Thursday, December 2, 2010

शेतकर्‍यांना मदतीची थकबाकी मार्च अखेरपर्यंत पूर्णपणे देणार - उपमुख्यमंत्री



शेतकर्‍यांच्या अडचणीच्या काळात राज्य शासन नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले असून यापूर्वी ज्या शेतकर्‍यांना मदत जाहीर झाली आहे अशा सर्व शेतकर्‍यांना देय असलेली मदतीची थकबाकी मार्चअखेरपर्यंत पूर्णपणे दिली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली.

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसर्‍या दिवशी विधानसभेत प्रारंभीच सदस्यांनी नुकत्याच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना मदत जाहीर करण्याचा आग्रह धरला. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, सुभाष देसाई, गणपतराव देशमुख आणि बाळा नांदगावकर या सदस्यांनी ठोस निर्णयाची मागणी केली, तसेच शेतकर्‍यांना यापूर्वीची देय असलेली मदतीची थकबाकीही देण्याचा आग्रह धरला. त्यावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकर्‍यांना यापूर्वी जाहीर झालेल्या मदतीचे शिल्लक देणी मार्चअखेर पूर्णपणे दिले जाईल, असे सांगितले. मदत व पुनर्वसन मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली मदत व पुनर्वसन समिती कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी सभागृहाला दिली.


वीज बिल थकबाकी भरणार्‍या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा सुरु ठेवणार - उपमुख्यमंत्री


थकीत वीज बिलाचे पैसे भरलेल्या तसेच चालू बाकी भरणार्‍या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी सांगितले.

विधानसभेत आज विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी शेतकर्‍यांच्या विजेचा मुद्दा मांडला. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍यांला संपूर्ण मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. यापूर्वीच शेतकर्‍यांना मोफत वीज देऊन त्यावरील १५०० कोटी रुपयांच्या वीजभाराची रक्कम राज्य शासनाने माफ केली आहे. अशा विविध माध्यमातून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 

विधानसभा उपाध्यक्षपदाची ७ डिसेंबर रोजी निवडणूक


महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी ७ डिसेंबर २०१० रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. तालिका अध्यक्ष दिलीप सोपल यांनी गुरूवारी या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.

विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी शनिवार ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असून त्याची छाननी त्याच दिवशी दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेण्याची मुदत असून ७ डिसेंबर रोजी निवडणूक होईल, असे तालिका अध्यक्षांनी सभागृहाला सांगितले. 


शेतकर्‍यांची २५० कोटी रुपयांची थकबाकी मार्चअखेर देणार - उपमुख्यमंत्री


नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीच्या थकबाकीची २५० कोटी रुपयांची रक्कम मार्च अखेरपर्यंत देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले. 

ही थकबाकी देण्यासाठी प्रसंगी आकस्मिक निधीचा वापर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे आपदग्रस्त शेतकर्‍यांना मदतीची घोषणा तातडीने करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते पांडुरंग फुंडकर, सदस्य दिवाकर रावते, जयंत पाटील आदींनी सभागृहात केली. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, शेतकर्‍यांना मदत करण्यासाठी शासन कटीबद्ध असून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना द्यावयाच्या नुकसान भरपाईसंदर्भात चर्चा करण्यास शासनाची पूर्ण तयारी आहे. संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना मदत करण्याची भूमिका शासनाने वेळोवेळी घेतली आहे.

उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या नुकसानीची कृषीमंत्र्यांनी स्वत: पाहणी केली आहे. या सर्व नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदत करण्यास शासन तयार आहे, परंतु या मदतीचे स्वरुप कसे असावे हे ठरविण्यासाठी सभागृहात सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. या चर्चेद्वारे निघणार्‍या निष्कर्षानुसार मदत जाहीर केली जाईल, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. 

विधानपरिषदेत पाच विधेयके सादर


महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक - २०१०, बोनस प्रदान (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक - २०१०, महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक - २०१०, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक - २०१०, शेतातील पिकावरील कीड व रोग याबाबत (सुधारणा) विधेयक - २०१०, मुंबई महानगरपालिका, मुंबई प्रांतिक महानगरपालिका, नागपूर शहर महानगरपालिका, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक - २००९ ही पाच विधेयके आज विधानपरिषदेत सादर करण्यात आली. 

वीज बिल थकबाकी भरणार्‍या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा सुरु ठेवणार - उपमुख्यमंत्री


थकीत वीज बिलाचे पैसे भरलेल्या तसेच चालू बाकी भरणार्‍या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.

विधान परिषदेत आज विरोधी पक्षनेते पांडूरंग फुंडकर यांनी शेतकर्‍यांच्या तोडलेल्या वीज कनेक्शन्सचा मुद्दा मांडला. त्यावेळी उपमुख्यमंत्री म्हणाले की, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे त्रस्त झालेल्या शेतकर्‍याला संपूर्ण मदत करण्याची शासनाची भूमिका आहे. 
महान्यूज'मधील मजकूर 

No comments:

Post a Comment

Popular Keywords

“पिवळी क्रांती अंजीर अंतरपिक अन्नधान्य अन्नसुरक्षा अभियान आदिवासी आधुनिक पोल्ट्री व्यवसाय आंबा आवळा इस्त्रो उपमुख्यमंत्री उस ऊस ऊसतोडणी ऍग्रो टुरिझम कर्जमाफी कात कांदा कापूस कारले कीडनियंत्रण कुक्कुटपालन कृषि उत्पन्न बाजारसमिति कृषि योजना कृषी दिन कृषी विद्यापीठ कृषीतंत्र कृषीमंत्री केळी कोकम कोळंबी खते खरबूज गहू जमिन जलसंधारन झरा ट्रक्टर ठिबक डाळिंब डाळींब महोत्सव - 2010 ढोबळी मिरची तलाव तुर तेल्या दुग्धव्यवसाय दॅट उपकरण द्राक्ष निर्यात निलक्रांती पाणी पाणी अडवा पाणी जिरवा पान पीक पुरंदर पृथ्वीराज चव्हाण प्रक्रिया उद्योग फलोत्पादन फळबाग फायटोप्थोरा बचत गट बटाटा बागाईतदार बाजारपेठ बाजारभाव बायोगॅस बियाणांची गुणवत्ता बी-बियाणे उपलब्धता बैल पोळा उत्साहात साजरा.Indian Farmer's Unique Festival. भाजीपाला. भात भेंडी मच्छिमार मजूर मत्स्य व्यवसाय मधशाळा मधुमक्षिका पालन मराठवाडा कृषी विद्यापीठ महा-रेन महाकृषी महाराष्ट्र महाराष्ट्रातील शेती कोण पिकवतो महिको महिला अणि कृषि क्षेत्र माती परीक्षण मिरची मोसंबी यशोगाथा रेशीम रेशीम उद्योग रोग-नियंत्रण. वनराई बंधारे वीज निर्मीती वृक्षायुर्वेद शिवामृत शेडनेट हाऊस शेतकरी शेततळे. शेती शेती व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय शेतीशाळा शेतीसाठी हवामानाचा सल्ला समूह शेती साखर साखर कारखाना सिंचन प्रकल्प सीताफल सेंद्रिय शेती सोनेरी हळद सोयाबीन स्ट्रोबेरी स्वाभिमानी शेतकरी संघटना हरितक्रांती हळद