Wednesday, April 11, 2012

सुनील राजगुरू यांचा मत्स्य व्यवसाय


पारंपरिक शेती सध्या न परवडणारी झाल्याने शेतीस पूरक व्यवसाय म्हणून मासे पालनाचा व्यवसाय सोलापूर जिल्ह्याच्या माढ्यातील प्रगतशील तरुण शेतकरी सुनील प्रल्हाद राजगुरू यांनी सुरू केला आहे.

सुनील राजगुरू हे शेतकरी कुटुंबातील उच्चशिक्षित तरुण. आई शिक्षण खात्यात, तर वडील आरोग्य खात्यात नोकरीस. वडिलोपार्जित चाळीस एकर जमीन असताना पारंपरिक पिकांमुळे मात्र शेती तोट्याची ठरत होती. त्यामुळे पारंपरिक शेतीस फाटा देऊन शेतीपूरक व्यवसायाकडे वळलेल्या सुनील यांनी आई-वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवस रेशीम उद्योग आणि ससे पालनाचा व्यवसाय केला. 
राजगुरू यांच्या शेतात बोअर आहे. या बोअरचे पाणी साठविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामुदायिक शेततळे योजनेतून त्यांनी ३४ बाय ३४ बाय १० मीटरचे शेततळे तयार केले. काही दिवसांनंतर या तळ्याची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी शासकीय अनुदानासह स्वत:कडील दीड लाख रुपये खर्च करून त्यांनी ३८ बाय ४५ बाय १० मीटरचे तळे तयार केले. या तळ्यातील पाण्याचा शेतीसाठी चांगला उपयोग होऊ लागला आहे. 

या तळ्यातील पाण्यावर त्यांनी केशर, हापूस, पायरी, रत्ना या जातीच्या आंब्याची तसेच पाच एकर जागेमध्ये जांभूळ, नारळ यांचीही बाग लावली. या पाण्यावर फळबागांची निगा राखत असतानाच दोन एकर ऊसही चांगल्या पद्धतीने जोपासला.

तळ्यातील पाणी जसे शेतीसाठी उपयोगी ठरू लागले तसे या पाण्याच्याच साहाय्याने शेती पूरक व्यवसाय म्हणून राजगुरू यांनी मासेपालनाचा व्यवसाय करण्याचे ठरविले. त्यांनी 'कटला व सायफरनेसिया' या जातीच्या माशांची पाच हजार अंडी या पाण्यात सोडली. या दोन जातीच्या माशात सायफरनेस मासा तळाला राहतो तर कटला जातीचा मासा पाण्याच्या वरच्या थरात राहतो. त्यामुळे दोन्ही जातींच्या माशांना समान खाद्य मिळते. सध्या माढा भागात माशांसाठीचे खाद्य बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने मक्याचा भरडा, तांदूळ, शेंगापेंड व शेण असे खाद्य माशांना टाकले जाते. अवघ्या सहा महिन्यात या माशांची अर्धा ते पाऊण किलोपर्यंत वाढ झाली असून त्यांची स्थानिक बाजारपेठेत विक्री होत आहे. इंदापूर, सोलापूर येथे या माशांसाठी ठोक बाजारपेठही उपलब्ध असल्याने राजगुरू त्या बाजारपेठेतही मासे पाठवित आहेत. 

माशांची प्रजनन क्षमता वाढल्याने आता पाण्यात नवीन अंडीपुंज सोडण्याची गरज राहिलेली नाही. वरचेवर माशांची निर्मिती वाढत असल्याने मासे पालनाचा हा व्यवसाय दीर्घकाळ चालणारा आणि फायदेशीर ठरत आहे. 

विविध शेतीपूरक व्यवसायातून प्रगती साधणाऱ्या राजगुरू यांच्या मासेपालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी जिल्ह्यातून अनेक शेतकरी माढा येथे येत आहेत. यानिमित्ताने राजगुरू आर्थिक प्रगती साधण्याबरोबरच इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक देखील ठरू लागले आहेत.

21 comments:

  1. सुनिल सर,प्लीज..मला मार्गदर्शन हवय..तुमची भेट घ्यायचीय..मोबा नंबर दया..

    ReplyDelete
  2. सुनिल सर,,,pls,give me ur mob no..I need help you

    ReplyDelete
  3. आपण करत असलेल्या कार्यास शुभेच्छा.

    ReplyDelete
  4. sir
    i want to meet you and plz give me your mob no
    my mobile no is 9665605960 so plz send this your plant area name
    thank you

    ReplyDelete
  5. मला पण माहिती हवी आहे

    ReplyDelete
  6. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  7. सुनील सर कृपया करुण माला आपला मोबइल नंबर दया

    ReplyDelete
  8. सर मला मत्सपालन करायचे मार्गदर्शन करा 9561790291

    ReplyDelete
  9. सर मला मत्सपालन करायचे मार्गदर्शन करा 9561790291

    ReplyDelete
  10. सर मी पण माढा तालुक्यातूनच आहे . मला मत्स्यपालन विषयी माहिती हवी आहे कृपया आपला मोबाईल नं सांगावा. मी आपणास भेटायला पण येऊ शकतो कृपया रिप्लाय द्यावा. माझा मोबाईल नो. 9890977155

    ReplyDelete
  11. मला पण नंबर द्या

    ReplyDelete
  12. मला मत्स्यव्यवसाय करायचा आहे 9665840088

    ReplyDelete
  13. N S Bhui ( Fish Farming Consultant ) Contact Number 9049129843

    ReplyDelete
  14. Sir mof no pah
    ije my no 9762866183

    ReplyDelete
  15. सर माझे १००*१०० चे तळे आहे मी त्यात रोहु कटला २०००० मासे सोडले परंतु माहिती नसल्याने मला उत्पन्न कमी झाले
    सर तुमचा फोन नंबर मिळावा...!
    माझा मोबाईल नंबर ७०५७२४९९९९

    ReplyDelete
  16. Sir mala fish farming chalu karaychii ahe Tari malaa margadarshan karaa
    No no.7741043814
    Jagdish Salunke

    ReplyDelete

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद