महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ आणि प्रवरा फळे भाजीपाला उत्पादक आणि प्रक्रिया खरेदी विक्री सह संस्था, राहता, जि.अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु करण्यात आलेल्या पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप तत्वावर उभारण्यात येत असलेल्या साई प्रवरा ॲग्रो प्रोसेसिंग पार्कसाठी आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूकदार परिषदेचे उद्घाटन श्री.विखे पाटील यांच्या हस्ते पुणे येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. कृषी व पणन विभागाचे प्रधान सचिव डॉ.सुधीर कुमार गोयल, कृषी उद्योग विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक नीता राजीव लोचन, महाराष्ट्र कृषी स्पर्धात्मक प्रकल्पाचे कार्यकारी संचालक दादासाहेब झगडे, पशुसंवर्धन आयुक्त एकनाथ डवले, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाचे अभय बोगीरवार, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे कार्यकारी संचालक विश्वास भोसले, कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ.किशोर तोष्णीवाल यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
विखे पाटील म्हणाले, कृषी व्यापार विषयक पायाभूत सुविधा उदा. पॅक हाऊस, मालाची सफाई, प्रतवारी, पँकिंग, गोदामे, रायपनिंग चेंबर, शीतगृह तसेच रस्ते, वीज, पाणी यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना अनुदानाबरोबरच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. शेतकऱ्यांनी पिकविलेल्या फळे, भाजीपाला यांना बाजारपेठ मिळवून देणे यासाठी कृषी पायाभूत सुविधांसाठी खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करणे महत्त्वाचे आहे. कृषी विकासाच्या एकात्मिक विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासन खाजगी उद्योजकांच्या भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पासाठी दरवर्षी एक हजार कोटी या प्रमाणे आगामी पाच वर्षासाठी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. यातून शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होऊन कृषीक्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होऊन मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होईल.
डॉ.गोयल म्हणाले, मोठ्या प्रमाणात निर्माण होणारे अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कृषी व्यवसायाशी निगडीत शेतकऱ्यांची मोठी संख्या आणि ग्राहक वर्ग, कोट्यवधी रुपयांची उलाढाल आदी बाबींमुळे या पुढील काळात कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. शासन आणि खाजगी उद्योजकांनी या क्षेत्राच्या विकासासाठी केलेली गुंतवणूक फायद्याची राहील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी या परिषदेस उपस्थित असलेल्या गुंतवणूकदारांच्या प्रश्नांना श्री.गोयल यांनी समर्पक उत्तरे दिली. प्रारंभी डॉ.किशोर ताष्णीवाल यांनी प्रास्ताविक केले.
या परिषदेस कृषी क्षेत्रात गुंतवणूक करु इच्छिणारे उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment