी खतांची मात्रा दिली. दोन महिन्यानंतर या मिरचीची पहिली तोडणी केली. यानंतर दर तिसऱ्या दिवशी मिरची विक्रीसाठी तयार होत आहे.
सिमला मिरची विक्रीसाठी जिल्ह्यातील मेहकर तसेच जालना या दोन बाजारपेठेत नेली जाते. तेथे मिरचीला सरासरी २० रुपये किलो हा दर मिळाला. या पिकाद्वारे आतापर्यंत निव्वळ दीड लाखांचा नफा मिळाला असून अजून दोन महिने उत्पादन निघणे अपेक्षित आहे. त्यातूनही किमान ५० हजार रुपये मिळतील अशी खात्री राऊत यांनी व्यक्त केली आहे.
पारंपरिक शेती करून नेहमीच्याच पिकांवर अवलंबून न राहता राऊत यांनी सिमला मिरचीची लागवड केली आणि त्यांना उत्कृष्ट नफा मिळाला. यामुळेच आज काळाची गरज म्हणून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे असा सल्ला त्यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment